फाईल बंद
गोव्याचा अथांग समुद्र, निळेशार पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू. आजुबाजुला नारळी फोपळीच्या बागा, समुद्रावरून येणारा ताजा वारा. अशा छान वातावरणात पोलिस सब-इन्स्पेक्टर पाटील बायकोच्या कमरेत हात घालून, गालाला गाल चिकटवून, प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत सेल्फी काढत होते. बायको सुद्धा फारच रंगात आली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच नवरा असा तिच्या हातात आला होता. दोघांचेही कुठे म्हणजे कुठेच लक्ष नव्हते. ते दिवस, तो सहवास संपूच नये असे वाटत होते. फक्त तू आणि मी, मी आणि तू. माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी. दुसरा कोणताच विचार मनात नव्हता आणि तो असण्याचे कारणही नव्हते.