नको ना रे
नको रे नको
नको म्हटलं ना
नको
नक्को ना. नको.
अं हं
न
नको
न न
नको
नक्को ना रे
नको
नको रे नको
नको म्हटलं ना
नको
नक्को ना. नको.
अं हं
न
नको
न न
नको
नक्को ना रे
नको
कोकिळा गप्प झाली का
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई
कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही
गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.
सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका...
पेरणा, प्राची ताईची ही कविता
http://www.misalpav.com/node/49553
प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?)
स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून.
मुलांना संस्कार
पालकांचे कर्तव्य
पालकांवर संस्कार
मुलाचे कर्तव्य !!
वय वाढलं म्हणजे
अक्कल येतेच असं नाही
दर वेळी बचावाला
वकिल येतोच असे नाही
ब्राम्हणांविषयी बापाचे अपशब्द
नशिबाने विवेकी मुलगा उपलब्ध
मुलगा CM भूपेश 'बघेल'
बाप नंदकुमार ला जेल!!
https://www.lokmat.com/crime/chief-minister-bhupesh-baghels-father-arres... मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना
अनंताच्या यात्रेसाठी
जय्यत तयारी केली आहे
चांदणचुर्याचे भूकलाडू
हिमनगांचे तहानलाडू
(तहानभूक हरपू दे पण)
रसद टकाटक तयार आहे
प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
होल्डाॅलमध्ये भरला आहे
दिशा कोन ढळून जातील
घड्याळ काटे उलटे फिरतील
उद्याच्या बातम्या काल कळतील
याची तयारी ठेवली आहे
मुक्कामाला पोचलो तर
दृृृष्ट तिथे काढतील माझी
त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप
काजळडब्बी घेतली आहे
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
बातमी : सिंचन घोटाळ्यात अजीत पवारांना क्लीनचीट
https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/n...
धूतपापेश्वर
जसा वाढू लागला
अपराध
तशी वाढली गरज
उद्धार-हात
काहींनी मिळवली
यावर डाॅक्टरी
आणि उघडली
क्लीनचीट ची फॅक्टरी
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती
नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी
शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी
टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे
त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा
नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे
साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा
पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली
एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! )
वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)