मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी (भाग २)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पहिल्या भागाची लिंक मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी (भाग १)
आवडता गीतकार याबद्दल चर्चा चालू होती .. आणि साहिर चे नाव आले नाही तर कसे चालले ? म्हणून साहिर विषयी थोडेसे ...
____________________________________________________________________________________________________________________
साहिरचा गीतलेखनाचा प्रवास सुरु झाला तो १९४९ सालच्या "आझादी कि राह पर" या चित्रपटापासून ... पण त्यांची खरी जोडी जमली ती सचिन देव बर्मन यांच्यासोबत. १९५१ साली आलेल्या नौजवान आणि बाजी या चित्रपटापासून.
असा एक किस्सा सांगितला जातो कि :
साहिर हे शायर म्हणून खूप लोकप्रिय होते .. पण त्यामुळे त्यानां चित्रपटात गीतकार म्हणून संधी द्यायला अनेक निर्माते घाबरत असत ... जवळ जवळ वर्षभर साहिर अनेक निर्मात्यांना भेटत होते पण काम मिळत नव्हतं ... अशातच सचिनदा मुंबईला संगीतकार म्हणून आले होते. त्यावेळी सचिनदांना साहिर कोण हे माहितहि नव्हते . असेच एक दिवस साहिर सचिनदांना भेटायला त्यांचं हॉटेलच्या रूमवर गेले ... आपला परिचय दिल्यावर सचिनदांनी एक चाल ऐकवली व गाणे लिहायला सांगितले ... साहिरने लगेचच शब्द ऐकवालर ... ठंडी हवाएँ। .. लेहेराके आए। .. अणि इथून या दोघांची जोडी जमली ती "प्यासा" पर्यन्त
प्यासा .. संगीताच्या दृष्टीने उत्तम चित्रपट .. पण शायरीच्या दृष्टीने सर्वोच्च शिखर (हायलाइट)
ह्या चित्रपतील "ये दुनिया अगर मिल भी जाएँ है" आणि "ये महलों ये तख्तों ये ताजोंकी दुनिया" ही गाणी तर अंगावर काटा आणतातच. पण या चित्रपटात साहिरच्याच काही कविता / शेर नायकाच्या तोंडी वापरले आहेत ते मात्र लाजवाब आहेत.
चित्रपटाचा नायक एक कवी असतो आणि संपूर्ण चित्रपटावर एक दुःखाची छाया आहे ... कवीची उपेक्षा, अवहेलना आणि त्यातून येणारा संताप हाच या चित्रपटाचा गाभा आहे ... साहिरचे शब्द हे वातावरण गहिरे करून जातात.
ये हँसते हुए फूल, ये महका हुआ गुलशन
ये रंग में और नूर में डूबी हुई राहें
ये फूलों का रस पी के मचलते हुए भँवरे
मैं दूँ भी तोह क्या दूँ तुम्हें ए-शोख नज़ारो
ले देके मेरे पास कुछ आंसू हैं कुछ आहें यारों
आणि हे आपल्या अंगावर येत ते रफीच्या जीवघेण्या आवाजात ... कुठल्याही वाद्यांशिवाय. तालवाद्य तर सोडाच पण सुरवाद्यही नाहीत... निरव शांतता आणि रफीचा आवाज ... बस एव्हढच .. बाकीचं काम शब्दच करून जातात
असाच एक शेर ...
ग़म इस क़दर बढ़े, के मैं घबरा के पी गया
इस दिल की बेबसी पे, तरस खा के पी गया |
ठुकरा रहा था मुझको, बड़ी देर से जहां
मैं आज सब जहां को, ठुकरा के पी गया |
कवीच दुःख आणि मग दुनियेला लाथ मारायची कलंदरी... साऱ्या चित्रपटाचं सारच जणू
थोडं विषयांतर ....
यातील मैं घबरा के पी गया वरून दुसरी एक गझल आठवली. सागर सिद्दीकी यांची
मैं तल्ख़ी-ए-हयात से घबरा के पी गया
ग़म की सियाह रात से घबरा के पी गया
तल्ख़ी-ए-हयात म्हणजे जगण्यातलं दुःख, कडवटपणा
ग़म की सियाह रात से म्हणजे दुःखद अंधारी रात्र
मैं आदमी हूँ कोई फ़रिश्ता नहीं हुज़ूर
मैं आज अपनी ज़ात से घबरा के पी गया
ज़ात म्हणजे कुळ / वंश किंवा आपण स्वत: आपले अंतरंग ... कुठलाही अर्थ घेतला तरी सामान्य माणूस घाबरणारच
काँटे तो ख़ैर काँटे हैं इस का गिला ही क्या
फूलों की वारदात से घबरा के पी गया
काटा रुते कुणाला ... मज फुलही रुतावे .... काटा टोचणारच त्याच दुःख नाही ... पण फुलंही असच वागू लागली तर ....
'साग़र' वो कह रहे थे कि पी लीजिए हुज़ूर
उन की गुज़ारिशात से घबरा के पी गया
गुजारिश : आग्रह ...
थोडं विषयांतर झालं .. पण प्यासातल्या अजून एका गझलेविषयी पुढच्या भागात… आणि साहिर - सचिनदा यांच्याबद्दलही
प्रतिक्रिया
साहिर-सचिनदेव बर्मन यांच्याविषयी वाचायला उत्सुक.
लेख आवडला
सुरेख..सुरिला लेख.. पुढील
'तंग आ चुके हैं कश्मकशे' आणि 'हम को तुमारे इष्क ने'
व्वा चित्रगुप्त साहेब
साहिरची १२२ हिंदी सिनेमांसाठी ७३३ गाणी, त्यांचे गायक
प्यासा!
जाने वो कैसे लोग थे जिनके .. हेमंतकुमार
बापरे!!
पडद्यामागची बदनाम(??) अंधारी दुनिया आहे ही.
अतिशय सुंदर