1

षंढ सरकारचा ( कुठलेही असो ) निषेध

# तुम्ही(च) म्हणालात

सुरिया's picture
सुरिया in जे न देखे रवी...
21 May 2021 - 12:48 pm

पेर्णा
मित्रों......

तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही.
व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही.

ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले
प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले.

लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती
लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती

लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर,
लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर.

अदभूतअनर्थशास्त्रआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकैच्याकैकविताकोडाईकनालचाटूगिरीनागपुरी तडकाप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीमदारीलाल कानशीलषंढ सरकारचा ( कुठलेही असो ) निषेधडावी बाजूऔषधोपचारराहती जागाव्यक्तिचित्रणफलज्योतिषराजकारणमौजमजा

फिटेल का हे ऋण माझे

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
31 Dec 2019 - 5:16 pm

फिटेल का हे ऋण माझे

विवंचना आत दाटली

याच काळजीने मीच माझी

वर जागा शोधली

रोप मीच लावले

बघून स्वप्न उद्याचे

काय ठावं , याच जागी

इथेच सुळी चढायचे

रोज रोज तोच सूर्य

तीच आग ओकतो

रोज रोज मीच का पण ?

तेच तेच भोगतो

मीच जर का अन्नदाता

रिक्त का रे चूल माझी ?

घेतला नांगर हाती

हीच का रे भूल माझी ?

ऐकतो सरकारनामे

अभय कर्जांना दिले

फासली पाने पुन्हा ती

भाव तैसेच राहिले

=====================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

जीवनमानबळीराजाला श्रद्धांजलीषंढ सरकारचा ( कुठलेही असो ) निषेध