जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.
अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे:
**पर्शियन आणि अरेबिक प्रेम:**
पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती,
अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित.
मोहक अदा, नजाकत खास,
प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास.
**उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:**
उर्दू भाषा, नाजूक लाजरी,
पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या.
शब्दांची जादू, भावनांचा खेळ,
सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ.
**उर्दू आणि हिंदी प्रेम:**
अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले.
प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ.
शब्दांची गुंफण, रंगांची उधळण,
दोन भाषांचं, हे अनोखं मिलन.
**भाषा आरती**
जय पर्शियन माता, सुंद
काव्यरस
चला . . कविता लिहू
थोडे तांदूळ ,थोडे गहू
चला . . . कविता लिहू !
शब्द हाताशी, कल्पना मनाशी
जमते का ? .. पाहू !
सुचलेले कागदावरचे, रुचलेले मनातले
अंतऱ यातले ,कळते का ? .. पाहू !
तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले !
चिडचिड संताप , मनस्तापानी भरलेले
येते का बाहेर ! ? .. . पाहू !
काव्य गतीचा न्याय विचित्र
मनातले लपलेले चित्र
सहज निघते बाहेर का, पाहू !
सुरवात म्हणावे, की श्री गणेशा ?
सहज टाकला, आला नकाशा !
आता सांगा तुम्ही, मी पुढे जाऊ ?
----------------------
अतृप्त
स्वतःचे खरे रूप .
स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा
नाही मी भोळा , कळेल मज .
जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे
अन्य कुणीकडे , कळेल निजरूप???
पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त
त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला !
आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ
वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .
ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी
याशिवाय पाठी , नाही काही !
आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप
होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा .
मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे
.
(चकणा जरा)
आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620
मागवतो चकणा जरा
नेक्स्ट पेग आधी
घाल पाणी, घाल सोडा
"कच्ची" पोटास बाधी ||
चालते व्हिस्की किंवा
रम माँन्कच्या वतीने
टाळतो आता बीयर
ढेरी सुटायच्या भीतीने ||
संपवला चकणा पुन्हा
न पिणार्या हातांनी
अन पिणारे केव्हाच गेले
उंच आकाशी विमानी ||
रंगते रात्र पुन्हा अन
पडे गफ्फांचा सडा,
किचन बंद होण्याआधी
मागवु चकणा जरा ||
- टल्ली
* वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे.
(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ
शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा
खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा
सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध
धुंद संगीताचा मंद आवाज
"गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी"
बोला आणखी काय हवं?
काव्यरस
(वळण)
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस
*
देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही
तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते?
पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर
शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास
तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या
चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस?
भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली
परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?
काव्यरस
दुष्ट दुष्ट बायको!
पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू!
)
"कशाला मरतेस?
)
"कशाला मरतेस?(काय करून आलो)
वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)
मिसळपाव