काथ्याकूट
वार्तालाप : मनातील मूषक वृतीला दूर करा.
अप त्यम् परिपन्थिनम् मुषीवाणम् हुरःचितम् ।
दूरम् अधि स्रुतेः अज॥
(ऋ.१/४२/३)
वार्तालाप: सकारात्मक विचारांसाठी मनाचे श्लोक
मनात विचार उत्पन्न होतात, विचारांनी स्मृति तैयार होतात आणि स्मृतिच्या निर्देशानुसार आपण कृती करतो. मनात सकारात्मक विचार उत्पन्न होतील तर कृती ही सकारात्मक होणार. मनात नकारात्मक विचार उत्पन्न झाले की आपण नकारात्मक कृती उदा. तळीरामाणे दारू पिणे, शिव्या देणे किंवा हत्या इत्यादि घृणीत कृती ही आपण करू शकतो. मन तर अभौतिक आहे, त्यात विवेक पूर्ण सकारात्मक विचार कसे भरावे, हा मोठा प्रश्न आहे?
सध्या मी काय पाहतोय ? भाग ११
माझ्या आयुष्यातील छोटासा भाग चाळीत गेला आहे, त्यामुळेच चाळी बद्धलची आत्मियता अजुनही मनात कुठेतरी घर करुन आहे.
वार्तालाप : मनातील विचार - सकारात्मक आणि नकारात्मक
समुद्रात जेवढा लाटा उसळत नाही त्याच्यापेक्षा जास्त विचार तरंगा मानवाच्या मनात सदैव उसळी भरत राहतात. सृष्टी कर्त्याच्या मनात विचार आला आणि या ब्रह्मांडाची रचना झाली. आपले प्राचीन ऋषी म्हणतात 'जे काही ब्रम्हांडात आहे ते पिंडामध्येही' आहे. प्रत्येक सूष्म कोशाचे ही स्वतंत्र अस्तित्व आहे. एका कोशातील विचार ही ब्रम्हांडाची निर्मिती करण्यास समर्थ आहे.
हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) तांदूळ
आजकाल ऑरगॅनिक म्हणून भरपूर किंमत वसूल करून शेवटी फसवणूक करण्याची वृत्ती वाढली आहे
सामान्य माणूस फसवलाच जात आहे .
म्हणून हा विषय घेऊन चर्चा अपेक्षित
हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) तांदूळ -
१) किमान ओळख (पारख) कशी करावी ?
२) साधारणतः योग्य किंमत काय असावी ?
३) आरोग्यदायी फायद्यासाठी तांदूळ किती जुना असावा ?
(महाराष्ट्रातल्या लोकांसाठी) तुमच्या कार्यालयात तुम्ही अनौपचारीकपणे कुठल्या भाषेत बोलता?
परवा काही कारणाने बॅकेत गेलो होतो. बँक अगदी पुण्यात, मध्यवर्ती मराठी भागात. पण Relationship Manager, त्याचा रिपोर्टीग मॅनेजर बिहारी, आणि स्वतः ब्रँच मॅनेजर अमराठी. बाकी बराच स्टाफ मराठी असूनही पहिले वाक्य इंग्लिशमधे, पण दुसर्या वाक्यापासूनच हिंदीच सुरु झाले, राहिले.
पेन्शनचा फक्त वयाशी संबंध असावा नोकरीच्या प्रकाराशी नव्हे...
आता महाराष्ट्रात सरकारी नोकरांना जूनी पेन्शन लागू करण्याची मागणी जोर धरतेय. मतांच्या राजकारणापायी ती मंजूरही नक्कीच होईल कारण राज्याच्या आर्थिक परिस्थितीशी सरकारी नोकरांना काही घेणेदेणे नाही. आज सरकारी व खाजगी क्षेत्रातील सेवानिवृत्तांच्या पेन्शनमधली तफावत पाहीली तर धक्कादायक परिस्थिती आढळते.
अनोळखी व्यक्तीस ऑनलाईन आर्थिक मदत
समाजात अनेक जणांवर अचानक काही ना काही शारीरिक आपत्ती ओढवते- जसे की अपघात, गंभीर आजार आणि त्याची शेवटची अवस्था. अशा प्रसंगी मोठी आर्थिक तरतूद करण्याची वेळ येते. ज्यांच्या बाबतीत अशी कौटुंबिक तरतूद करता येणे अवघड असते, ते लोक आर्थिक मदतीसाठी निरनिराळ्या वृत्त आणि समाजमाध्यमांमधून आवाहन करतात. आपणही बऱ्याच वेळा अशा प्रकारची आवाहने वाचतो.
हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण
गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली.
https://hindenburgresearch.com/adani/
Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History
भारताबाहेरील राजकारणातील मराठी लोक
भारताबाहेरील काहि मराठी राजकारणी ( स्थानिक आणि काही राष्ट्रीय संसदेतील )
पण कधीतरी अमेरिकेच्या / पाश्चिमात्यांच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी
उपयोजक यांन्च्य्या धाग्यात :" पण कधीतरी अमेरिकेच्या (पाश्चिमात्यांच्या " दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी"
असे होते , त्यातून हि विचार मांडत आहे
आधीच क्षमा मागतो कि हे अमेरिके बद्दल नाही .. याच कारण कि "पाश्चिमात्य देश म्हणजे काही फक्त अमेरिका नव्हे "
मदत हवी आहे - कोरिया भ्रमण
दक्षिण कोरियाला ( जोंगि ) ३०-४५ दिवस ट्रेनिंग साठी जावयाचे आहे . तर पुढील संदर्भात माहिती हवी होती
१. शाकाहारी जेवण उपलब्धता - भारतातून डाळ व तत्सम पदार्थ कोरियात विमानातून नेऊ शकतो का ?
२. हवामान - जबर थंडी चा मोसम आहे तर हीटर व तत्सम कपडे रास्त दारात उपलब्ध होतील का भारतातून आणणे श्रेयस्कर ?
येती एअरलाइन्स फ्लाइट ६९१. अ क्रॅश इन कॅव्हॉक ..
कॅव्हॉक हा शब्द पायलट्स अगदी रोजच्या बोलण्यात वापरतात. त्याचा अर्थ आहे सीलिंग अँड व्हिजिबिलिटी ओके.
नेपाळच्या पोखरा एअरपोर्ट वर अगदी उतरता उतरता एक एटीआर ७२ विमान क्रॅश झालं आहे. तर अत्यंत स्वच्छ अशा cavok हवामानात हे विमान क्रॅश झालं आहे.
४) भारतीय विचार - सुधारक (progressive) विचार आणि भारतीय अध्यात्म
सुधारक (progressive) विचार आणि भारतीय अध्यात्म यात मूळ दोन मुद्दे आहेत. हे मुद्दे मांडण्यासाठी थोडी पार्श्वभूमी गरजेची आहे. युरोपियन रेनेसां (वैचारिक क्रांती) मुळं ‘Age of reasoning’ आणि ‘Enlightenment’ मधून मनुष्य समाजात मूलभूत बदल झाले. त्याचा परिपाक पुढे औद्योगिक क्रांती होण्यात झाला. यातून व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य, समता, लोकशाही ही मुल्ये विकसीत झाली.
कॅटसाठी मार्गदर्शन हवाय
नमस्कार , माझी कन्या सध्या पुण्यामध्ये फर्स्ट इयर बीबीए करतेय. २ वर्षानंतर कॅट साठी किंवा नामांकित बी स्कूल मध्ये एमबीए साठी प्रवेश घेण्यासाठी तयारी कशी करावी आणि दोन वर्ष्यामध्ये आणखी काय काय कोर्स करता येईल कि जेणेकरून पुढील करिअर मी मध्ये उपयोगी पडतील जसे कि .. भाषा , ऍडव्हान्स एक्सेल , इंग्लिश स्पिकिंग, डिजिटल मार्केटिंग .
- 1 of 358
- next ›