eggs

(दाराआडची आई)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
5 Apr 2019 - 12:51 am

पेरणा...अर्थातच

एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....

-चमचमचांदन्या

eggsgholvidambanअदभूतअनर्थशास्त्रअभय-काव्यअविश्वसनीयआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडगाणेगोवाजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीविडम्बनभयानकहास्यकरुणअद्भुतरसरौद्ररसकविताविडंबनविनोदआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीडावी बाजूपारंपरिक पाककृतीरायतेऔषधोपचारप्रवासभूगोलराहती जागालाडूवन डिश मीलविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणक्रीडाफलज्योतिषराशीमौजमजारेखाटन

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
1 Aug 2018 - 10:28 am

जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!

मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!

क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!

आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!

- संदीप चांदणे

eggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरसकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजा

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Jun 2018 - 9:58 am

(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)

कमिटेड टू हूम
कमिटेड टू व्हॉट

पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?

तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही

तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?

आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस

त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?

आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?

त्यागी आहेस
हे बरे आहे एका अर्थाने

आपल्या अंगच्या वस्त्रांचाही
त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे
जंगलात जाऊन कायमचा
एकांतवास अनुभवून पहाशील का ?

dive aagareggsgholmiss you!अनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआता मला वाटते भितीकखगकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीविठ्ठलमुक्तकमराठी पाककृतीव्यक्तिचित्रणगुंतवणूकचित्रपटस्थिरचित्र

कोलाज

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
4 Jun 2018 - 6:21 pm

खिलजी साहेबांची माफी मागून__/\__

कोलाज १

"(साहेब असेच) ठोकत राहा, लाल करा ओ माझी लाल करा"
दोन भिकारी भीक मागती,
तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या
बाई पलंगावर बसून होती
तिने पेन मागितलं, मी हात दिला
कशी वाटली आमची दहा बाय दहा ?
उगाच वणवा भडकलेला, गजरेवालीने त्यात टाकली माती..
"एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे,"
च्या मायला बॅट हातात घ्यायची होती ...
...
परत पेटेल मेणबत्ती?

कोलाज २

eggsविडंबन

(हे कोहल्यांच्या विराटा)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
3 Feb 2018 - 8:03 am

पेर्णा
शांत निवांत ग्राऊंड
अस्ताला जाणारा धोनी
येऊ घातलेल्या अनुष्काची पॅव्हेलियनमध्ये अस्पष्ट कुजबुज
आताशा डोकं भडकत नाही
आठवते अक्राळविक्राळ वादळ
सहवागचं, धावा पिळवटून काढणारं
उन्मळून टाकणारं
सचिनचं अफाट दर्शन
खरं काय म्हणावं
मन रिझवणारं आयपीएल की मन उध्वस्त करणारं आयपीएल
पैसेवाल्यांच्या या खेळाचा आयोजक कोण
हे कोहल्यांच्या विराटा,
भारताला जिंकून दे!

eggsवीररसविडंबन

Foolपाखरा

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
23 Nov 2017 - 10:36 am
eggsकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडरौद्ररसप्रेमकाव्यकालवणपौष्टिक पदार्थऔषधोपचारकृष्णमुर्ती

(महाग्रु)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Sep 2017 - 11:27 am

(महाग्रु)
पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २

सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी
राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी

आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी
मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी

भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी
माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी

समूळ पिळून्-बोरकर

अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्

eggsअदभूतआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडट्रम्पअद्भुतरसधर्मबालगीतआईस्क्रीमऔषधोपचारकृष्णमुर्ती

(ती पहा पडली गझल)

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
16 May 2017 - 12:50 pm

ती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी
दादही मिळते मला का पानठेल्यासारखी!?

पावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू...
वाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी!

कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते
रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी!

हो!जरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी
उडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी!

काय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या
प्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी

-व्रात्यजित

dive aagareggsमटणाच्या पाककृतीमिसळरस्सारायतेऔषधोपचार

(मुलिंनी धरु नये अबोला)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
25 Dec 2016 - 9:39 am

आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन
माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो.

पेरणा अर्थातच

(मुलिंनी धरु नये अबोला)

मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये
त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो

eggsआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारप्रेम कविताभूछत्रीकरुणसंस्कृतीइतिहासशुद्धलेखनऔषधोपचारकृष्णमुर्ती

(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
11 Dec 2016 - 10:41 am

मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा

फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर

मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..! मनावर

फेरफटका मारण्याचे, आजकाल टाळतो मी
एक एक पाउल उचलणे, जाहले खूप खडतर

तू नको आणूस सुगंध, ऐक वाऱ्या
एक वडा खायचा, होईल मोह अनावर

नुकतेच जरीही, जेवण असले जाहले ना
काकडी-खिचडी, सहज खायचो मी त्या नंतर

eggsअदभूतआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कवितारौद्ररसपाकक्रियावाङ्मयऔषधोपचारकृष्णमुर्तीशिक्षण