Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 05/30/2014 - 23:42
जय हो..
जय हो..

जय हो..

(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...! (गद्य) मृत्युच्या छायेत असतांना..मृत्युच्या छायेत असतांना.. मरणाची धुंदी चढावी..आणि बेधुंssssद मस्ती करावी..हा या शिलेदाराचा जन्मजात स्वभाव..खास बाणा!

पेटली पुन्हा ती आग...

हो sssssssss ओ..ओ..ओ...ओ..ओsssssssss

पेटली पुन्हा ती आग,मृत्युची बाग तिथे बॉलरचा होई खात्मा...तिथे बॉलरचा होई खात्मा सांगे सेहेवाग कथा आत्मा... हो जी..जी..जी..! ॥धृ॥ धन्य धन्य उपरी कट,मारी तो खट.. तसा कोणाही नाही जमला...तसा कोणाही नाही जमला ऐसा खतरा हा वीर मामला...हो..जी..जी..जी..॥१॥ तडतडा फोडे तो चेंडू, झोडे जसा झेंडू चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात..चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात बॉलरं लावी कपाळा हात...जी..जी..जी..॥२॥ बाऊंड्य्रा आणि सिक्सरं,मारी अक्सरं जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल,जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल किती पाजी-बॉलरा..हा...ल हलाहल जी..जी..जी॥३॥ किती मारले??? नाही गणंतीत..धाडले पणंतीत.. तयांचे फोटो लटकले खास!..तयांचे फोटो लटकले खास! जरी वाटली तुम्हा बकवाsssस..जी..जी..जी..॥४॥ ऐश्या या धडाकेबाजा,म्हणीन मी राजा रनांचा गडी पॉssवर..बाज,रनांचा गडी पॉssवर..बाज राssखिली कैकदा लाज..हो..जी..जी..जी॥५॥ तेंडल्या ढाणा होता वाघ,तरी ही बाग आपुल्या परि तिथे फुलली..आपुल्या परि तिथे फुलली.. आता तारीफ मनी उरली..हो जी..जी..जी॥६॥ चला घेतो अता आंम्ही रजा,पाहुनी मजा आत्मा हा खूssषं लै झाला..आत्मा हा खूssषं लै झाला.. पssवाडा लिवन्या योग-पहिला __/\__ हो जी..जी..जी॥७॥ ================================ सदर पोवाड्यावर आजच्या मॅचची(किंग्ज पंजाब वि. चैन्नई सु.किंग्ज) गडद छाया असली..तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल! :) या अगोदरचे शीर्षकः आग...आग...सेहेवाग!!! :D - एक आत्मि'क ;) पोवाडा!

Submitted by प्रचेतस on Sat, 05/31/2014 - 00:00

Permalink

जबरदस्त. लै मजा आली वाचून.

जबरदस्त. लै मजा आली वाचून.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 05/31/2014 - 08:53

Permalink

आग.... आग....

आग.... आग.... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .जिलबी!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 05/31/2014 - 09:22

In reply to आग.... आग.... by स्पा

Permalink

हलकट पांडू-घे डोसक्यात दांडू!

हलकट पांडूImage removed.-घे डोसक्यात दांडू! ..........Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/04/2014 - 14:49

In reply to हलकट पांडू-घे डोसक्यात दांडू! by अत्रुप्त आत्मा

Permalink

स्पांडू आणि दांडूचे अनिवार

स्पांडू आणि दांडूचे अनिवार सान्निध्य हा एक रोचक विषय आहे. हो की नै लोक्स ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 06/04/2014 - 15:21

In reply to स्पांडू आणि दांडूचे अनिवार by बॅटमॅन

Permalink

(No subject)

Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 05/31/2014 - 09:04

Permalink

सुंदर पोवाडा

आम्ही तेंडल्या-सेहवाघ्-द्रवीड अशी बिनडोक तुलना करणार्या "जित्राबांना"(बुवा तुम्ही कुठेही तुलना केली नाही तेव्हा सबब ही उपमा तुम्हाला नाहीच्)माफ करतो. पंचपक्वानाच्या थाळीत हरेक पदार्थाने (त्याच्या स्वादाने) परिपूर्णता येते तसे या त्रिमूर्तीचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 05/31/2014 - 09:23

Permalink

मस्त

झक्कास..
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sat, 05/31/2014 - 09:26

Permalink

ब-याच काळाने "वीरू" दिसला!!

:-) ब-याच काळाने "वीरू" दिसला!!
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sat, 05/31/2014 - 11:18

Permalink

वा:

आत्मूस, ररा पण खुष झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 05/31/2014 - 13:03

Permalink

लै भारी !

लै भारी ! वीरूने मारला शॉट, चेंडू उडाला भन्नाट जाई कुंपणापार... जाई कुंपणापार अआच्या वीरूप्रेमाला येई पूर...हो..जी..जी..जी..॥
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Sat, 05/31/2014 - 14:23

Permalink

पोवाड्याचे रसग्रहण मला करता

पोवाड्याचे रसग्रहण मला करता येत नाही पण सेहवाग आपला खास. तो खेळपट्टीवर असेपर्यंत एंटरटेनमेंट चालतच राहणार याची फुल्ल ग्यारंटी आणि तोपर्यंत आपण टीव्हीसमोरून काही हलत नाही. नवीन चेंडू फोडणारा त्यासम तोच .
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 05/31/2014 - 14:56

Permalink

कडक

सल्युट तुमा, सय्वाग अन सचिनला बी
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 05/31/2014 - 14:57

Permalink

२०१५ मधील विश्वचषकासाठी

२०१५ मधील विश्वचषकासाठी सेहवाग संघात पाहिजेच. त्याच्याशिवाय मजा नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 06/02/2014 - 17:42

Permalink

बुवा मस्त हो... ऑडीओ आहे का

बुवा मस्त हो... ऑडीओ आहे का याचा?
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 06/03/2014 - 01:18

Permalink

फटॅक शॉट एकदम

फटॅक शॉट एकदम
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/03/2014 - 16:50

Permalink

डोंगराला आग लागली पळा पळा !!

डोंगराला आग लागली पळा पळा !!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 06/03/2014 - 20:00

In reply to डोंगराला आग लागली पळा पळा !! by सूड

Permalink

या कुज कट शास्त्रींचा अवळा

या कुज कट शास्त्रींचा अवळा गळा!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 06/03/2014 - 20:01

In reply to डोंगराला आग लागली पळा पळा !! by सूड

Permalink

या कुज कट शास्त्रींचा अवळा

या कुज कट शास्त्रींचा अवळा गळा!!! =)) :p
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 06/03/2014 - 21:45

Permalink

कोणता खेळ म्हणे हा?

कोणता खेळ म्हणे हा?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 10/21/2015 - 19:09

Permalink

अफाट फलंदाज.

अफाट फलंदाज. वीरूच्या निवृत्तीच्या निमित्ताने हा पोवाडा आठवला.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 10/21/2015 - 23:02

In reply to अफाट फलंदाज. by प्रचेतस

Permalink

थेंकु आगोबा! :)

थेंकु आगोबा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Wed, 10/21/2015 - 19:45

Permalink

पुन्हा एकदा आत्मूस राॅक्स!

पुन्हा एकदा आत्मूस राॅक्स! आत्मूकाकांचा पंखा! -मांत्रिक
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Wed, 10/21/2015 - 20:27

In reply to पुन्हा एकदा आत्मूस राॅक्स! by मांत्रिक

Permalink

साॅरी!!!

साॅरी!!! पुन्हा एकदा अत्मूस राॅक्स! अत्मूकाकांचा पंखा! -मंत्रिक असं असायला पहिजे!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Wed, 10/21/2015 - 19:53

Permalink

किती मारले??? नाही गणंतीत.

किती मारले??? नाही गणंतीत..धाडले पणंतीत.. तयांचे फोटो लटकले खास!..तयांचे फोटो लटकले खास! हे खासच.. आवड्यास ना भौ...
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 10/21/2015 - 19:57

Permalink

कविता आवडली. सहवागचा खेळ

कविता आवडली. सहवागचा खेळ पाहताना निश्चित मजा यायची. पण शेवटी कालाय तस्मे नम: ....
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 10/22/2015 - 01:03

Permalink

आवडला पोवाडा!

आवडला पोवाडा!
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on गुरुवार, 10/22/2015 - 03:33

Permalink

भन्नाट!

लै भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 10/22/2015 - 10:18

Permalink

बुवा आता

बुवा आता पुढच्या भेटीत मी हाच पोवाडा खड्या आवाजात गाउन ऐकवणार ! जबरी !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 10/22/2015 - 15:52

In reply to बुवा आता by चौकटराजा

Permalink

अरे ...जरूर!!!

अरे ...जरूर!!! हम दूसरी छोर से साथ करेंगे :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 10/22/2015 - 15:59

In reply to अरे ...जरूर!!! by अत्रुप्त आत्मा

Permalink

मी "जी रं जी " करायला आहे

मी "जी रं जी " करायला आहे तयार. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 10/23/2015 - 08:30

In reply to मी "जी रं जी " करायला आहे by अभ्या..

Permalink

झांजा

झांजा फक्त आणि फक्त मीच्ज वाजवणार बुवांना फेटा बांधायची जिम्मेदारी चिमण कडे आहे याची नोंद घेणे. अवांतर पोवाड्यावरील अभिप्राय दि ३१ मे लाच नोंदवला आहे सबब पुन्हा नको.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 10/22/2015 - 17:10

Permalink

पोवाडा!

छान आहे पोवाडा.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 10/22/2015 - 17:26

Permalink

तिथे बॉलरचा होई खात्मा...तिथे

तिथे बॉलरचा होई खात्मा...तिथे बॉलरचा होई खात्मा सांगे सेहेवाग कथा आत्मा... >>>>>>>>>>> इथेच फुटलो:-D:-D:-D पुढचं काय वाचताच आलं न्हाय. कहर!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 10/22/2015 - 19:45

Permalink

गुर्जी, मस्त पोवाडा!

एकदम आवेशपूर्ण लिहिलाय. याचं गायन करा, रेकॉर्डिंग करुन द्या सेहवागला पाठवून! सिरीअसली!! :) -विरुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 10/22/2015 - 20:30

In reply to गुर्जी, मस्त पोवाडा! by चतुरंग

Permalink

रेकॉर्डिंग तैय्यार !

रेकॉर्डिंग तैय्यार ! Image removed. http://www.mediafire.com/watch/i5lrmme6ayuny6e/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE.m4a Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 10/22/2015 - 21:06

In reply to रेकॉर्डिंग तैय्यार ! by अत्रुप्त आत्मा

Permalink

बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या

बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या पहाडी आवाजात. नंबरी काम झालय एकदम. डफावरची थाप जरा घुमायला हवी होती पण उपलब्ध सामुग्रीने तुम्ही माहोल उभा केलाय. ह्या व्रीरश्रयुक्त पोवाड्याच्या गायनप्रसंगी तुम्ही कीती बेभान झाला होता त्याची ही छबी. Image removed. या अद्वितीय कामगीरीबद्द;ल तुम्हाला मिपाशाहीर हा किताब देण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 10/22/2015 - 22:00

In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..

Permalink

अगागागागागा _/\_

अगागागागागा _/\_ हे थोरच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 10/22/2015 - 22:01

In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..

Permalink

दुत्त दुत्त :-D

Image removed. दुत्त दुत्त :-D कुठन मिळवलास रे हां फोटु !? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 10/23/2015 - 12:36

In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..

Permalink

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र कहर! मिपा म्यूझिक सहर्ष सादर करित आहे मिपाशाहीरांचे पव्वाडे ! एकच शाहीर - बाकी सगळे बाहीर अलबम्म काढा. आणि हो; हा सहवागला पाठवाच :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 10/23/2015 - 14:50

In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..

Permalink

अगागागागागागागागा =)) =)) =))

अगागागागागागागागा =)) =)) =)) =)) =)) काय ते ध्याण =)) =)) =)) _/\_ पवाडाबी येकच नंब्र, अवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 10/23/2015 - 18:49

In reply to बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या by अभ्या..

Permalink

वारलोच ! =))

वारलोच ! =))
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 10/22/2015 - 21:36

In reply to रेकॉर्डिंग तैय्यार ! by अत्रुप्त आत्मा

Permalink

रेकॉर्डिंग करताना माईक बराचं

रेकॉर्डिंग करताना माईक बराचं हलवलेला दिसतोय इकडुन तिकडे. आवाज मधुनचं कमी जास्तं होतोय. बाकी मस्तं जमलाय हा गुर्जी. :)!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 10/22/2015 - 23:26

In reply to रेकॉर्डिंग तैय्यार ! by अत्रुप्त आत्मा

Permalink

आम्ही लगेच प्रसीध्दही केला.

आम्ही लगेच प्रसीध्दही केला.
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Fri, 10/23/2015 - 09:43

In reply to रेकॉर्डिंग तैय्यार ! by अत्रुप्त आत्मा

Permalink

पवाडा जोरदार झालाय !

पवाडा जोरदार झालाय !
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 10/23/2015 - 09:54

In reply to पवाडा जोरदार झालाय ! by नाव आडनाव

Permalink

फोटो भन्नाट आहे.

समोर प्रेक्षकात वल्ली आहेत का तुम्ही रोखून बघताञ म्हणून विचारले !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 10/23/2015 - 09:59

In reply to फोटो भन्नाट आहे. by नाखु

Permalink

कदाचित तुम्हीच असाल णाखुण का.

कदाचित तुम्हीच असाल णाखुण का...का.......
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 10/23/2015 - 10:03

In reply to कदाचित तुम्हीच असाल णाखुण का. by प्रचेतस

Permalink

कोणतर एक नाकेला, गोरेला,

कोणतर एक नाकेला, गोरेला, काटकुळा पण छाती पुढे काढून फोटो काढत होता. ;) बुवांना त्याने अर्धे आपट्याचे पान सोने म्हणून दिले आणि परत घेतले म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 10/23/2015 - 11:42

In reply to कोणतर एक नाकेला, गोरेला, by अभ्या..

Permalink

मिपाचा रूशी पकूर???? का

मिपाचा रूशी पकूर???? का शारुक्खान?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 10/23/2015 - 11:42

In reply to कोणतर एक नाकेला, गोरेला, by अभ्या..

Permalink

कोण हो कोण?

कोण हो कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 10/23/2015 - 11:57

In reply to कोण हो कोण? by प्रचेतस

Permalink

धागा

पन्नाशी निमीत्त बुवांचा एक फेटा (डोक्याबरहुकुम) डोळ्यावर न येणारा (बुवांच्या), एक पानाची चंची (पुडी आणि डबी बसेल असी) आणि खेळण्यातली आवाज करणारी (त्याच वेळेला लाईट लागणारी) इथे प्रात्य्क्षीक पहा देऊन करण्यात येत आहे. भेटवस्तूंसाठी बुवांचे हितचिंतक श्री सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे. शुभेच्छूक "सत्कारच सत्कार चोहिकडे गेला जे पी कुणीकडे "मंडळ आणि चिमण हटेला गँग.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 18922 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com