विडंबन

कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं...

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
1 Apr 2024 - 5:05 pm

जंग जंग पछाडले
शब्द नाही फुटला
सरकारी यंत्रणांना
दरदरून घाम सुटला

मीच करणार राज
मीच रहाणार चिफ
माझाच पट, माझीच चीत
मज द्या न द्या रिलीफ

मला नाही माहीत
नाही मला आठवत
सरकारी यंत्रणांना
हे का नाही कळत

मी नाही काही केलं
ज्यांनी केलं त्यांना बोला
सरकारी यंत्रणेला
आम आदमीचा टोला

बघू आता पुढं काय होतय
कोण दळण दळतयं
आणी कोण पिठ खातयं

अनर्थशास्त्रउकळीविडंबनरायते

बेतुक्याचे चर्हाट.....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
22 Mar 2024 - 7:55 am

एक वर्षापुर्वी वळलेले चर्हाट......

https://misalpav.com/node/51141

आता पुढे.

K-जरी चंचल,चपळ मासोळी
लावली जाळी, तरी न लागे गळी
खेळतसे जळी, धीवरा संगे

खेळतसे रडीचा डाव
धीवरा न देतसे भाव
आता करू काय उपाव
धिवर म्हणे....

धीवरे घातले साकडे
वाचून आकडे, प्रार्थना केली
मिटला संदेह,सुटला आदेश

वाढले बळ, हलले दळ
सत्वर पातले धीवर
यमुना जळी

खेळ रंगला यमुनातीरी
"रापण", करण्या फेकली जाळी
ओढला किनारी K-जरी,लीलया

उकळीहास्यविडंबन

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं-दुसरी बाजू

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
7 Mar 2024 - 4:31 pm

तुझ्या कप्पाळीचे बिंब
भासे मध्यान्हीचा भानू
लल्लाटीच्या लाटा बघुनी
'उन्हाळी', लागते गं जानू

नाही गंधार कोमलं,
करपले मन नुस्ताच विषाद
नाच नाचता नाचता
आता धपापतो ऊर

जुनेरले नाते आपुले
आता कुठवरं पाळू
वयमान पाऊणशे अवघे,
आता तरी नको छळू

प्रारब्धाचा खेळं
विळ्या भोपळ्याचे नाते
दिनरात अशी साथ
कधी सरेल जन्मठेपेचा काळं?

आयुष्यआयुष्याच्या वाटेवरकविताविडंबन

डासबोध

रम्या's picture
रम्या in जे न देखे रवी...
27 Feb 2024 - 11:51 am

गालावरी हसू, मुखावरी दाढी ।
राजकारणे गुढी, बांधू पाहे ।।

दाढीचे वजन, दाढीचेच भजन ।
करू आम्ही नमन, दाढीचेच ।।

दाढीचाच फोटो, दाढीचीच मूर्ती ।
सांगावी अपकीर्ती, नेहरूंची ।।

पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त ।
करू मशागत, दाढीचीच ।।

कपिला गाय, करोनिया माय ।
गळ्यातच पाय, आमच्याच ।।

ईडीचाच टेकू, घेऊनिया फेकू ।
विरोधकांचे दमन, करू पाहे ।।

जे का ईडीसी घाबरले, त्यांसी म्हणे जो आपुले ।
समीप येता म्हणावे, शुद्ध जाहले ।।

चोरावे धनुष्य, लांबवावे घड्याळ ।
हाती द्यावे टाळ, जनतेच्या ।।

विडंबन

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

निओ's picture
निओ in जनातलं, मनातलं
9 Dec 2023 - 8:00 pm

अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही.
मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं.

कथामुक्तकविडंबनविनोदचित्रपटप्रकटनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाअनुभवमतविरंगुळा

(कावळ्यांची फिर्याद-३)

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
8 Oct 2023 - 12:42 pm

https://www.misalpav.com/node/48814 कावळ्यांची फिर्याद

https://www.misalpav.com/node/51617- कावळ्यांची फिर्याद-२

मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू
वायसांची, एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू

त्रासलेले काही,काही माखलेले, काही कुरकूरत होते
पिपंळाच्या पानां परी, कावळे अधिक होते

उडत,काही,पडत काही,तर काही,
"नशीब खोटे आपले", म्हणून बडबडत होते

कैच्याकैकविताविडंबन

(श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता)

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
27 Sep 2023 - 9:29 am

https://www.misalpav.com/node/51686पेर्णा

पैजारबुवां.... माफी,माफी,माफी.....

मुलगा शिकला विकास झाला
आला लग्नाला...
मुलगी शोधा विनवू लागला
बाजीराव नानाला...

काय अपेक्षा, कशी पाहीजे
विचारले नानाने....
चाटगपटला विचारून सांगतो
म्हंटले, (अर्ध्या) शहाण्याने....

आखूड शिंगी,बहुदूधी,
पण काळी सावळी........
नाना विचारता झाला
मॅच होत नाही रे भौ,ही तर जाफ्राबादी
चाटगपट म्हणाला.....

अनर्थशास्त्रउकळीकैच्याकैकविताविडम्बनविडंबनविनोदरायते

दोन लघु कथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
27 Aug 2023 - 10:28 am

शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.

विडंबनगझलसमाजविरंगुळा

मी पाऊस आणि कविता

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
20 Aug 2023 - 9:32 pm

काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे ही एक सरळ साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. दवाखान्यात उगाचच चेकअपसाठी अॅडमिशन घ्यावी इतकं हे रटाळ प्रकरण आहे.

मुक्तकविडंबनलेख

कथा स्मशानातील लग्नाची

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
5 Aug 2023 - 10:35 am

तो जहाल नास्तिक होता चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता. अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा. देवी देवतांची आणि संत महात्म्याची निंदा केल्यामुळे त्याला कधी-कधी मारही खावा लागायचा. पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते. त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले. परिणाम वयाची पस्तीशी उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही. शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी, त्याच्या अटींवर लग्न करायला तयार झाली. पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख दहा लाख द्यावे लागले.

संस्कृतीविडंबनसमाजआस्वादअनुभव