Skip to main content

श्लोक

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/03/2020 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

श्री वडा-पाव स्तोत्र

लेखक चामुंडराय यांनी गुरुवार, 31/08/2017 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
इंडियन पोटॅटो बर्गरम् जगप्रसिद्ध स्नॅक डिशम् । बॉइल्ड मॅश्ड बटाटम् स्मॉल गोल आकारम् ।। बेसनस्य बॅटर लपेटम् तेलात डीप डीप फ्रायम् । बर्गर बन सँडविच पावम् मिर्ची चटणी सवे सर्व्हम् ।। मराठी व्हेज फास्ट फूडम् क्रिस्पी वडा अन लादीपावम् । स्वस्त गरीबस्य खाद्यम् सर्वत्र हातगाडीस्य उपलब्धम् ।। तेलात पुनर पुनर तळनम् हायजीनस्य पर्वा न करनम् । वन मोअर वन मोअरम् त्वरित चट्टामट्टा करनम् ।। इति श्री वडा-पाव स्तोत्रम्

तर्राट झालं जी...

लेखक सायकलस्वार यांनी शुक्रवार, 20/05/2016 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
खुळखुळ वाजं खिशातऽऽ भलतंच खुललंया आज... बायकुचं चुकवून ड्वाळं… सुमडीत गाठलंया बार अन् झनानलंऽऽऽ बाटल्यामंदीऽऽऽ अन ग्लासातनं व्हटात गेलं जी तर्राट झालं जीऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ.... झिंगून गेलंया सारंऽऽ त्वंडाचं सुटलंया घाण अल्लद झेपावल्यालंऽऽ आभाळामंदी विमान.. ग्यलं व्हटातनं..

करार

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 17/05/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिचे टपोरे डोळे, लांबसडक केस आणि त्यात माळलेला तो मोगर्‍याचा गजरा पण मला ह्यातले काहिच दिसले नव्हते कारण ती माझ्या कडे बघुन जेव्हा हसली तेव्हा तिच्या गालावर पडलेल्या खळीने मी घायाळ झालो होतो. जळी स्थळी, काष्ठी पाषाणी मला तिच दिसत होती प्रेम ही माझी गरज होती लग्न ही तिची मी तिची अडचण समजाउन घेतली आणि मग मी तिच्याशी एक करार केला परत भेटण्याचा. जस प्रेम एकतर्फि होत तसाच हा करार पण होता पण शेवटी करार हा करारच असतो मग मी प्रेम करतच राहिलो आणि ती लग्न करुन निघून गेली पण माझा स्वतःवर विश्र्वास होता आणि तिच्यावरही मी तिची वाट बघत थांबलो

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

ताई दीर तुझा गं वेडा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/08/2014 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.

वसुधैव कुटुंबकम

लेखक आयुर्हित यांनी रविवार, 23/02/2014 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टीव्ही वर सुरु असलेली झी एंटरटेनमेंट इंटरप्राईस ची ही जाहिरात आहे ||वसुधैव कुटुंबकम|| The world is my family
Taxonomy upgrade extras