तुझ्याचमुळे
सारे तुझेच होते,
सारे तुझेच आहे
तू आहेस म्हणून
स्वप्नांचे येणे-जाणे आहे.
शब्द तुझेच होते
भाव तुझेच आहेत
तुझ्या मुळे इथे
कवितेचे व्यक्त होणे आहे.
गीत तुझेच होते
सूर तुझेच आहेत
तुझ्याच मुळे आयुष्यात
संगीताचे लेणे आहे.
रुप तुझे होते
रंग तुझेच आहेत
तुझ्याच मुळे सदा
रंगपंचमी आहे.