संगीत

रोमान्स विथ मुझिक

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
25 Oct 2020 - 11:05 pm

गाणं हा शांतता आणि ध्वनी यातला प्रणय आहे. शांतता ही स्त्री प्रकृती आहे आणि ध्वनी पुरुष आहे. तुम्ही जीवनात गाणं आणलंत तर हा रोमान्स अविरत चालू शकतो. आशा भोसले म्हणते की गाणं ही फक्त शब्दाचा ध्वनी करण्याची कला आहे. जनमानसात एक दृढ गैरसमज आहे की गाणं ही अवघड कला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवजात गोडवा नाही. या लेखाचं प्रयोजन असं की कोणतंही शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं फॉर्मल ट्रेनिंग न घेता, तुम्ही सुद्धा सुरेख गाऊ शकता. तुमच्याकडे एकमेव गोष्ट हवी ती म्हणजे रोमँटीक मूड ! हा रोमँटीक मूड तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलून टाकतो.

प्रकटनसंगीत

एक तरी गज़ल अनुभवावी # ०१

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
21 Oct 2020 - 12:46 pm

या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
___________________________________________________________________________________________________________________________

हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है

इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया
वर्ना हम भी आदमी थे काम के

इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए न लगे और बुझाए न बने

प्रकटनसंगीत

एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
20 Oct 2020 - 1:27 pm

गज़ल (मराठीत गझल?) आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय ... जणू मर्मबंधातली ठेव ही .... पण एकदम कोणीच गज़ल ऐकायला जात नाही.
आपल्या संगीत जीवनाची (कानसेन म्हणून ... तानसेन नव्हे ) सुरवात होते ती सिनेसंगीताने. त्यावेळी प्रमुख दोन प्रकार असतात .. फिल्मी आणि गैरफिल्मी.

प्रकटनसंगीत

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
15 Oct 2020 - 5:29 pm

ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ
शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा
खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा
सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध
धुंद संगीताचा मंद आवाज
"गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी"
बोला आणखी काय हवं?

कलानृत्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यऔषधी पाककृतीखरवसगोडाचे पदार्थथंड पेयमेक्सिकनसामुद्रिकमौजमजाganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआठवणीआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचतहानपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीरोमांचकारी.विडम्बनशृंगारसमुहगीत

राजन नागेन्द्रा

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
13 Oct 2020 - 5:21 am

आज राजन नागेन्द्रा जोडीतले राजन निर्वतले अशी बातमी आहे. त्या आधी एस पी बालासुब्रह्मण्यम गेले. स्वर्गात असा काय अचानक दुष्काळ पडला आहे की सुमधूर गाण्यांनी कान तृप्त करणारे हे स्वर्गिय लोक देव वर घेऊन चालला आहे.

लेखसंगीत

गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
25 Sep 2020 - 8:18 pm

श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले.

सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत.

त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील.

सद्भावनाप्रतिभाकलासंगीत

#ALAN WALKER #MUSIC

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
15 Sep 2020 - 6:38 pm

#ALAN WALKER #MUSIC

Alan walker चे on my way आणि इतर गाण्यांची “World of Walker triology” mini film च आहे,त्याबद्दल इथे थोडे लिहिते आहे,साधारण २०१५ -१६ पासून टप्प्या टप्प्याने याची वेगवेगळी गाणी youtubeवर प्रदर्शित होत राहिली आहेत.२०२० मध्ये या गाण्यांच्या मालिकेचा शेवट झाला आहे.

Faded (2015) and Sky नावाच्या गाण्याने या seriesची सुरुवात होते . ..कथा अशी आहे की,

१. Tired या गाण्यात दाखविले आहे की, Alan walker हि संस्कृती प्राकृतिक आपदेमुळे नष्ट झाली असते.तेव्हा Walker black team (अनुयायी) हे नष्ट होतात.

संगीत

मज सुचले गं

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
15 Sep 2020 - 3:32 pm

मज सुचले गं
सुचले मंजुळ गाणे
हिंडता डोंगरापाठी
सापडले कोरीव लेणे

विसरल्या उन्हातली वाटा
विसरले पथातील काटे
ही गुहा भयावह आता
स्वप्नासम सुंदर वाटे
रसभाव भराला आले
काव्याहून लोभसवाणे

बोलाविण घुमती वाटे
तालात नाचती प्रीती
शब्दाविण होती गीते
बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला
हे कुण्या प्रभुचे देणे

आकृती मनोहर इथल्या
मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे
सर्वात तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले
जन्माचे झाले सोने

आस्वादसंगीत

म्हारे हिवडा में नाचे मोर...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
7 Sep 2020 - 1:31 pm

राम राम मंडळी, मंडळी आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल.

आस्वादसंस्कृतीसंगीत