जनातलं, मनातलं
बाजाराचा कल
"बाजाराचा कल" हे माझे सदर सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे थोडे दिवस स्थगित ठेवत आहे. मागच्या आठवड्याचे युयुत्सुनेट्चे भाकीत चुकले. पण इण्ट्रा-डे मध्ये युयुत्सुनेटने तगडा पर्फॉर्मन्स दिला.
माझी काय चूक होत आहे, ती पण मला समजली आहे (असे सध्या तरी वाटत आहे).
फाईल बंद
गोव्याचा अथांग समुद्र, निळेशार पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू. आजुबाजुला नारळी फोपळीच्या बागा, समुद्रावरून येणारा ताजा वारा. अशा छान वातावरणात पोलिस सब-इन्स्पेक्टर पाटील बायकोच्या कमरेत हात घालून, गालाला गाल चिकटवून, प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत सेल्फी काढत होते. बायको सुद्धा फारच रंगात आली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच नवरा असा तिच्या हातात आला होता. दोघांचेही कुठे म्हणजे कुठेच लक्ष नव्हते.
शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
*******************************
हे आलमगीर,
अयोध्या काशी यात्रा!
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली यांना अयोध्या-काशी जाण्याचा योग आला!
काही कामानिमित्त मला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जावे लागले. काम आटोपून १ दिवस होता म्हणून जवळच १३४ किमीवरील अयोध्येतही जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून बस पकडून अयोध्येत पोहोचलो. राममंदिराबद्दल आस्था होती आणि बाबरी कांडाबद्दल बरेच काही ऐकून असल्याने उत्सुकता होतीच.
हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र
श्री० देवेन्द्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र
स० न० वि० वि०
सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स.
शर्यत
शर्यत
-------------------------------------------------------------------------------------
‘आक्या, यंदा तुमचा शर्यत जिंकायचा काहीच चान्स नाही ! ‘ राक्या म्हणाला.
तसं आकाशला वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं कारण त्याचे अप्पा दवाखान्यात होते.
[स्वैर] वाळवी वि० बुरशी
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत...
बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा
बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा
==================== ===
मंडळी,
अपेक्षेप्रमाणे युयुत्सुनेट या खेपेला चांगलंच गंडलं. पण क्लेमास्पेस डायाग्रॅमने मात्र लाज राखली...
पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी
पुस्तक परिचय
पुस्तक : लढा आळशीपणाशी
लेखक: चकोर शाह
प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस.
परिचय कर्ता : चकोर शाह.
रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात
भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री:
इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः
वकील
नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे...
गीतारहस्य चिंतन -प्रकरण ५ (सुखदुःखविवेक)
सुखदुःखविवेक -भाग-१
#सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते.
व्याख्या १.
नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत.
व्याख्या-२
फुटपाथवरील एक रात्र लेख नव्याने सादर
मित्रांनो,
मिसळपाव. कॉमवर ११ वर्षांपूर्वी लेख सादर केला होता. आत्ता पर्यंत ७९शेपेक्षा जास्त क्लिक्स पडल्या आहेत.
हवाईदलातील आठवणी सदर सध्या देवेंद्र भुजबळ यांच्या न्यूज स्टोरी टुडे. कॉम पोर्टलवर प्रकाशित होत आहे. मिसळपाववरील घाग्यांचा आठवण ताजी होत असते.
स्वप्निल टीम: दोन लघु कथा
फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारताच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली, भारताचे संविधान लिहिले .
बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा
बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा
======================================
मंडळी,
युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली.
गॅप डाउनमुळे हिरवी मेणबत्ती तयार झाली असली तरी या आठवड्याचा बंद मागच्या आ्ठवड्याच्या बंदच्या खाली आहे. त्यामुळे एकूण परिणाम घसरण हा आहे.
एक आधुनिक सत्यनारायण कथा
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे:
१. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा:
अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती.
- 1 of 999
- next ›