Skip to main content

नाट्य

’मी...ग़ालिब' ला भेटताना...

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 22/07/2014 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब! आपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला.

संवादिका - ३

लेखक प्रास यांनी रविवार, 22/06/2014 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
"आहेस का रे?" "आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे." "तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?" "व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?" "माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला." "असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D" "नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..." "असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?" "तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?" "काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?" "चेष्टा नकोय रे!

बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 05/06/2014 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे.

पुन्हा..........

हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात.

सेहेवागी पोवाडा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 30/05/2014 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
जय हो..
जय हो..

जय हो..

(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...!
काव्यरस

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/05/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

मिट्ट

लेखक विकास यांनी सोमवार, 24/02/2014 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महीन्यापासून बघण्याचे डोक्यात असलेला एक माहितीपट बघायची संधी मिळाली... भारतीय निवडणुकांच्या हंगामात अमेरीकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एका राजकारण्याच्या व्यक्तीगत वर्तनाची एक झलक बघताना नकळत तुलना होते. अर्थात येथे कुठे कुणाला आदर्श समजत नसून आपण कुठले वर्तन मिस करत आहोत इतकेच डोक्यात येते... त्या माहितीपटाचे नाव आहे MITT. अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार मिट्ट रॉमनी यांच्यावरील हा वेगळ्याच पद्धतीने घेतलेला माहितीपट आहे. २००६ साली सर्वप्रथम मिट्ट रॉमनी यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले.

नवि कोरी सिरियल...........सुन मी बावरी..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 18/02/2014 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवि कोरी सिरियल...........सुन मी बावरी.. ------------------------------------------------------ श्री व जान्हवी ला तन्वी नावाची मुलगी झालेली असते.व ति कॉलेजला जात असते.. आईआजी देवाघरी गेलेली असते..श्री ची आई म्हातारी झालेली असते.. सोडुन दिलेल्या व टाकुन दिलेल्ल्या गोखल्यांच्या लेकि सुना नव~या बरोबर नांदत असतात.. आपटे म्हातारा झाला असला तरी त्याची लग्नाची इछ्या असतेच.. जान्हविचे आईबाब पण या जगात नसतात... इकडे राधेला पण एक मुलगा असतो..बॉबी नावाचा... सौरभ चे अजुन नोकरी शोधणे चालुच असते..दादा, घारु अण्णा यांचे फोटो भिंतिवर लटलेले असतात..केदार निराळा रहात असतो.. राधासुत बॉबी कॉलेजमधे जातो व मालिकेच्

वासकसज्जा

लेखक रामदास यांनी रविवार, 09/02/2014 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी एका संध्याकाळी एका पत्रकार मित्राचा फोन आला. "रात्री साडेआठ वाजता आमच्या पाणवठ्यावर येणे." (माझा पाणवठा वेगळा आहे.).वेळेवर पोहचलो. मित्रासोबत आणखी दोघं तिघं बसले होते.पुनराचम्य... वगैरे झाल्यावर चर्चा मुद्द्यावर आली." रामदास, एका चित्रपटाचे संवाद लिहायचे आहेत." मी नकारार्थी मान हलवली.मग बराच आग्रह झाल्यावर मला पटलं की माझ्यात काहीही काम करण्याचे सामर्थ्य आहे.