धोरण

इन्शुरन्स कंपन्यांची फसवेगिरी

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
30 Nov 2022 - 12:58 pm

पॉलिसी च्या नावाखाली इन्शुरन्स कंपन्या सामान्य माणसाची कशी मनमानी लूट करत आहेत, याचा नुकताच अनुभव आला.
२००९ मध्ये मी पीएनबी मेटलाईफ कंपनीकडून एक युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली. वर्षाला एक लाख हप्ता आणि पुढची ५६ वर्षे १५ लाखाचे जीवनविमा कव्हर. पहिले ३ हप्ते कंपल्सरी नंतर ऑप्शनल.
मी पॉलिसी घेतली आणि दोनच वर्षांनी सदर पॉलिसी नवीन ग्राहकांसाठी बंद करण्यात आली.

धोरणप्रकटनअनुभव

श्रीदासबोध : दुश्चितपणा आणि राजाची सुरक्षा.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Jun 2022 - 12:21 pm

समर्थांनी छत्रपति संभाजीराजेंना उद्देश्यून एक पत्र लिहले होते त्या पत्राची सुरवात "अखंड सावधान राहावे, दुश्चित कदापि नसावे" या ओळीने केली होती. इथे दुश्चितपणाचा एक अर्थ असावधान, बेफिकीर असा होतो. राजा सुरक्षित असेल तर राज्य सुरक्षित राहते. एका सुरक्षित राज्यातच प्रजा संपन्न आणि सुखी राहू शकते. प्रजेच्या हितासाठी राजाची सुरक्षाही सर्वोपरी असते. राजाच्या सुरक्षेची जवाबदारी राजाचे सुरक्षा सल्लागार, सचिव आणि अंगरक्षक यांच्यावर असते. त्यांना नेहमीच अखंड सावधान राहण्याची गरज असते.

धोरणविचार

प्रसन्नतेच्या लहरी!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 May 2022 - 7:23 pm

नमस्कार. आजपर्यंत अनेक वेळेस मुलांना आकाशातल्या गमती दाखवल्या होत्या. वेगवेगळे तारे, ग्रह आणि चंद्रावरचे खड्डे बघताना मुलांच्या चेह-यावर येणारा आनंद आणि त्यांना होणारं समाधान नेहमीच अतिशय ऊर्जा देऊन जातं. 'ऑ! अरे बापरे!' 'ओह माय गॉड' अशी एक एक दृश्य बघतानाची मुलांची (आणि वयाने जास्त असलेल्या मुलांचीही) प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. त्यासारखाच पण थोडा वेगळा असा सुखद अनुभव आज घेता आला. निमित्त होतं परभणीतल्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामधल्या मुलांच्या सुट्टीतील शिबिरामध्ये घेतलेल्या ज्ञान रंजन अर्थात् fun and learn सत्राचं.

धोरणसमाजलेखअनुभव

भारतातील रस्ते-अपघात

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
25 Apr 2022 - 10:15 pm

मी आणि माझी बहीण गाडी चालवत असलो तर रस्त्यावर अन्य चालकांना शिव्या घालत आमचा प्रवास सुरु असतो. अर्थात, असे चालक दरवेळी आम्हाला काही त्रास देतात असे नव्हे, मात्र त्यांचे वागणे अन्य लोकांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकते म्हणून आम्ही त्यांना शिव्या घालतो, आमच्याच गाडीच्या बाहेर ऐकू जाणार नाहीत एवढ्याच आवाजात.

धोरणलेख

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
24 Apr 2022 - 5:49 pm

आङळे वाङळें साहित्य संमेलन

आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?

वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?

cyclingdive aagarfestivalsgholpineapplesahyadriअननसअनर्थशास्त्रअव्यक्तआठवणीआयुष्याच्या वाटेवरकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेतीहास्यधोरणमुक्तकविनोदउपहाराचे पदार्थलाडूवडेव्यक्तिचित्रसुकी भाजीमौजमजारेखाटन

मिपाकर होता होता .....

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
13 Apr 2022 - 5:49 pm

सात-आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट, असाच फेसबुकवर चरत (पक्षी : ब्राउजिंग) होतो. अचानक एक चित्र दृष्टीस पडले. अतिशय साधे, काही मोजक्या रेषा. साधारणपणे सरळच. त्या रेखाटनातून दिसणारं सौंदर्य, साधणारा परिणाम, व्यक्त होणारा आशय मला अतिशय आवडला. अर्थात लाईक आणि कमेंट दिली. चित्रकाराचे नाव वाचले. श्रीनिवास कारखानीस. लक्षात राहील असे नाव. फेसबुक बघता बघता या नावाचा आणि चित्रांचा डोळे वेध घेऊ लागले. दिसले रेखाटन की त्याचा आस्वाद घेणे सुरू झाले. लाईक आणि कमेंट दिली जायचीच. मी त्यांच्या चित्रकलेचा चाहता होऊन गेलो. फेबु मेसेंजरवर त्यांच्याशी हॅलो हाय सुरू झाले.

धोरणअनुभव