मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

भाकरीचे पीठ

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा Sun, 05/26/2024 - 22:59
सुंदर ... वेगळ्याच प्रकारची मदत कथा ! कविल, कायरा, वृशांत, तान्या असली मराठी नावं वाचून अंमळ मौज वाटली. भविष्यात उत्तर भारतीय मराठीभुमीत स्थायिक होऊन शेती करणार ?

कंजूस Mon, 05/27/2024 - 05:14
संपर्क यंत्रणेचा उपयोग पिठामिठापर्यंत पोहोचला आहे. सकाळी फित्झा न खाता भाकरी खाण्याची संस्कृती/ परंपरा अजून पाळत आहेत. ( कविता आणि लक्ष्मणराव यांच्या मुलाचे नाव कविल असणार तसेच त्यांच्या सासू सासऱ्यांची नावे कावेरी आणि यशवंतराव असणार . )

कंजूस Mon, 05/27/2024 - 05:21
उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात जाणाऱ्यांची नावं मकरंद, अनिरुद्ध, प्राची वगैरे पौराणिक असल्याचा फायदा असतो. नाळ ओळखता येते. गावातले शेती करणारे लोक मात्र मुलांची डिस्को नावे ठेवतात असं एका रत्नागिरीगिरीकराने सांगितलं होतं.

In reply to by कंजूस

पाषाणभेद Tue, 05/28/2024 - 22:23
आयुर्वेदीक डॉक्टरांची नावे तर हमखास पौराणिक असतात. आता ते नंतर आयुर्वेदीक डॉक्टर बनत असल्याने त्यांचे लहानपणी नावे कशी सार्थ ठेवली जात असतात हे आश्चर्य आहे.

कर्नलतपस्वी Mon, 05/27/2024 - 06:17
कविल ने तृप्ततेची ढेकर दिली हे विहंगम दृश्य बघून पलीकडील बांधावरच्या अप्पांना कायप्पाचा समाजाभिमुख उपयोग बघून गदगदून आले.

In reply to by कर्नलतपस्वी

पाषाणभेद Tue, 05/28/2024 - 22:26
प्रॅक्टीकली बांधाला बांध लागून असणारे अगदीच बारामतीचे असतात हे सत्य आहे. त्यामुळे समोरचा आप्पा नक्कीच आसूयेने हसला असेल.

अनन्त्_यात्री Mon, 05/27/2024 - 11:16
कविल सकाळीच उपाशीपोटी स्पेसशटल घेऊन 4JUN400PAAR ग्रहावर टीपी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय टेलीपोर्ट करावे या चिंतेत होती. घरातील स्पेसमील संपले होते. माइंडशेअर कन्सोलकडे बघत तिने घरातील स्पेसमील संपल्याचे मनात म्हटले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायोपार्टनर तान्याला ते कळले. तिने वृशांतला YZ420 ग्रहावरील स्पेसमील उद्योगात काम करणारा आपला bio-offspring चिन्मय यास स्पेसमील कविलकडे टेलीपोर्ट करण्यास सांगितले. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. असलेच स्पेसनेबर सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - अश्मछेद

चित्रगुप्त Tue, 05/28/2024 - 07:02
इंटरनेटीवर हुडकून ज्यांची नावं ठेवली गेली, त्या कायरा - मायरा - तान्या - वृशांत - कविल एक्सेट्रांची जनरेशन आता ऑर्गेनिक, ग्लुटेनफ्री, जीएमओफ्री, लो क्यालरी, देसी फार्मिंग करू लागलीय हे बघून भडभडून येऊन गद्गद झालेलो आहे. आता ताबडतोब ऑर्ग्यानिक जीएमओफ्री लेमोनेड प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही. -- जियो पाभे, लिहीत रहा (सुटा) आता.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त Wed, 05/29/2024 - 02:53
हल्लीची तरूण पिढीतील कपले (म्हणजे पस्तिशीतल्या तरूण मुला-मुलींचे शेवटी एकदाचे 'मॅरिनेट' पद्धतीने जुळलेले लग्न ( 'नेट' वरून जुळलेले ) झाल्यावर आणखी चार-पाच वर्षांनी पहिल्या बाळाची चाहूल लागली, की 'मॅटर्निटी फोटोशूट' जेंडर रिव्हील', 'बेबी शॉवर' वगैरें होते त्याआधीच इंटरनेटवर 'बेबी बॉय नेम्स' किंवा 'बेबी गर्ल नेम्स' सर्चायला सुरूवात होते, तेंव्हा हमखास ही आर्विल - शार्विल- कायरा - मायरा नावे सापडतात (आमच्या लहानपणी होतीच की 'सायरा बानू' - तीच, 'मेरे यार शब्बा खैर' वाली ) -- आणखी हैट म्हणजे याचा अर्थ काय, असे विचारले की हे विष्णुचे, गणपतीचे किंवा देवीचे नाव आहे असे सांगून समोरच्याची बोलती बंद केली जाते (असेल बुवा 'विष्णुसहस्रनामा' पैकी एकादे. कुणास ठाऊक) आणि ती ब्येनी फोटोग्राफरं पण काय काय क्लुप्त्या काढतात बघा. फोटोशूटच्या वेळी काय तर म्हणे मुलाचे किंवा मुलीचे बूट्/स्यांडल समोर ठेवायचे, कॅमेरा त्यावर फोकस करायचा, आणि लांब ती गर्भारशी बया झाडाला टेकून उभी रहाते, आणि तिचा बाप्प्या समोर गुडघे टेकून बसत तिच्या वाढलेल्या पोटाचे चुंबन घेत असतो, त्यांना 'औटॉफ फोकस ठेवायचे -- या सगळ्या 'आयडियाज' पण नेटवर मिळतात बरंका, बघा सर्चून, 'मॅटर्निटी फोटोशूट आयडियाज' ) उदाहरणार्थ खालील फोटू बघा: . . . असो. कुठे भाकरीचे पीठ आणि कुठे गर्भारशी बायांचे फोटो. प्रतिसादायला बसले, की आमचे तारू कुठल्याकुठे भरकटते, आणि कैच्याकै प्रतिसाद प्रसवते, ते असे. असो.

भागो Tue, 05/28/2024 - 07:07
कथा आवडली. मला वाटतंय कि कथा उपरोधिक आहे. म्हणजे लोकांकडे मोबाईल घ्यायला पैसे आहेत, सिम साठी पैसे आहेत पण भाकरीचे पीठ विकत आणायला नाहीयेत. असे काही आहे का?

In reply to by भागो

पाषाणभेद Tue, 05/28/2024 - 22:31
कसं आहे ना की google नाव आधी ठेवल्या गेले अन नंतर त्याचा लाँगफॉर्म लोकांनी निरनिराळ्या अर्थाचा बनवला गेला. तसेच आहे हे.

चौथा कोनाडा Tue, 05/28/2024 - 17:36
कविल सकाळीच उपाशीपोटी काव्य संमेलनात कविता सादर करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शासकीय ग्रंथालयातून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. घराला घर लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - भेपा

In reply to by चौथा कोनाडा

पाषाणभेद Tue, 05/28/2024 - 22:35
तान्या वृशांतला "साहित्याने काय पोट भरणार आहे का?" अशा अर्थाचे बोलली. वृशांत लगोलग चिन्मयकडे गेला व त्याला ग्रंथालयाबाहेर काढले.

In reply to by पाषाणभेद

चौथा कोनाडा Wed, 05/29/2024 - 18:23
चिन्मयने काव्य संमेलनात गेला अन कविलला एका बाजुला घेतले अन त्याला भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा दिला. कविलने समाधानाने ढेकर दिली अन चिन्मय निश्चिंत झाला. त्यानं पुन्हा ग्रंथालयाचा रस्ता पकडला... कारण त्यांनं निघताना तान्या वृशांतला सांगितलं " माजी संमेलन स्वागताध्यक्ष कौतुकराव ढाले देशमुख यांनी सांगितलं होतं तु जेमतेम थातूरमातूर अभ्यास करुन कुठलं तरी पुस्तक लिही, मी ते विद्यापीठाकडं पाठवतो अभ्यासक्रमात लावायला" मग काय आपण प्रतिष्ठित साहित्यिक होणार या विचारानंच चिन्मय सुखावला.

निनाद Wed, 05/29/2024 - 07:29
भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा वाचून मन भरून आले पाभे! आमचा प्रयत्न... -- कविल सकाळीच उपाशी मनाने लायब्रीत वाचणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी कथाबीज काय न्यावे या चिंतेत होती. नवकथेचे बीज संपले होते. व्हाटस अपवर तिने बीज संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास इंग्रजीच्या क्लासवरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळचा नवकथेचे बीज व कांदंबरीचा ठेवा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर लिहिणार होता. तिचे मन भरून आले. भिंतीला भिंत लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - का बे?

In reply to by निनाद

पाषाणभेद Wed, 05/29/2024 - 08:02
हे देखील छान आहे. माडगुळर गीतरामायण लिहायला बसले की त्यांच्या सौ. अगरबत्ती, वगैरे असले प्रसन्न वातावरण करत. (हे आपले सिगरेटी पेटवत.) कायरा तसली बायको आहे.

कर्नलतपस्वी Wed, 05/29/2024 - 08:52
काविल कालिंदी एक्स्प्रेस ने कानपुर ला चालला होता. काळ्या जोगतीणीने कायराला बजावले कालरात्री आमावस्येला कषाययोग आहे.काविलने कानपुर ला जाणे य्योग्य नाही. त्याला थांबव. काविल आगोदरच प्रवासाला निघून गेला होता. कायराचे मन भय कंपीत झाले व काविल च्या आठवणीने कंठ दाटून आला. आता कायरा काय करणार,.... तीने कायप्पावर स्टेटस टाकले. वृषांतचे काका कळमोडी स्टेशनवर कलेक्टर होते. तान्याने त्यांना कळवले. काकांनी काविलला कळमोडी स्टेशनवर उतरून घेतले. हे कायराला कळाल्यावर कायरा भयमुक्त झाली. भाकरीचं पिठ आणी कल्पनांची किरकीरी जेव्हढी जास्त मळली जाते तेव्हढी भाकरी कुरकुरीत होते.

नठ्यारा Wed, 05/29/2024 - 21:46
सदर कथा 'रबरीचं पाकीट' असं शीर्षक योजून अश्लील अवतारात सहजपणे पुनर्लेखित करता यावी. -नाठाळ नठ्या

In reply to by पाषाणभेद

नठ्यारा गुरुवार, 05/30/2024 - 00:54
अहो पाभे, मी देखील बाकीच्यांप्रमाणे सभ्यतेचा बुरखा पांघरला आहे. ;-) आता काय सांगू तुम्हांस असभ्यांच्या व्यथा .... ! -नाठाळ नठ्या

लेखनप्रकार
कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - पाभे

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har ·

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद Tue, 04/02/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि Wed, 04/03/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र Wed, 04/03/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा गुरुवार, 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस Sun, 04/07/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har Sun, 04/07/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:53

शाम भागवत Sun, 04/07/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस Sun, 04/07/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत Sun, 04/07/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत Tue, 04/09/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

कर्नलतपस्वी Wed, 04/03/2024 - 17:40
गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण गुरुवार, 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा गुरुवार, 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har Fri, 04/05/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत Sat, 04/06/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.

माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·

सौंदाळा Sat, 03/02/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस Sat, 03/02/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त Sun, 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

कर्नलतपस्वी Sun, 03/03/2024 - 21:47
२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो Mon, 03/04/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो Wed, 03/06/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

चांदणे संदीप गुरुवार, 03/07/2024 - 18:38
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har Sun, 03/31/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत Sat, 04/13/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण Sat, 05/11/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण Sat, 05/11/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har Tue, 05/14/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण Wed, 03/13/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har Wed, 03/13/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

धर्मराजमुटके Mon, 03/18/2024 - 21:27
आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके Mon, 03/18/2024 - 22:16
योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण Tue, 03/19/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत Tue, 03/19/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत Wed, 03/20/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण Wed, 03/20/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har गुरुवार, 03/21/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh Tue, 03/19/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti Wed, 03/20/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har Fri, 04/05/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण Fri, 04/05/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या Tue, 04/16/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har गुरुवार, 04/18/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या Fri, 04/19/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har Fri, 04/19/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har Tue, 05/14/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/17/2024 - 09:40
नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत Sat, 10/19/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har Tue, 04/15/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत Sun, 09/07/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.

नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

हिंग पुराण-अल्प पुरवणी

Bhakti ·

तुषार काळभोर Wed, 08/09/2023 - 07:06
एका सैंधव मिठाच्या छोट्याशा खरडीतून हिंगाचा विषय निघाला आणि त्या विषयबीजातून अत्यंत माहितीपूर्ण अशी तीन लेखांची मालिका आदरणीय टर्मिनेटर यांनी लिहिली. आणि त्याला ही आणखी माहितीपूर्ण पुरवणी देखील आली. छान योगायोग. आणि त्यातून झालेले ज्ञानवर्धन. धन्यवाद भक्ती आणि टर्मिनेटर!!

सौंदाळा Wed, 08/09/2023 - 10:24
पुरवणी पण ज्ञाववर्धक. स्वदेशी बियाणी, त्यांचे नविन वाण, गुणवत्ता सुधारणे यात काम करणार्‍या लोकांबद्दल खूप आदर आहे. करोडो लोकांचे जीवनमान, आर्थिकचक्र यावर थेट परिणाम होतो. येत्या काही वर्षात उत्तम प्रतीचा स्वदेशी हिंग सर्वांच्या स्वयंपाकघरात येऊ दे.

कर्नलतपस्वी Wed, 08/09/2023 - 11:38
महर्षी टर्मिनेटर यांच्या तोडीसतोड विदुषी भक्ती यांची लघु पुरवणी. लेख वाचल्यावर लक्षात येते की आपण वनस्पती शास्त्र किवा सुक्ष्म जीवाणू शास्त्र मधे पारंगत असाव्या. हा प्रश्न नाही पण या व पुर्वी वाचलेल्या लेखाची लांबी,रुंदी,उंची,खोली वरुन जे वाटले त्यावरुन. माहितीपूर्ण लेख आवडला.

टर्मीनेटर Wed, 08/09/2023 - 11:54
जेब्बात 👍 पुरवणीत सोप्या भाषेत ग्राफ, टेबल्स सहित उलगडून सांगितलेली शास्त्रीय माहिती मस्तच! हिंग पुराणाच्या तिसऱ्या अध्यायात ह्या पुरवणीची लिंक अपडेटवली आहे 🙏

प्रचेतस Wed, 08/09/2023 - 13:09
थोडासा वनस्पतीशास्त्राशी परिचित असल्याने समजायला अधिक सोपे झाले. ह्यावर अधिक तपशीलवार लिहावे.

पिंगू Fri, 08/11/2023 - 14:37
सायटोकायनिन हे संप्रेरक गोमूत्रात आढळते आणि म्हणूनच गोमूत्राचा वापर बीजप्रक्रियेसाठी केला जातो ही अधिकची माहिती इथे नमूद करतो.

सुरिया Fri, 08/11/2023 - 21:10
स्टेफी सोडली तर बाकी कोनत्याही ग्राफमध्ये इंटरेस्ट नाही. ;) तरीही अभ्यासू लेख म्हणायला हरकत नाही.

लेखनविषय:
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ' (Council ofScientific and Industrial Research - CSIR) ह्या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' (Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur - IHBT) ह्या संस्थेने २०१८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळात इराण मधून दोन टप्प्यांत 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या सहा वाणांचे बियाणे आयात करून 'नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली' (National Bureau of Plant Genetic Resources, New Delhi -NBPGR) ह्या संस्थेच्या देखरेखीखाली भारतात प्रथमच ह

वार्तालाप: जाणण्याचे विज्ञान

विवेकपटाईत ·

अहिरावण Wed, 08/02/2023 - 14:16
मे महिन्यात टमाटोला बाजार भाव मिळत नाही म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले. शेतावर नांगर फिरवले. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी टमाटोला शंभर रुपये किलोच्या भावाने विकले. मे महिन्यात न फेकता घरीच टमाटे ठेवले असते तर ते जुलै सोडा जूनमधेच सडून गेले असते आणि एक माणुस किती खाऊ शकेल याची मर्यादा असल्यामुळे रस्त्यावर फेकून देणेच योग्य होते. जरी ऑगस्ट मधे भाव दिडशे, सप्टेंबर दोनशे, ऑक्टोबर तीनशे असा वाढत गेला तरी मे महीन्यात फेकून न देता तसेच ठेवणे हा मुर्खपणाच ठरला असता. शेतकरी तुम्हाला वाटतात तितके मुर्ख नाहीत

In reply to by अहिरावण

विवेकपटाईत Wed, 08/02/2023 - 15:09
लेख पुन्हा वाचा, बहुतेक तुम्हाला कळलेला नाही. शेतीच्या विज्ञानात बाजार भाव सहित अनेक बाबींचा उल्लेख केला आहे. बाकी टमाटो पीक जुलै ते सप्टेंबर महिन्यात येईल तर नेमीच चांगला भाव मिळतो. कॉन्ट्रॅक्ट शेती हे विकल्प आहे. शेतकरी मिळून स्वतची कंपनी बनवून प्यूरी ही विकू शकतात. ज्याला विज्ञान कळले त्यांनी आवळ्याचे ज्यूस ही २५ वर्षापूर्वी बाजारात आणले होते. आज १००० कंपन्या हा ज्यूस विकतात.

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण Wed, 08/02/2023 - 19:33
शक्य आहे मला कळलेला नसावा. पण, जरा वातानुकुलीत मनोरे सोडुन बाहेर या आणि विचार करा. मे महिन्यात फेकलेला टमाटा कधी पेरलेला होता. जुलै,ऑ गस्ट सप्टेबरात विकला जाणारा टमाटा कधी पेरला जातो. टमाटा पीक किती दिवसांचे असते याचा अभ्यास करा. जुलै सप्टेंबर टमाटा भाव वाढतो हे खरे पण या वर्षी आलेला अवकाळी किती कारणीभुत? पुढिल वर्षी असाच अवकाळी येईल काय? आवळा आणि टमाटा याची तुलना मुर्खपणाची नाही का? अर्थात तुम्हाला बरे वाटावे(च) असे वाटत असेल तर घ्या फेसबुकी प्रतिक्रिया -- आपले लेख खुप विचार प्रबोधक असतात. तुमच्यासारख्या विचारवंतांचीच आज भारताला गरज आहे. परमेश्वर आपल्याला ह्या समाजोपोयगी कामासाठी दिर्घायुष्य देवो. खुश?

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Wed, 08/02/2023 - 22:18
'वातानुकूलित मनोरे' आणि 'फेसबुकी प्रतिक्रिया' हे शब्दप्रयोग लईच आवडल्या गेले आहेत. यवढे बोलून खाली बसतो.

In reply to by विवेकपटाईत

सर टोबी Wed, 08/02/2023 - 20:27
किंवा हिंट ऑफ अमकं तमकं असं असतंना तशी पटाईत काकांची ही स्टाईल आहे. मोदी किंवा रामदेव बाबा प्रेमाची हळूच पखरण करायची. पटाईत काका तेवढ्या हजारापैकी जमतिल तितक्या आवळा ज्युस बनविणार्या कंपन्या सांगा बरं. बाकी जास्तीचा टोमॅटो विकतच घ्यायचा असतां तर नेस्ले, टाटा, गोदरेज आणि ईतर लोकल कंपन्या होत्या ना? त्यांची क्षमता संपून जास्तीचे टोमॅटो काय करायला पाहिजे म्हणता?

In reply to by विवेकपटाईत

आग्या१९९० गुरुवार, 08/03/2023 - 11:27
बाकी टमाटो पीक जुलै ते सप्टेंबर महिन्यात येईल तर नेमीच चांगला भाव मिळतो. हे शेतकऱ्यालाही माहित असते. ते का घेत नाही ह्याचा अभ्यास करा. आणि सगळ्याच शेतकऱ्यांनी जुलै ते सप्टेंबर महिन्यात पीक विक्रीला येईल असे नियोजन केले तर मागणीपेक्षा पुरवठा वाढणार नाही का? शेतकरी मिळून स्वतची कंपनी बनवून प्यूरी ही विकू शकतात. शेतकरी फक्त टोमॅटोच पिकावतो का? अन्य पिकेही घेत असतो, त्यांचेही भाव पडतात. कशा कशाचे तो प्रक्रिया उद्योग काढेल?

चित्रगुप्त Wed, 08/02/2023 - 17:04
पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले... त्यापेक्षा ते त्याची प्यूरी, सॉस वगैरे बनवू शकले असते.... बरोबर आहे. त्यासाठी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे 'जाणतेपण' वाढीला लावणे आवश्यक आहे. लेख आवडला. छोट्या छोट्या लेखातून काही विचार मांडण्याची तुमची कल्पना छान आहे.

सुबोध खरे Wed, 08/02/2023 - 20:05
जे लोक स्वतः शेती करत नाहीत त्यांना शेतीतील काय समजतं ? शेतीतज्ज्ञ वगैरे अंधश्रद्धा आहेत. तुम्ही जर स्वतः बाई नसलात तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ असूच शकत नाही एवढे बोलून मी खाली बसतो

विवेकपटाईत Fri, 08/04/2023 - 11:10
शेतीचे फक्त एक उदाहरण होते. आवळा ज्यूस ही एक उदाहरण. आवळा ज्यूस ही पॅक करून बाजारात विकल्या जाते हेही जाणण्याचे ज्ञान होते. नितीन देसाई यांचे दुखद निधन झाले. त्यांचा स्टुडिओ चालत नव्हता म्हणून ते कर्ज सोडा व्याज ही फेडू शकत नव्हते. स्टुडिओ पर्यटन ही आज एक मोठा धंदा आहे. लोक हजारो रुपये खर्च करून रामोजी सिटीला भेट देतात. मुंबईच्या माझ्या चार पैकी तीन नातलगांना नितीन देसाई यांचा स्टुडिओ आहे ही माहिती नव्हती. त्यांनी या वेगळ्या मार्गाकडे लक्ष दिले असते तर किमान व्याजाची परतफेड निश्चित करता आली असती. स्टुडिओ भ्रमण साठी ५०० रू तिकिटासाठी खर्च करण्याची क्षमता मुंबई आणि पुण्यातील मराठी लोकांची निश्चित आहे. बाकी स्टुडिओ हातचा गेला असता तरी आर्ट डायरेक्टर म्हणून त्यांच्याकडे काम निश्चित असते. दिवाळखोर होणे काही गुन्हा नाही. माया नगरीत शंभर लोक स्वप्न पाहतात तेव्हा एखाद्याचे स्वप्न पूर्ण होते. आत्महत्या सारखा तामसिक मार्ग निवडण्याचे एकच कारण अहंकार मी नाही तर जग नाही.

सर टोबी Fri, 08/04/2023 - 11:27
आता तुम्ही बिनधास्त मोदी आणि रामदेव बाबा यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करा. कुणी काही म्हटलेच तर आहेच हे सांगायला कि मोदी आणि बाबा हि फक्त उदाहरणं झाली.

अहिरावण Fri, 08/04/2023 - 18:56
पडलो तरी माझे नाक वरच !* * पडणे हे एक उदाहरण * * नाक हे सुद्धा उदाहरणच बर का ! *** माकड सुद्धा ... उदाहरणच

जाणते लोक ते शहाणे. नेणते वेडे दैन्यवाणे. विज्ञान तेही जाणपणे. कळो आले. समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात. त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते लोकांच्या नशिबी फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते. समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे.

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार Mon, 04/25/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

गाव

अनुस्वार ·

सौंदाळा Mon, 12/20/2021 - 11:25
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले. ११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अनुस्वार Mon, 12/20/2021 - 20:17
गावातले बदल खूप जास्त वेगाने होताहेत पूर्वीपेक्षा. चांगल्या वाईटची चाळणीच हरवली आहे.

तर्कवादी Mon, 12/20/2021 - 16:11
छान लिहिलंय.. खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही. खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार Mon, 12/20/2021 - 20:07
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.

श्रीगणेशा Mon, 12/20/2021 - 17:36
हूरहूर छान व्यक्त केली आहे. नॉस्टॅल्जिक वाटणं साहजिक आहे. गावच नाही तर सर्व काही बदललं आहे. चांगला बदलही आहे, जसं की मिसळपाव संकेतस्थळ :-)

In reply to by श्रीगणेशा

अनुस्वार Mon, 12/20/2021 - 20:14
'मिपा'च्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी काहीतरी क्लृप्ती निघायला पाहिजे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti Mon, 12/20/2021 - 20:33
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :( मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.

साहना Tue, 12/21/2021 - 01:47
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे. बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत. एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात. > भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ? WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते. जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी. > संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे. गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता. गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले. बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे : Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future? So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two. Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen. ---- पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही. Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.

In reply to by साहना

सुबोध खरे Tue, 12/21/2021 - 09:39
असं कसं साहना ताई शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का? एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय? तुमचा तीव्र निषेध

In reply to by सुबोध खरे

अनुस्वार Tue, 12/21/2021 - 16:20
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय. साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही. एक उदाहरण देतो. माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.) WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो. सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही. साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही. बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा‌.

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा Tue, 12/21/2021 - 18:18
अनुस्वार, आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत. पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा Tue, 12/21/2021 - 18:25
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.

In reply to by अनुस्वार

साहना Wed, 12/22/2021 - 01:13
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे. सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ? त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

In reply to by साहना

Bhakti Wed, 12/22/2021 - 08:35
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
बापरे!!

In reply to by साहना

अनुस्वार Wed, 12/22/2021 - 11:12
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते‌, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.

In reply to by साहना

सुबोध खरे Wed, 12/22/2021 - 11:28
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील १०० टक्के चुकीचे गृहीतक आहे. हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती. असं अजिबातच नाही. बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात. मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात. त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.

In reply to by साहना

तर्कवादी Wed, 12/22/2021 - 20:27
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख.. वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही (परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल ) तर्कवादी

मुक्त विहारि Tue, 12/21/2021 - 16:52
साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे... मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ... शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे. शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...

चौथा कोनाडा Tue, 12/21/2021 - 17:38
सही लिहिलंय ! +१ देऊळ सिनेमा आठवला ! जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला. जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली ! यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे ! कालाय तस्मै नम: _/\_

In reply to by चौथा कोनाडा

अनुस्वार Tue, 12/21/2021 - 21:30
रील बनवण्यात, नशा‌ करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय. अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!

जेम्स वांड Wed, 12/22/2021 - 09:39
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.

In reply to by जेम्स वांड

अनुस्वार Wed, 12/22/2021 - 11:17
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.

कर्नलतपस्वी Wed, 12/22/2021 - 14:50
आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते. बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या. अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे. वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता. गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे. दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते. असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही. पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते. ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे. कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं. गेलो होतो गावाकडं शोधत होतो पाऊलखुणा नदीकाठी होता उभा म्हातारा वड केविलवाणा हिरवगाऱ टुमदार गाव नाव त्याच होतं खेड सय येता गावाची मन अजुनही होतं वेडं......

In reply to by कर्नलतपस्वी

अनुस्वार Wed, 12/22/2021 - 21:23
मी फक्त सागरगोटे आणि काऊने (काव) रंगवलेले मातीचे बैल पाहिले आहेत. बाकी मला गोष्टी नवीनच. धन्यवाद. ‌

अनन्त्_यात्री Wed, 12/22/2021 - 15:49
गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे: (१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो. (२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्‍हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात. ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते. (३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे. (४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब. (५) कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात. "निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.

In reply to by अनन्त्_यात्री

Trump Wed, 12/22/2021 - 16:14
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी होउन घरी बसणे पसंत करतील, पण असे काम करनार नाहीत.
सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

In reply to by Trump

अनुस्वार Wed, 12/22/2021 - 21:38
एकवेळ भस्मासुरही परवडला पण सुविधा आणि तंत्रज्ञानाचा फ्रॅन्केन्स्टाईन होत चाललाय.

तर्कवादी Wed, 12/22/2021 - 16:57
अनुस्वार जी, लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे. प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार Wed, 12/22/2021 - 21:44
काही प्रतिसादांवरून आणखी लिहण्याची निकड प्रकर्षाने जाणवली. आता एक-एक बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने लिहिल. धन्यवाद.

अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

अवकाळी आला पाऊस

पाषाणभेद ·
काव्यरस
अवकाळी आला पाऊस त्यानं सारं रानं धुतलं हाती आलेलं पीक गेलं ते डोळ्यासमूर घडलं काय सांगावी दैना चहूबाजूनी तो आला ढगफुटी झाली जणू एकाजागी बरसला किती निगूतीनं केलं व्हतं शेत आवंदा बैलं नव्हते मदतीला औताला लावी खांदा खतं बियाणं आणूनीया येळेवर केला पेरा पाण्यासारखा पैसा पाण्यातच वाया गेला पाऊस आला घेवून पाण्याचा मोठा लोंढा न उरली बांधबंदिस्ती न उरला माती भेंडा दु:ख सारं गेलं वाहून आलेल्या पाण्यात उभारीनं करू पुन्हा तेच आपल्या हातात - पाषाणभेद २४/१०/२०२१