चप्पल . .
चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .
धर्म नावाचं मूल्य मनात,
असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं
नुसतच," हे असं कसं !? "
असं म्हणून भागत नाही .
एकट्यानीच जगायचं . . ?,
तर मग
यापेक्षा काहीच लागत नाही .
पण टोळीत जगणार ना तुम्ही ?
मग द्यायला हवी हमी .
पत्ते आवडत नसले खेळायला,
तरी जमवावी लागेल रम्मी !
जिंदगीचा डाव शिकायला
मनाविरुद्ध वागावं लागतं .
चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .