नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे:
**पर्शियन आणि अरेबिक प्रेम:**
पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती,
अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित.
मोहक अदा, नजाकत खास,
प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास.
**उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:**
उर्दू भाषा, नाजूक लाजरी,
पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या.
शब्दांची जादू, भावनांचा खेळ,
सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ.
**उर्दू आणि हिंदी प्रेम:**
अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले.
प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ.
शब्दांची गुंफण, रंगांची उधळण,
दोन भाषांचं, हे अनोखं मिलन.
**भाषा आरती**
जय पर्शियन माता, सुंदर रूप मनोहर,
अरेबिक तरुणावर, तुझा लोभ अपरंपार.
जय अरेबिक देवा, तू शक्तीचा सागर,
पर्शियन-उर्दूच्या मीलनाचा, तूच आधार.
जय उर्दू कन्या, नाजूक लाजरी,
पर्शियन-अरेबिकची तू, लाडकी बाळपरी.
जय हिंदी तरुण, देखणा साजिरा,
उर्दूच्या प्रेमात, तू झालास बावरा.
**आरती**
ओवाळू आरती, भाषांच्या मूर्तींना,
शब्दांच्या रंगांनी, सजलेल्या ज्योतींना.
पर्शियन, उर्दू, हिंदी, त्रिवेणी संगम,
प्रेमाच्या धाग्यांनी, बांधले हे अनुपम.
धूप-दीप-नैवेद्य, अर्पिती राजकारण डावे,
भाषांच्या या मेळाव्यात, रेग्युलर गाते.
शब्दांची ही नाती, अखंड राहो अशी,
भाषांच्या या आरतीने, पूर्ण होवोत इच्छा.
* प्रेर्ना
* काव्य समर्पण : माईसाहेब कुरसूंदीकरांचे श्रीमान, समस्त कथित सेक्युलर, कथित डावे आणिक कोण ?? जो ते वांछिल
* अनुषंगिका पलिकडे अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार
प्रतिक्रिया
17 Apr 2025 - 7:04 pm | माहितगार
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं
17 Apr 2025 - 8:52 pm | प्रसाद गोडबोले
वेल्कम टू द क्लब !
=))))
17 Apr 2025 - 10:56 pm | मुक्त विहारि
साधा उपाय आहे...
भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा.
ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.
18 Apr 2025 - 1:24 am | प्रसाद गोडबोले
आजकाल,
मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)
18 Apr 2025 - 11:46 am | मुक्त विहारि
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते....
असो,
आनंद आहे....
18 Apr 2025 - 1:42 pm | प्रसाद गोडबोले
एकदम खरं आहे .
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे!
फुल्ल मजा आहे ह्या इथे =))))
कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे !
घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो
तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच !
"शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे
"पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे
किंवा
"माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे
सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्या मतदारांनाही !
जात नाही ती जात !
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)
18 Apr 2025 - 3:00 pm | मुक्त विहारि
परखड सत्य....
असो,
आनंद आहे....
18 Apr 2025 - 4:48 pm | कर्नलतपस्वी
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।
यातला कर्तार कुठल्या धम्माचा?
भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका.....
हलकेच घ्या.
18 Apr 2025 - 7:11 am | माहितगार
:))
18 Apr 2025 - 4:54 pm | माहितगार
मी अगदी पुरोगामीच कविता लिहिली आहे :)
18 Apr 2025 - 6:19 pm | विवेकपटाईत
उर्दू भाषा, नाजूक लाजरी,
पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या.
अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा.
फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।।
हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।।
उत्तर- आरसी (दर्पण, आइना)
18 Apr 2025 - 8:25 pm | माहितगार
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया
18 Apr 2025 - 8:38 pm | माहितगार
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.