गोंधळ

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
26 Aug 2014 - 2:42 pm

सखे तू जवळ नसतांना
तुझे डोळे फार गोंधळ घालतात
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
------
गोठलेल्या शाईसारखी काळी रात्र
आणि थंड पडलेल्या
इवलाश्या खिडकीतून दिसणारी
ती लोभस चंद्रकोर...
तुझ्या डोळ्यांचा आभास निर्माण करतात
आणि मग फार गोंधळ होतो...
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
--------
सखे तू जवळ नसतांना
बघता बघता कोर्‍या कागदाची कविता होते
झरझर लेखणी शब्द पाझरते...
कविता तुझे वर्णन करायला लागते
तुझ्या डोळ्यातल्या अगणित छटांमध्ये गुरफटते
मग तिचाच गोंधळ होतो, आणि
सगळीच आंधळी कोशिंबीर होऊन बसते
नुसताच गोंधळ, आणि मग
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
--------
सखे तू जवळ नसतांना
माझा सगळाच नाईलाज असतो
कधी अचानक एखादा चुकार अश्रु
पापण्यांची सिमारेषा ओलांडतो
तर कधी एखादा उसासा निसटतो
अश्या डबडबलेल्या अवस्थेत
चुकुन आरशाकडे लक्ष गेले
तर परत तुझे डोळे...
माझी समजूत काढत असतात
तेव्हा तर मी अजूनच बावरतो
मला तर ती नजर चुकवायची असते
पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही
असा सगळा गोंधळ होऊन बसतो...
अन् मग
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(एक जुनीच रचना, जुनी आहे जे जाणवल्यास मंडळ जबावदार नाही ;) )

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

एस's picture

26 Aug 2014 - 2:44 pm | एस

आणि मग ना घेणं ना देणं, फुकाचे कंदिल लागणार...

मस्तच! आणि मी पयला!

गवि's picture

26 Aug 2014 - 2:48 pm | गवि

छान आहे रे..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Aug 2014 - 2:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अलभ्य लाभ!! गविंची प्रतिक्रिया आली... कविता सार्थकी लागली... द्येवा __/\__!!

चढवू नको मेल्या उगाच.. जमली नाहीसे वाटले की तसेही लिवतोच की..

येऊ दे दिवाळीसाठीही एकदम फटाका कविता एक.

स्पा's picture

26 Aug 2014 - 3:00 pm | स्पा

अश्या डबडबलेल्या अवस्थेत
चुकुन आरशाकडे लक्ष गेले
तर परत तुझे डोळे...
माझी समजूत काढत असतात
तेव्हा तर मी अजूनच बावरतो
मला तर ती नजर चुकवायची असते
पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही

कातिल __/\__

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Aug 2014 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त रे मिका,

फारच आवडली

पैजारबुवा,

अजया's picture

26 Aug 2014 - 4:19 pm | अजया

खूप आवडली कविता!

सूड's picture

26 Aug 2014 - 4:26 pm | सूड

आवडली हेवेसांनल

सस्नेह's picture

26 Aug 2014 - 4:28 pm | सस्नेह

इतका गोंधळ माजत असेल तर आपलं त्या डोळ्यांसमोरच रहावं ना नेहमी !
मुक्त कविता मस्त आहे !

वा वा वा! काय सोप्पं करून टाकलंन् तुम्ही. :-)

पैसा's picture

26 Aug 2014 - 5:00 pm | पैसा

वाचायची मागे ठेवली होती. धन्याबाबांच्या किरपेमुळे आधी वाचावीच लागली!

कविता झक्कास!

कवितानागेश's picture

26 Aug 2014 - 9:26 pm | कवितानागेश

खरोखरच उत्कट होत जातेय कविता... :)

इनिगोय's picture

26 Aug 2014 - 10:43 pm | इनिगोय

मस्त रे! एकदम आवडली.

प्यारे१'s picture

27 Aug 2014 - 12:27 pm | प्यारे१

मस्तच रे मिका!

माझी मस्जिदची दौड : विनाकारण ऐवजी दुसरा कुठला शब्द वापरता येईल का?
तेवढाच 'जास्त' गद्य वाटतोय. गद्यच हवाय हे ठाऊक आहे.
'अकारण' शोभेल?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Aug 2014 - 12:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खरय तुझं :)

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2014 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

'उगाच' किंवा 'उगीचच' चालेल का?

इनिगोय's picture

28 Aug 2014 - 6:17 am | इनिगोय

+१४३
उगीचच उत्कट..

विवेकपटाईत's picture

27 Aug 2014 - 3:10 pm | विवेकपटाईत

आवडली

चाणक्य's picture

28 Aug 2014 - 6:13 am | चाणक्य

मिका...बेश्ट बेश्ट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2014 - 6:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सखे तू जवळ असतांना
माझा सगळाच नाईलाज असतो. :)

-दिलीप बिरुटे
(उत्कट)

एस's picture

28 Aug 2014 - 2:15 pm | एस

ठसका लागला! :-)) शेमशेम!

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 7:56 am | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

रुमानी's picture

30 Aug 2014 - 12:27 pm | रुमानी

सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं:)
कविता आवडली..!