समुहगीत

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
15 Oct 2020 - 5:29 pm

ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ
शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा
खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा
सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध
धुंद संगीताचा मंद आवाज
"गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी"
बोला आणखी काय हवं?

ganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआठवणीआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचतहानपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीरोमांचकारी.विडम्बनशृंगारसमुहगीतकलानृत्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यऔषधी पाककृतीखरवसगोडाचे पदार्थथंड पेयमेक्सिकनसामुद्रिकमौजमजा

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
18 Dec 2019 - 8:07 am

कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा ।
श्री गणपती देवी पार्वती महादेव
वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा।
सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक
भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा ।
आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।

विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा।
राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।

गणेश पावलेदेशभक्तिप्रेरणात्मकभक्ति गीतमाझ्यासवेमार्गदर्शनमुक्त कविताविठ्ठलशिववंदनासमुहगीतशांतरसकविता

यशाचे आता गा मंगल गान

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
25 Nov 2019 - 10:17 pm

यशाचे आता गा मंगल गान

विजय मिळाला, आनंद झाला,
यशाचे आता गा मंगल गान
बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या,
समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान ||धृ||

बलाढ्य असा तो शत्रू होता,
तोफा बंदूका शस्त्रसज्जता
फंद फितूरी किती करविली,
अंती आपणच ठरलो विजेता
विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१||

युद्धखोरपणा उगा नका दाखवू,
शत्रृ रणांगणी पाहून घेवू
युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस,
लढता लढता मरण पत्करू
शरणागती नसे कदापी, ध्वजासवे उंच करू आमची मान ||२||

- पाषाणभेद
२५/११/२०१९

देशभक्तिसमुहगीतवीररससंगीतकविता

समुहगीतः भारतभूचे सुपुत्र आम्ही

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
12 Nov 2019 - 8:49 am

देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही

भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू
अन तिचेच गावू गान
वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ||

देशासाठी कितीक झटले
कितीक हुतात्मे अमर जाहले
स्मृती तयांची आज येतसे
स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण
त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१||

भक्ति गीतवीररससंगीतकवितादेशभक्तिसमुहगीत