बरसणाऱ्या सरी|
नभावरची साय
ऊतू ऊतू जाई,
गंधवेडी अवनी
बहरली रानो वनी||१||
फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती ||२||
भिरभिरणाऱ्या अंगणात
फडफडती भिंगोरी पंखात
बरसणाऱ्या सरी धारा
काळजाचा गार निवारा||३||
-भक्ती
नभावरची साय
ऊतू ऊतू जाई,
गंधवेडी अवनी
बहरली रानो वनी||१||
फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती ||२||
भिरभिरणाऱ्या अंगणात
फडफडती भिंगोरी पंखात
बरसणाऱ्या सरी धारा
काळजाचा गार निवारा||३||
-भक्ती
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
आगळा अनुराग
रान हिरवे लाजलेले लाजल्या त्या रानवेली
निर्झराला जाग आली मेघ आले सांजवेळी
कोणता तो जलद वेडा भिजवुनी गेला धरेला
वृक्षगर्भी ओज आले तेज हिरव्या कांकणाला
अंबरावर रेखिली आरक्त नक्षी गूलबक्षी
अन नभाच्या लाजण्याला रक्तवर्णी सुर्य साक्षी
एक रस्ता कोरडासा खेळला त्या पावसाशी
पावले तेथे कळ्यांची नाचली पाण्यात खाशी
साजरी झाली धरित्री लेवुनी बेबंध वारा
वाहले रस यौवनाचे पावसाची बनुन धारा
रात्र गरती होतसे मग जाहले आरक्त डोळे
आगळा अनुराग जागे बरसती ते मेघ ओले
© विशाल कुलकर्णी
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे
काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे!
दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे
की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे!
जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे
जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे!
कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे
शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे!
शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे!
—सत्यजित
नमस्कार. हि माझी दुसरी कविता. माझ्या पहिल्या कवितेचे नाव देखील पहाट धुके हेच होतं. दोन्ही कवितां मधे काहीही फरक नाही. फक्त शब्दरचनेत बदल आहे. फरकच नाही तर मग हि कविता लिहली कशासाठी असेहि वाटु शकते. तर निसर्गाचे अनेक अवतार आहेत, कधी शांत वाटनारा निसर्ग अचानक रौद्र रूप घेतो तर कधी इतका रम्य वाटतो की आपण याच्या प्रेमात पडतो. आणि अशा रम्य क्षणांच कितीही वर्णन केले तरी कमीच आहे. पहाटेची वेळ ही अशाच क्षणाच उदाहरण. शांत वारा, बोचरी थंडी आणि धुक्याची चादर खुपच सुंदर दृश्य, त्याच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे.
.
शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो
नमस्कार , माझं मिपावरील हे पहिलच लिखान आहे. आज पर्यंत फक्त एक मुकवाचक होतो. तर प्रथम थोडं कवितेबद्दल सांगतो. खरतर माझी ही चौथी कविता आहे. पहिल्या तीन कविता लिहलेले कागद हरवल्या नंतर मी एका वहीत कविता लिहायला सुरवात केली. काही दिवसाने ही वहीदेखील हरवली. पण मागच्या दोन महीण्याखाली जुनी पुस्तके चाळताना त्या गठ्ठ्या मधे ही वही सापडली. आणि खजिना सापडल्यासारखा आनंद झाला. आणि त्या कविता पोस्ट करू करू म्हणत आज मुहुर्त आला.
आशा मनात तुझी धुसर धुसर,
मागताना आवाज कातर कातर,
स्मरता जुन्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!
क्लायंट कायम करतो काशी,
म्हणतो पगार कसा छापाल छापाल
मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला
शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!!
डिजाइन टीमची असते बोंब
रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर,
क्यूएची आहे नसती कटकट मागे ,
बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!!
तुझी आठवण आता येतच नाही ,
समजावलय मी या वेड्या मनाला.
पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,
पण या काळजावर दगड ठेवला ..
तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला ,
मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला.
तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे.
पण हळुहळु ती काजळ फिकी पडली.
आता तुला माझी नजर नाही शोधणार ..
कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.
तुझ्या विना खरचं मी काहीच नाही .
पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे.
तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे.
( स्वप्नातली शामली)