नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 4:17 pm

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.

या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.

(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)

(ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्‍यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)

सोने कसला महाग आहे, सोन्या सारखा तुझा मेक ,
धडधडते माझे हॄदय, ऐकण्या साठी जरासा टेक,
(सुरुवाती पासून सगळे २ वेळा म्हणावे)
तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, हेSSS
तु माझा
(५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, ||धॄ||

(नायिकेने जवळपास असलेला एखादा खांब पकडुन जोरजोराने कंबर हलवत,( खांब न पाडता), नायिकेने वरील ओळी म्हणाव्या. या वेळेला नायकाने चेहर्‍यावर कॄध्द भाव ठेवुन अंगाला वेडे वाकडे झटके देत रस्त्याने चालावे. झटके देताना पायातल्या चप्पल उडणार नाही अशा बेताने झटके द्यावे. (चप्पल उडाली किंवा खांब पडला तर रीटेकचे पैसे नायक किंवा नायिकेच्या मानधनातुन कापुन घेण्यात येतील.) मधेच नायिके कडे रागा रागाने पहावे. संपूर्ण गाण्यात नायिकेच्या चेहेर्‍यावर नम्र भाव आसावे. रस्त्यावरचे लोक आपल्या कडे कुचेष्टेने बघतील पण त्या कडे दुर्लक्ष करावे. (मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे हे लक्षात आले की आपोआप निघुन जातील) येथे टेक हा शब्दाचा मराठी अर्थ गॄहित धरुन त्याप्रमाणे अभिनय करावा)

(यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता)

सोनू तू माझा नायक रे, वेड्या सारखा वागु नको
स्वप्नामधल्या राणीला दूर असा तू लोटू नको
वाईट राग, झटकुन टाक, देईन तुला मी चॉकलेट केक, ||१||
तु माझा
(५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,हेSSS
तु माझा
(५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,

(रस्त्यावरुन जर पी.एम.पी.एम.एल. ची बस जात असताना शक्यतो वरील कडव्याचे चित्रीकरण करावे. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर ला पटवुन सिनेमात नाचायला घेतो असे सांगुन अडकवुन ठेवावे. म्हणजे बराच वेळ बस चित्रीकरणासाठी उपलबब्ध राहील. जर त्यांनी फारच आग्रह केला तर (कॅमेरा सुरु न करता) दोनतीन वेळा त्यांना कॅमेर्‍या समोर नाचायला लावावे. नंतर एडिटरने कट केले असे सांगता येते. चालु बस समोर नायक नायिकेने योग्य अंतर राखत, (स्वतःच्या जबाबदारीवर) नाचावे. चॉकलेट केक दाखवण्या साठी जवळच्या बेकरी मधुन एक वाटी केक नायकाला आणायला सांगावा. जर नायकाने त्याचे पैसे दिले नाही तर नायिकेने तो केक नुसताच त्याला दाखवुन परत दिग्दर्शकाकडे जमा करावा किंवा शुटींग संपल्यावर बेकरीवाल्याला तो परत करावा, असे केल्यास केकचे पैसे नायिकेच्या मानधनातुन वळते करावे.)

(यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता)

मन माझे करते बंड, पण तु गोळ्यासम थंड,
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड,
झाले गेले विसरुन दोघे, आता गाठु पाषाण लेक, ||२||
तु माझा
(५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,,हेSSS
तु माझा
(५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,

(यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता)

(कात्रजच्या किंवा पाषाणच्या तलावाच्या काठी किंवा नदिकाठच्या रस्त्यावर वरिल कडव्याचे चित्रीकरण करावे. एखाद्या बाकड्यावर किंवा हातगाडीवर नायकाने झोपावे व नायिकेने कडव्याला सुरुवात करावी. नाचता नाचता मधेच नायकाच्या छातीवर तीन वेळा डोके अपटावे. डोके आपटताना जवळुन व हळुच अपटावे. डोके आपटायला नायिका जर लांबुन धावत येताना दिसली तर नायकाने झटकन बाजुला व्हावे. वरील कडव्यात अंड दाखवताना ते उकडुन घ्यावे. म्हणजे खाली पडले तरी लगेच फुटून वाया जाणार नाही. चित्रीकरण संपल्यावर दिग्दर्शकाकडे अंडे जमा करायची जबाबदारी नायिकेची असेल. दिग्दर्शकाने अंडे व केक चा हिशोब आम्हाला स्वतंत्र पणे द्यावा)

सोने कसला महाग आहे, सोन्या सारखा तुझा मेक ,
धडधडते माझे हॄदय, ऐकण्या साठी जराशी टेक,
मी तुझा
(५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, ||धॄ||

(संगीत पूर्ण संपेपर्यंत नायक नायिकेने नॄत्य करत रहावे)

(वरील कडवे नायकाने म्हणायचे आहे. हे कडवे म्हणताना त्याने स्वतःचा शर्ट अंगातुन काढुन तो डोक्यावर अडकवत नाचायचे आहे. नायकाने बनियन घातला आहे की नाही ते चित्रीकरण सुरु व्हायच्या आधी तपासुन घ्यावे. उगाच त्या सलमान सारखी चित्रीकरण चालु झाल्यावर फजिती नको. बनियन फारच पिवळा पडला असेल किंवा बीनबाहीचा असेल तर शर्टकाढणे रद्द करावे. त्या ऐवजी खिशातुन रुमाल काढुन तो डोक्यावर ठेवावा. चेहर्‍यावरचे कॄध्द भाव आता नकोत. त्या ऐवजी नायिके कडे हसुन पहात तिच्याशी प्रेमाचे चाळे करत गाणे म्हणावे. नायिकेची आई आमच्या शेजारच्या चाळीतच रहाते याचे नायकाने भान ठेवावे. शेवटचे "मी तुझा (५ वेळा)" म्हणताना जोरजोरात कंबर हलवावी. )

कॉकटेल रेसिपीकोडाईकनालभूछत्रीमराठीचे श्लोकशृंगारभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Apr 2013 - 4:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमच्या सुचनांसकट प्रसिध्द झाले चुकुन.
वाचकांनी सुचना वाचु नयेत फक्त गाण्याचा आस्वाद घ्यावा.
पैजारबुवा,

रोसेश साराभाईच्या कवितांची आठवण झाली...:)

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Apr 2013 - 5:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा, मै भी लुक्खा हुं
(

अभ्या..'s picture

2 Apr 2013 - 6:34 pm | अभ्या..

सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली.
ते पण भारी हाय. :)

शिशुवर्गाच्या ग्यादरींगची आठवण झाली. ;)

पोरांपेक्षा बाईच भारी उत्साहात असतात. (हे अवांतर आहे.)

जेनी...'s picture

2 Apr 2013 - 7:37 pm | जेनी...

=))

पैबू काका मज्जा आली . :D

श्रीरंग_जोशी's picture

3 Apr 2013 - 6:21 am | श्रीरंग_जोशी

लै भारी हो पैजारबुवा.

ऑडिशन वगैरे कधी झाले?

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Apr 2013 - 9:02 am | ज्ञानोबाचे पैजार

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला?
या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा.
पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

जेनी...'s picture

3 Apr 2013 - 11:28 pm | जेनी...

हिहिहि पैबू काका इथल्या संपादकांच्या यादीत बगा कोण भेटतीयेका ???

खलनैका हो = ))

अभ्या..'s picture

4 Apr 2013 - 1:04 am | अभ्या..

हिरवीनचे नाव कळाल्यास आगामी मिपाम्यान म्हणून ब्याटम्यान हे नांव पुढे करत आहे.
लै अ‍ॅक्टीव्ह हाय पोरगं.

बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Apr 2013 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....?
हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले.

@ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

जेनी...'s picture

6 Apr 2013 - 12:46 am | जेनी...

:-/ :-/

कवितानागेश's picture

4 Apr 2013 - 3:27 pm | कवितानागेश

ए कोण गं? कोण गं?
मला सांग ना.
-(पूजाच्या सासूबैची मैत्रीण) माउ :P

कोणे हो हिरवीण ? जोशीकाकांना शोभेशी आहे ना ?

श्रीरंग_जोशी's picture

4 Apr 2013 - 11:43 pm | श्रीरंग_जोशी

पैजारबुवा,

नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू?

बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून.

फोटो खफवरून साभार.

जेनी...'s picture

6 Apr 2013 - 12:45 am | जेनी...

=))

विशाल कुलकर्णी's picture

9 Dec 2016 - 12:48 pm | विशाल कुलकर्णी

पाशवी शक्ती >>>>> लोलवा ;)

आतिवास's picture

3 Apr 2013 - 8:10 am | आतिवास

कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या's picture

4 Apr 2013 - 12:09 am | धन्या

आ व रा !!!

ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड

हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

श्रिया's picture

4 Apr 2013 - 3:52 pm | श्रिया

खूपच मजेदार.
अजून एक आवृत्ती "सोने जितके आहे पिवळे, तितके तुझे मन सोवळे"

=)) =))

आम्हाला बी द्या कि एक छोतुसा रोल

पैसा's picture

5 Apr 2013 - 11:56 pm | पैसा

मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

शेवटी गाण्याचे चित्रिकरण झाले की नाही पैजारबुवा?

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2016 - 12:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत.
हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल.
पैजार्बुवा,

पद्मावति's picture

9 Dec 2016 - 12:24 pm | पद्मावति

=)) मजेदार लेख.

"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत.
हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल.
पैजार्बुवा, "
हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

चांदणे संदीप's picture

9 Dec 2016 - 2:55 pm | चांदणे संदीप

ज ह ब ह र ह द ह स्त!

=)) =)) तुफान हसलो पैबू माउली!

पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे!

Sandy