✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेरा कुछ सामान... भावानुवाद.

प — प्राची अश्विनी, Wed, 11/10/2021 - 15:52
तुझ्यापाशी ठेवलेले काही जपून अजून. चिंब चिंब भिजलेले श्रावणाचे काही दिन.. एक रात्र थांबलेली पत्र माझे पांघरून, रात्रीला त्या विझवून दे ना सारे पाठवून.. ऐकतोस ना रे तूही पाचोळा हा वाळलेला? नाद त्याचा एकदाच कानांमध्ये माळलेला.. शिशिराची एक फांदी हलताहे रे अजून, तीच डहाळी मोडून दे ना सारे पाठवून.. छत्री एकुलती एक, दोघे अधमुरे ओले कोरडे वा चिंब थोडे. सुके तर माझ्यासवे; उशापाशी भिजलेले राहिले का माझे मन? आवरून सावरून दे ना सारे पाठवून.. अगणित चंद्रवेळा.. एक तीळ खांद्यावरी.. मेंदीओला दरवळ.. रुसवे ते कितीतरी, आणि अनेक वचनं खरीखोटी भासणारी.. बघ तूही आठवून दे ना सारे पाठवून.. पाठवशी जे तू सारे मृण्मयी ते करण्याची, दे ना मला अनुमती डोळे तिथे मिटण्याची..

प्रतिक्रिया द्या
16129 वाचन

💬 प्रतिसाद (34)

सुंदर

Bhakti
Wed, 11/10/2021 - 16:57 नवीन
सुंदर एक रात्र थांबलेली पत्र माझे पांघरून, खुप दिवसांनी ह्या गाण्याला साद मिळाली,कानात ऐकू येतंय!
  • Log in or register to post comments

अतिशय तरल सुंदर गाणं आहे ते.

प्राची अश्विनी
Wed, 11/10/2021 - 19:32 नवीन
अतिशय तरल सुंदर गाणं आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अगणित चंद्रवेळा.. एक तीळ खांद्यावरी..

नीळा
Wed, 11/10/2021 - 17:49 नवीन
उत्तम अनुवाद.... एक शंका म्हणून वीचारतो मूळ गाण्यात एकसो सोला चांद की राते ...असा उल्लेख आहे तर 116 ला काही महत्त्व आहे का असं विचारायचं होतं
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्राची अश्विनी
Wed, 11/10/2021 - 19:32 नवीन
खास अर्थ नसावा. आपण " शंभर वेळा सांगितलं.." असं म्हणतो तसंच अनेक वेळा या अर्थासाठी तो आकडा वापरलाय. एका मुलाखतीत ते म्हणाल्याचं आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा

अरेरे ताई...

चांदणे संदीप
Wed, 06/28/2023 - 09:11 नवीन
एकतर ही कविता मी आधी मिसली. आणि आत्ता "एकसौ "सोलह चांद की राते" ऐवजी "अगणित चंद्रवेळा" हा बिनआत्म्याचा देह पाहून मिसलेलीच बरी होती असं वाटून गेलं. अजून एक, गुलजार साहेबांचं मूळ काव्य मुक्तछंदात असूनही त्यात प्रचंड गेयता, लय आहे. इथे यमकं जुळवूनही तो परिणाम साधता आलेला नाही. अनुवाद किंवा भावानुवाद करताना एकाचवेळी सहजता आणि कल्पकता अशा दोन्ही गोष्टी अनुवाद करणाऱ्यापाशी असाव्या लागतात. असो, ह्यामुळेच मी अनुवाद करण्याच्या फंदात फारसा पडत नाही. जे उत्तमरित्या करतात त्यांचं मला खूप कौतुक आणि हेवा वाटतो. इथे मिपावरच काही लेखक/लेखिका आहेत. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद!!

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 06/28/2023 - 11:42 नवीन
भावानुवाद प्रचंड आवडलेला आहे. शिवाय मीटरमध्येही आणि अर्थामध्येही बसतोय. कसं काय सुचतं बुवा लोकांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

राजेंद्रजी धन्यवाद!:)

प्राची अश्विनी
Wed, 06/28/2023 - 19:07 नवीन
राजेंद्रजी धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

एकशे सोळा चांदण्या रात्री

गवि
Wed, 06/28/2023 - 12:27 नवीन
एकशे सोळा चांदण्या रात्री एकीकडे आणि तुझ्या खांद्यावरचा एक तीळ एकीकडे असा मूळ काव्यात / गाण्यात भाव अपेक्षित आहे असे वाटते. सौ सुनार की, एक लोहार की टाईप किंवा तत्सम. (क्रूड उदाहरण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

असो. :)

प्राची अश्विनी
Wed, 06/28/2023 - 19:06 नवीन
असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

नसो हो. शोधा . आहे असे

गवि
Wed, 06/28/2023 - 19:11 नवीन
नसो हो. शोधा . आहे असे काहीसे. तुम्हीही एक arbitrary नंबर असे म्हटले आहे त्याच्याशीच समांतर आहे हे. बाकी इतरत्र कुठेतरी तुषार काळभोर यांनी अन्य अर्थही सांगितला आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

गवि, असो हा प्रतिसाद संदीप

प्राची अश्विनी
Wed, 06/28/2023 - 19:42 नवीन
गवि, असो हा प्रतिसाद संदीप चांदणे यांच्यासाठी होते. तुम्ही जे लिहिलंय तेच मीही समजत होते. पण मला गुलजारची ती मुलाखत सापडत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

रोचक!

पुष्कर
गुरुवार, 11/11/2021 - 05:23 नवीन
असा विचार केला नव्हता, आणि काय उत्तर आहे माहित नाही. पण अशी एक कल्पना सुचली, की एका महिन्याचे ३० दिवस, किंवा ३० रात्री धरल्या, तर त्यातल्या २९ चाँद की रातें असतात, कारण ३०व्या अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. त्यानुसार ११६ चाँद की रातें म्हणजे बरोबर ४ महिने होतात. हे अगदीच रुक्ष गणिती भाषांतर झालं. कुणाला खरा अर्थ माहीत असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा

हो.. हाच अर्थ आहे त्या ओळींचा

रुपी
गुरुवार, 11/11/2021 - 07:48 नवीन
हो.. हाच अर्थ आहे त्या ओळींचा. ते दोघं चार महिने बरोबर असतात म्हणून.. आणि एक तुम्हारे कांधे का तील .. कारण त्याला स्वतः ला माहीत नसतं आणि तिने तो पहिल्यांदा पाहिलेला असतो. भौतिक गोष्टी तर देता येतील, पण हे बाकी सगळं कसं देणार.. कुठे तरी ऐकलं होतं की नंतर गुलजारांना वाटलं की ११६ नाही तर ११७ असायला हवं होतं.. का ते मला नक्की माहीत नाही. मी सिनेमा पाहिला तेव्हा खूप कमी लक्ष दिलं होतं.. गुलजारांची गाणी नंतर नीट ऐकायला लागले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर

वाचलो...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 11/11/2021 - 11:04 नवीन
जर गुलजार यांनी १८६ चांदकी राते असे लिहिले असते तर त्या वरुन मोठा गदारोळ माजला असता. गुगल बाबा सांगतो आहे की ११६ चंद्राच्या कलांबद्दल गुलजार साहेब बोलत आहेत. त्या ११६ कलांच्या चंद्रा पेक्षाही तो तीळ जास्त मोहक आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे. जय हो गुगलबाबा, जय हो गुलजार साहेब आणि जय हो प्राचीताई, सगळेच ग्रेट आहेत. भावानुवाद लै म्हणजे लैच आवडला हे वेगळे सांगायला हवे का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

हा व्हिडीओ का?

प्राची अश्विनी
Fri, 11/12/2021 - 08:34 नवीन
हा व्हिडीओ का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

एक सौ सोलह

प्राची अश्विनी
Fri, 11/12/2021 - 08:35 नवीन
एक सौ सोलह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

सुंदर

स्मिताके
Wed, 11/10/2021 - 21:38 नवीन
भावानुवाद आवडला.
  • Log in or register to post comments

वाह

मित्रहो
Wed, 11/10/2021 - 21:53 नवीन
सुंदर भावानुवाद मी मूळ गीत आणि अनुवाद दोन टॅबमधे उघडून वाचले. छान न्याय दिला. परत एकदा गुलजारचे अप्रतिम शब्द आणि संकल्पना डोळ्याखालून गेली.
  • Log in or register to post comments

सुंदर गाण्याचा सुंदर अनुवाद.

कॉमी
Wed, 11/10/2021 - 22:00 नवीन
सुंदर गाण्याचा सुंदर अनुवाद.
  • Log in or register to post comments

वाहा क्या बात है !

बिपीन सुरेश सांगळे
Wed, 11/10/2021 - 22:27 नवीन
वाहा क्या बात है ! मुळात मूळ गाणं प्रचंड आवडीचं आहे . आणि तुम्ही ते गाणं अतिशय उत्तम त्याच्या अर्थासहित अन गेयतेने उतरवलं आहे . छानच !
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पुष्कर
गुरुवार, 11/11/2021 - 05:35 नवीन
इतक्या सुंदर आणि तरल गाण्याचा भावानुवाद करायचा म्हणजे खूपच अवघड काम आहे. तुम्हाला ते अप्रतिम जमले आहे. ओवी वृत्ताची निवडही अगदी चपखल आहे. त्यातील भावास साजेशी.
  • Log in or register to post comments

-_/\_

प्राची अश्विनी
Fri, 11/12/2021 - 08:36 नवीन
-_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर

प्रतिमा उत्कट

अनन्त्_यात्री
गुरुवार, 11/11/2021 - 07:26 नवीन
प्रत्यक्षासम!
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर!

तुषार काळभोर
गुरुवार, 11/11/2021 - 13:06 नवीन
विशेषतः एकसो सोला चांदचं उगीच एकशे सोळा चंद्र असं नीरस 'भाषांतर' न करता अगणित चंद्रवेळा असं सुंदर काव्यात्मक रुपांतर केलं, ते खूप छान!!
  • Log in or register to post comments

:) धन्यवाद.

प्राची अश्विनी
Fri, 11/12/2021 - 08:35 नवीन
:) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

छान...

योगी९००
गुरुवार, 11/11/2021 - 16:07 नवीन
छान भावानुवाद..
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर भावानुवाद !

श्वेता व्यास
गुरुवार, 11/11/2021 - 17:26 नवीन
अतिशय सुंदर भावानुवाद !
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रदीप
गुरुवार, 11/11/2021 - 18:30 नवीन
भावानुवाद आवडला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्वांना.

प्राची अश्विनी
Fri, 11/12/2021 - 08:31 नवीन
धन्यवाद सर्वांना.
  • Log in or register to post comments

खूपच छान

१.५ शहाणा
Wed, 11/17/2021 - 19:44 नवीन
खूपच छान मराठीत केलेले गीत खूप भावले
  • Log in or register to post comments

व्वा, कया बात है !

चौथा कोनाडा
Wed, 11/17/2021 - 19:50 नवीन

क्लासिक !

💖

  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
Sat, 11/27/2021 - 18:39 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हे

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 06/28/2023 - 22:12 नवीन
हे जे काही आहे ते भयंकर आवडलय. प्राचीतै चा विजय असो.
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Mon, 07/17/2023 - 09:03 नवीन
मिका, thank you!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा