शतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :
लेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.
-साहित्य संपादक
भटकंती
शशभ - लाईव्ह भटकंती शंभर शब्दांत :-)
लेटेस्ट ट्रेंडचा भटकंतीत उपयोग होतोय का पाहू म्हंटलं... आणखी एक अॉलमोस्ट लाईव्ह भटकंती! पण यावेळेस टोलेजंग इमारती किंवा स्मारके असे काहीच नसणारे... सुसंस्कृत मानव ते सुसंस्कृत भारतीय ही उत्क्रांती जेथे सुरू झाली त्याचा मागोवा घेत अफगाणी दऱ्याखोऱ्यातली भटकंती हा २०१८ विशेष होता, यावेळेस इतिहासाची आणखी काही पाने, किंबहुना खंड अलिकडे जात आद्य पाउलखुणांचा शोध...
दुबई फिरण्यासाठी -- मार्च महिना
नमस्कार,
मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात सहकुटुंब दुबई फिरण्याचा विचार आहे.
भेट देण्याची मुख्य स्थळे,
१. लेगो लॅण्ड (રૂपार्क / ३ दिवस)
२. डेझर्ट सफारी (१ रात्र)
३. डॉल्फिन मत्स्यालय / स्की दुबई
४. तिकडे गेल्यावर सुचतील ती स्थळे
राजमाची-डाऊन द मेमरी लेन
साल २००२ - आम्ही ४ मित्र एकाच कंपनीत कामाला होतो. चौघेही सडेफटिंग होतो. त्यात आमच्या दोघांचा कॉलेजनंतरचा पहिलाच जॉब होता. रोज रोज तेच तेच काम करून वैतागलो होतो.एक दिवस टूम निघाली की या रविवारी कुठेतरी ट्रेकला जाऊया. पण सगळ्यांनाच ट्रेकिंगची सवय नव्हती, त्यामुळे ट्रेक असा पाहिजे की रूट माहितीचा हवा. ट्रेकची मजा आली पाहिजे आणि शिवाय फार कठीण नसावा.
हंपीला गवसणी भाग 2
मी हंपीला गवसणी घालणार हे आता नक्की झालं होतं. पण त्यापूर्वी आपण जिथे जाणार आहोत त्या जागेच वैशिष्ट्य काय, महत्व काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसा मी एक अभ्यासू आहे असा एक (गैर)समज खूप आधीपासून प्रचलित आहे. मी पण ही झाकली मूठ उघडण्याच्या फंदात कधीच पडलो नाही. असो. तर हंपी इथे नक्की काय आहे हे आंतरजालावर बरचसं वाचायला मिळेल. पण मला ते विस्कळीत स्वरूपात वाटलं.
हंपीची हुलकावणी भाग १
मला हंपीला जावं असं कधी वाटलं हे नक्की आठवत नाही. फक्त एक आठवण आहे ती म्हणजे दहावीला असताना इंग्रजीला आम्हाला पुष्करणी असा धडा होता तेव्हा पुष्करणी आणि हंपी ही दोन्ही नावं खूप आवडली होती. पुष्करणी ह्या प्रकाराला आमच्या इकडे बारव असं अगदीच बोजड म्हणायची पद्धत आहे त्यामुळे हे संस्कृतप्रचुर नाव आवडून गेलं. त्यानंतर हंपी तस विस्मरणातच गेलं. त्याच दुसरं कारण म्हणजे माझी दांडगी विस्मरण शक्ती!
'ट्रेक सांधणदरी, करवली घाट आणि अपरिचित चिकणदर्याचा'
'ट्रेक सांधणदरी, करवली घाट आणि अपरिचित चिकणदर्याचा'
चवणेश्वर अप्रतिम सौंदर्य
चवणेश्वर ' सातारा शहरापासुन पुढे २८ मैल चवणेश्वराच्या पायथ्याशी निसर्गाची कृपा व वनश्रीने नटलेले कंरजखोप गाव आहे.
टँडेम राईड!
फेसबुक वर सायक्लोप नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपवर माझा नवरा श्रीनिवास बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. सायकल ऍडिक्ट तर तो आहेच. त्यात या ग्रुप मधून आणखी ओळखी होऊन नवीन नवीन आयडिया त्याला मिळत असतात. याच ग्रुप वर एक कपल आहे. त्यांचं नाव आहे सनथ रथ आणि प्रतिमा मिश्रा. या दोघांनी टँडेम सायकल घेऊन त्याचे फोटो ग्रुप वर टाकले नि आमच्या साहेबाच्या डोक्यात पण किडा वळवळला.
हंपी आणि हंपी..भाग 2
गाडीने ४ तास घेणाऱ्या प्रवासाला रेल्वेने ६ तास घेऊन एकदाचे ताकारी ला येऊन पोहोचलो . बीबी एक तरफ और बीबी का भाई एक तरफ हे वाक्य सार्थ ठरवत गाडी घेऊन जिजाजी वेळेवर घ्यायला आले.
स्टॅचू ऑफ युनिटी - सरदार पटेलांचा अतिभव्य पुतळा !!!!
३१ ऑक्टोबरला मोदींनी ह्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण केल्यावर कधी एकदा हा पुतळा पाहतो असं झालं होत , माहितीतील बऱ्याच जणांना काही अधिक माहिती आहे का हे विचारून झालेलं पण काहीही माहिती हाती लागली नाही , नंतर एकाशी बोलताना टेन्ट सिटी नावाचं काही तरी राहायला आहे एवढा धागा घेऊन आणि गुगल बाबाला साकडं घालून प्लॅन सुरु केला. २५ ला सकाळी ५:४५ निघून २७ ला रात्री घरी एक मस्त रोड ट्रिप मारून आलो
हंपी आणि हंपी..भाग १
दिवाळीच्या सुट्ट्या आल्या आणि दरवर्षी प्रमाणे पुण्याबाहेरील ऑफिस मधील सहकार्यांना घरी जायला मिळावे म्हणून आम्हाला आमच्या सुट्टीची कुर्बानी द्यायला लागली. हे दर वर्षी असेच असतं . मग ही कुर्बानी आम्ही डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात भरून काढत असतो. ह्याही वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं ठरवत होतो पण कधी तारखा जमत नव्हत्या तर कधी बजेट .
- 1 of 86
- next ›