जे न देखे रवी...
अगा जे घडिलेचि नाही
एके दिवशी- दुसर्या प्रहरी- नेत्र उघडता तिसरा
मितीत चवथ्या- झालो दाखल -(खतरा होता जबरा)
पाचावरती धारण बसली - षट्चक्रे लडखडली
सप्तरंग मिसळले वर्णपटी- श्वेतप्रभा लखलखली
अष्टसिद्धी नवविधा भक्तिच्या चरणी शरण जव गेल्या
अनाहताच्या अनुनादाने - दाही दिशा दुमदुमल्या
तू जाताना...
अश्रू जरा ओघळले तू जाताना
ना शब्द ओठी फुटले तू जाताना...
जलप्रलय यावा तैसा पूर नदीला
आभाळ ही कोसळले तू जाताना...
ती रात होती पुनवेची तेव्हा ही
का चांदणे ना पडले तू जाताना...?
हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी
ना फूल कोठे फुलले तू जाताना...
उधळून जीवन गेले तेव्हा माझे
वादळ जरासे उठले तू जाताना...
रापण.....
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
-प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे.
-
तारर्कर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर भटकंतीचा आनंद घेतला.तेव्हां एक वेगळाच अनुभव आला.
धूप के लिए शुक्रिया का गीत (मराठी रूपांतर)
माझे कुटुंब खूप मोठे आहे
आंब्याची सहा झाडे आहेत
दोन जांभळाची
एक लीचीचे झाड आहे
आणि चार कदंब वृक्ष
माझ्या कुटुंबात माझी आई आहे
बाबा आहे
आजोबा आहेत
कुटुंबात दोन म्हशी आहेत
आणि एक गाय
एक काळा कुत्रा देखील आहे
आम्ही तीन बहिणी आहोत
भाऊ अजून झाला नाही
(चुनी कुमारी, इयत्ता सातवी)
कुणासारखी तू, कुणासारखी...
कुणासारखी तू, कुणासारखी
कधी वागते ना मनासारखी.
तू जळासारखी
तू पळासारखी
रंगीत गंधीत फुलासारखी.
तू परीसारखी
तू सरीसारखी
धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी.
गोड स्वप्नापरी
कि तू स्वप्नपरी
निघून जाणाऱ्या पळासारखी.
'काव्यप्रेमी' कायप्पा घोळका विडंबन.
कायप्पा वर कोणीतरी कवितेविषयी एका घोळक्यात मला ओढून घेतलं. असुदे काय घडतं ते पाहू म्हटलं. तर तिथे अनुभवलेल्या सदस्यांच्या काही गंमती जमती, तिथल्या सर्व मान्यवरांची माफी मागून सादर करत आहे. हि सगळी मंडळी हाडाचे कवी आहेत कारण एकमेकांच्या चारोळीला, कवितेला अजिबात दाद ना देण्याचे व्यवच्छेदक लक्षण या सर्व मान्यवरांना लागू पडतं.
पत्र
पत्र तुझे वाचत असताना
नटखट शब्दांपाशी अडतो
गाभुळलेल्या चिंचेचा मग
स्वाद जिभेवर उगा उतरतो
पत्र तुझे वाचत असताना
अडतो अनवट शब्दांपाशी
मग ओळींच्या अधली मधली
लड उलगडते जरा जराशी
तुझे पत्र वाचत असताना
अडतो शब्दांपाशी अवघड
शब्दांच्या घनदाटामध्ये
अर्थाची मग होते पडझड
आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:
भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....
(का या गळ्याच्या तळाशी...)
प्रेरर्णा
दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे,
काळजाच्या या तळाशी राहशी तू.
काळजाच्या या तळाशी राहशी तू
सारखी स्वप्नात माझ्या नांदशी तू.
मागणे ते,"विसरुनी जावे मला तू!"
काय सांगू? प्राण माझा मागशी तू.
प्रेम ना माझे तुझ्यावर सांगताना
का गं आता? या टिपाना ढाळशी तू?
एवढी आता कशी ही बदलली तू
वेचुनी काटे, फुलांशी भांडशी तू.
आठवू मी का तुला? म्हणतेस आणिक
चांदण्या मोजीत का या जागशी तू.
बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना.....
बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना
हाय मै हो गयी बेघर साजना...
तोडलंस माझं घर, तुटेल तुझा गुरूर
एक दिवस येशील, तू पण रस्त्यावर जरूर
बोले चिडीया बोले कंगना
हाय मै हो गयी बेघर साजना...
सुटेल तुझं धनुष्य, पुसेल तुझ नाव
तुझाच बाण करेल, तुझ्याच XXत घाव
बोले चिडीया बोले कंगना
हाय मै हो गयी बेघर साजना...
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले....सुरेश भट
सुरेश भट यांच्या अनेक गीतांपैकी मनाला चटका लावणारे हे गीत दोन वेगळ्या गायकांनी वेगळ्या चालीने म्हणलेले , नक्की ऎका
https://www.youtube.com/watch?v=h8IxIyWkJBw
साद
कुठून येते हे धुके अन्
वेढते भवताल सारे
फिकटल्या चंद्रासवे मग
हरवती अवघेच तारे
कोन ढळती दशदिशांचे
वाट बिनचुक सांगणारे
अन् तमाच्या खोल डोही
वितळती दिग्बंध सारे
गडद ह्या छायेतळी जरी
उमगती गूढार्थ न्यारे
मर्म कोड्यांचे कळे परी
प्रश्न उरती टोचणारे
कळतं रे पण..
कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय,
पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय.
कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय.
येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय?
कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच,
किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच..
तरीही,
उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात,
तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात.
अव्यक्त
मोकलाया मन बोझील माझे, विश्वास शोधत राहीलो मी
अनाकलनीय,अविश्वसनीय सारे चूपचाप बघत राहीलो मी
अष्टावधानी होतो तरिही,अनभिज्ञ राहीलो मी
ती(संधी) समोर होती,तरिही निशब्द राहीलो मी
अविरत,उद्रेक भावनांचा,सावरत राहीलो मी
बांध व्यर्थ आत्मविश्वासाचा, बांधत राहीलो मी
काहीतरी सलत असतं...
काहीतरी सलत असतं
आपणास मात्र कळत नसतं
कुणाच्यातरी आठवणीने मन
आतल्याआत जळत असतं
होवून कधी बेभान
झुलत असतो
फुलासारखं आपण सुध्दा
फुलत असतो
कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं.
अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)
अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी
सहज फिरायला निघालो होतो
सहज मंजे मुद्दामच …
– मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे
– घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो.
नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले
– मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते.
कोs हं ? … मी कोण आहे ?
मै कौन हूँ ? व्हू आयाम ?
आणि बाकी शून्य...
तुझा फोन आला ना की,
चेह-यावर molar to molar हसू उमटतं..
हातातलं काम तिथंच थांबवत मी तव्याखालचा विस्तव विझवते.
केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखते.
मग फोन घेऊन मी कोलाहलापासून दूर बाल्कनीच्या कोप-यात जाते.
आणि रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणते.
सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून तू पटकन कामाकडे वळतोस.
माझं हसू तीन चतुर्थांश होतं..
लिही रे कधीतरी...
लिही रे कधीतरी.
काहीही, अगदी काहीssही चालेल.
पत्र, कविता, दोनोळीची चिठ्ठी पण पळेल.
पण कागदावरच्या शाईला हुंगता आलं पाहिजे.
शब्दांवर बोट अस्संss फिरवता आलं पाहिजे.
मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन,
वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन.
अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप..
मात्रेवर चढताना लागेल धाप..
खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन,
- 1 of 455
- next ›