संगीत

गाण्यासंदर्भात मदत हवी आहे.

शाहिर's picture
शाहिर in जनातलं, मनातलं
13 Nov 2022 - 1:20 pm

खालील गाण्याचे अर्धेच शब्द उपलब्ध आहेत.. मिपाकरांना विनंती हे गाणे पूर्णपणे उपलब्ध असल्यास इथे पोस्ट करावे. धन्यवाद!

मी पाया पडते पदर पसरते
सवत मला हो आणू नका ||

घरात होती आई ची मी लाडकी गळसरी
बापाच्या मोटेला दोर रेशमाचे शेंदरी
गोगलगाय मी अशी नखानं
येता - जाता खुडू नका
मी पाया पडते ..........

कलासंगीतमाहितीसंदर्भचौकशीमदत

रंगभूमीवरची पहाट

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
6 Nov 2022 - 9:46 pm

पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते.

संस्कृतीकलानाट्यसंगीतप्रतिक्रियाआस्वाद

अनिरुध रविचंदर - वाढदिवसाच्या शुभेच्छा !

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
17 Oct 2022 - 7:16 pm

तरुणाईला भुरळ घालणारे संगीत देणार्‍या संगीतकार अनिरुध रविचंदर उर्फ 'अनिरुध' याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

कोण हा अनिरुध? ते इथं वाचा.

https://en.m.wikipedia.org/wiki/Anirudh_(composer)

अनिरुधच्या मला आवडलेल्या गाण्यांची यादी आपणा सर्वांसाठी.

Why this kolaveri D
https://youtu.be/YR12Z8f1Dh8

Velich poove vaa
https://youtu.be/TkK5fwk5uRU

कलासंगीतशुभेच्छा

मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
22 Sep 2022 - 10:29 pm

मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे. :)

राणु राणु - तेलगु

------
मनमरासा - तामिळ

------
आ आंटे - तेलगु

------
आपडी पोडे - तामिळ

------
सध्या इंग्रजी कळत असले तरी हे गाणे सुध्दा परकीय भाषेतील म्हणुन आवडते.
KEEP AMERICA GREAT (Official Music Video) - Trump 2020 Song by Camille & Haley

------
इंदीला - फ्रेंच

------
ब्राझिल - इंग्रजी

कलासंगीतआस्वादअनुभवमतशिफारस

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
30 Aug 2022 - 7:03 pm

.container1 {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}
.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

कलानृत्यसंगीतबालकथाविनोदचित्रपटआस्वादविरंगुळा

स्मरणरंजन : रेडियो

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
3 Aug 2022 - 11:00 am

ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविधभारती... रात के ग्यारंह बजने को है, पेश है बेला के फूल...

बाबांनी 1981 साली कोल्हापूर वरून रेडियो आणला. तामिळनाडू चा नूरी ब्रँड चा दोन स्पीकर वाला सन्मायका लावलेला लाकडी रेडियो. त्याआधी ग्रामपंचायतीचा volve वाला रेडियो असायचा. रेडियो आला आणि आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सगळं काही रेडियोमय होऊन गेलं.

या नवीन रेडियो वर लांब वरची स्टेशन्स सुद्धा चांगली ऐकू यायची. संध्याकाळी धारवाड हुबळी स्टेशन वरची मराठी गाणी, पहाटे मुंबई अ, आणि मग रत्नागिरी वरची भक्तीगीते. रात्री मात्र पर्मनंट विविधभारती...

संगीतप्रकटन

सन्तूर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
6 Jul 2022 - 10:30 pm

स्वरतत्वाचे तुषार अगणित
भवतालाला व्यापुनी उरले

रोमरोम पुलकित करणार्‍या
स्वरपुंजांनी गारूड केले

स्वरचित्रातील अवकाशाच्या
सुप्त मितीचे दर्शन झाले

स्वरलहरींचे जललहरींशी
निगूढ नाते पुनश्च कळले

स्वरशिल्पातील अमूर्ततेचा
चिरंतनाशी घालुनी मेळ
शब्दावाचून सहज रंगला
विलक्षणाचा अद्भुत खेळ

संगीतकविता

5 मे

नगरी's picture
नगरी in जनातलं, मनातलं
5 May 2022 - 12:48 pm

आज 5 मे,
थोर संगीतकार नौशाद अली यांचा स्मृतिदिन. हा धागा त्या साठी , मिपाकरांनी त्यांच्या आठवणी आणि आवडती गाणी प्रतिसादात लिहावीत.
1982-83 सालचा काळ असावा,त्यावेळी घरी b/w tv घेतला होता.त्यावर फक्त मुंबई दूरदर्शन दिसे,ते ही 30 फुटी अँटेना लावल्यावर. त्यावर एकदा नौशादजींची मुलाखत ऐकली होती. त्यातला एक किस्सा आजही आठवणीत आहे.

संगीतविचार

"मी वसंतराव" च्या निमित्ताने

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
14 Apr 2022 - 9:57 pm

शहर - आपलं नेहेमीचंच
स्थळ - guess करायला एकदम सोपं
दिवस - मावळलेला workday
वेळ - रात्री उशिराची

"मी वसंतराव" बघायचा योग आलेला. अगदी ऐन वेळी कशीबशी पहिल्या रांगेतली तिकिटं मिळाली. मराठी चित्रपट mid week हाऊसफुल्ल?? चित्रपट चांगला आहे हे ऐकलं होतंच पण म्हटलं कदाचित उद्या बँक हॉलिडे आहे म्हणून गर्दी असेल. अर्थात गर्दी म्हणजे तरी काय असणार? हाताच्या बोटांवर मोजण्याइतके millennials. Gen Z चा तर संबंधच नाही. अश्या गर्दीतले जवळपास निम्मे चेहरे ओळखीचेच वाटतात (कारण मी ही त्याच गर्दीचा भाग असतो).

कलानाट्यसंगीतचित्रपटप्रकटनप्रतिक्रिया