इंद्रायणीकाठी
इंद्रायणी काठी
सुंदर कुंडमळा
वैष्णवांचा मेळा
दाटतो इथे....
पावसाची झडी
इंद्रायणी दुथडी
वैष्णवांची दाटी
इंद्रायणीकाठी......
एकच तो सांधा
वैष्णवांचा वांधा
आड्याल पड्याल
कसे जावे....
विकांती आकांत
एक्याजागी दाटला
सहावेना भार
वैष्णवांचा....
शेल्फ्या,तूनळ्यांची
उडाली एकच घाई
पायपोस कुणाचा
कुणाच्या पायी?....
थरारला सांधा
पेकाट मोडले
वैष्णव अवघे
सांडले,इंद्रायणी
भितोत्सवे आता
उठला कल्लोळ
उडाला गोंधळ
भावीकांचा...