चिरंजीव चिंटू

डावखुरा's picture
डावखुरा in कलादालन
18 Nov 2010 - 11:05 am

आजचा "चिंटू" वाचला का !?
ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते...

chintoo

अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे.
प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रमालिकेतुन प्रसिद्ध होउन लहानांपासुन मोठ्यांपर्यंत ईतर कोणत्याही बातमी कडे कटाक्ष टाकण्यापुर्वी चिंटू कडे जायला भाग पाडतो...ह्यातच ह्या मालिकेचे यश सामावलेय..
सतत दोन दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिंटू २० व्यात पदार्पण करणार.
चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा मानसपुत्र असलेला चिंटू आपल्या घरातील आजी अजोबांचा नातु तर आई-वडिलांचा मुलगा..आणि घरातील लहानांचा भाउ...आणि काही लहानगे तर स्वतःलाच चिंटुच्या रुपात पहातात...तर काही आईवडील आपल्या लहानग्याला चिंटु च्या रुपात पहातात...
चिंटुचे विनोद हे निखळ असतात..हे विनोदच त्याचे निरागसपण २० वर्ष अखंड टिकुन राहण्यास सहाय्य करतात..
लहानपणी चिंटू त्याचे आई-बाबा,आजी-आजोबा,त्याचे मित्र मिनी,पप्पू,बगळ्या,सोनू,राजू,त्याच्या त्या जोशीकाकू हे सर्वजण आपल्या आजूबाजूलाच राहतात असं वाटायचं.
आपले बालपण काळाच्या ओघात संपते पण ते बालपण पुन्हा एकदा सकाळी सकाळी आठ्वुन चिंटूच्या कोट्यांनी ओठावर मंद स्मित आणुन दिवसाची छान सुरवात करुन देणार्‍या त्याच्या निर्माट्यांचे शतश: आभार...
चिंटू खुप खुप मोठा हो...वयाने नाही प्रसिद्धिने..तुला वाढ्दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...

निखिल कुलकर्णी या वाचकाची हृदयस्पर्षी प्रतिक्रिया...
पु.लं. गेले त्यावेळची गोष्ट, सकाळची बातमी होती, 'पु.लं. गेले, अवघा महाराष्ट्र शोकाकुल'! त्या अंकात चिंटू खिडकीजवळ पाठमोरा उभा आहे आणि त्याच्या बाजूच्या टेबलवर पु.लं.चे साहित्य ठेवले आहे अशी चित्रमालिका होती. आज या गोष्टीला १० वर्षे झाली. पु.लं. गेले त्यावेळी घरातील-आपली व्यक्ती गेली असे वाटत होते. अवघ्या महराष्ट्राची हि भावना चिंटूने न बोलता,चेहराही न दाखवता अशी व्यक्त केली. चिंटूच्या अशा अनेक आठवणी जीवनातील विविध प्रसंगाशी जोडल्या गेल्या आहेत. त्याचे महाराष्ट्राशी असलेले हे भावनिक नाते आहे.

हे ठिकाणकलानृत्यसंगीतकथाचारोळ्याउखाणेऔषधोपचारअर्थव्यवहारधोरणमांडणीसंस्कृतीनाट्यबालकथाप्रेमकाव्यप्रतिशब्दप्रवासगुंतवणूकवावरकविताम्हणीधर्मदेशांतरपाकक्रियागझलबालगीतभाषावाक्प्रचारविनोदराहती जागावाङ्मयमुक्तकव्याकरणइतिहासविडंबनव्युत्पत्तीशब्दक्रीडासाहित्यिकशब्दार्थशुद्धलेखनसमाजनोकरीसुभाषितेजीवनमानतंत्रराहणीभूगोलविज्ञानफलज्योतिषक्रीडासामुद्रिकअर्थकारणकृष्णमुर्तीराजकारणज्योतिषराशीशिक्षणमौजमजाचित्रपटरेखाटनछायाचित्रणस्थिरचित्र