Skip to main content

साजणी आता इथे...

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 13/11/2022 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा. माळता केसात सुमने गगन हे गंधाळले गंध केसातील सारा या इथे उधळून जा. एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1711
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

माळता केसात सुमने गगन हे गंधाळले गंध केसातील सारा या इथे उधळून जा. आवडली