हे ठिकाण

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 5:16 am

मंडळी,

दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

सद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादप्रतिभाविरंगुळाहे ठिकाणसमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

माझी दिवाळी

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
1 Nov 2013 - 7:21 pm

नमस्कार मिपाकरहो,

दिपावली अभिष्टचिंतन!

प्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादअनुभवप्रतिभाविरंगुळाहे ठिकाणसंस्कृतीकलापाकक्रियासमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रण

मै एक चिराग बन जाऊं

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
6 Apr 2020 - 1:19 pm

प्रथमता समस्त मिपाकरांची माफी, या अनेक महिन्यांमध्ये मला मिपावर येता आले नाही..लिहिण्याच सोडा काही वाचता ही आले नाही. मागे एकदा सांगितल्या प्रमाणे काम आणि नविन टेक्नॉलॉजी मुळे वेळ मिळणे खुप अवघड आहे, India deserves better चे पण पुढचे भाग लिहायचे राहिलेच आहेत, विषय आहेत पण लिहिन वेळ मिळेल तसे..
तुर्तास एक साधेसे...

कृपया आपली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला करावी हि विनंती ...

किसीके अंधेरी जिंदगी मे, मै एक चिराग बन जाऊं
धर्म के नाम पे बटे इन्सानियत की, मै रोशनी बन जाऊं

हे ठिकाण

डॉल्फिन्स-बालकथा

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
6 Apr 2020 - 9:51 am

चित्रक यक्षाच्या कथा
--------------------------------
डॉल्फिन्स
---------------------------------------------------------------------------------------------
(घरात अडकून पडलेल्या मुलांसाठी )
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सोनाली कारमधून मागे पळणारी हिरवीगार दाट झाडं पहात होती. तिला कधी एकदा पोचतोय, असं झालं होतं. बाबांना जोडून सुट्टी आली होती. म्हणून त्यांनी कोकणात जायचं ठरवलं होतं. दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर- डॉल्फिन्स पहायला !

हे ठिकाण

लगीनघाई

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
23 Mar 2020 - 10:13 am

लगीनघाई
------------------------------------------------------------------------------------------------

शिवानीचं लग्न मोडलं होतं - हुंडयामुळे ! ...
समाज शिक्षित झाला ; पण सुशिक्षित नाही. अजूनही नाही. मुली शिकल्या. विचार करू लागल्या. घराबाहेर पडल्या. नोकरी करू लागल्या .पण अजुनही मुलीची बाजू पडतीच . हुंड्याचा प्रश्न अजूनही ज्वलंतच ! आईबापांना कर्जात घालणारा . प्रसंगी खड्ड्यात घालणारा.

हे ठिकाण

ऊब

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
15 Feb 2020 - 2:06 pm

ऊब
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सूर्याची किरणं धुक्याच्या हातात हात गुंफून हळूहळू खाली उतरत होती. थंडीचे दिवस होते. असह्य, बोचरी थंडी होती. नकोशी ! हाडं गोठवून टाकणारी.
त्याने डोळे उघडले. थंडीच्या कडाक्याने त्याला रात्रभर झोप नव्हती. एक चादर -कितीशी पुरणार ? त्याचा आत्ताच कुठे पहाटे डोळा लागला होता. तो फुटपाथवर उठून बसला. त्याने कराकरा एकदा डोकं खाजवलं आणि अंगावरची चादर बाजूला केली.
तो एक भिकारी होता !

लेखहे ठिकाण

बालकथा -लाडकं पाखरू

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
30 Dec 2019 - 9:38 pm

बालकथा -लाडकं पाखरू
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिवस चांगला वर आला होता . दिन्या आळोखे - पिळोखे देत उठला . उठल्याबरोबर त्याने उशापासली गलोल चाचपली .
दिन्याची आई चुलीपाशी बसली होती . उन्हाळ्याचे दिवस होते . गरम होत होतं अन चुलीपाशी तर जास्तच .तिने दिन्याला पाहिलं व ती म्हणाली , “ दिनू , लवकर आवर बाळा . मला शेतात जायाचं .बा गेलाय ना फुडं .”

लेखहे ठिकाण