चारोळ्या

चारोळी: हिरवा"गार" पाऊस!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
27 May 2017 - 9:52 pm

पावसा पावसा ये लवकर
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार

चारोळ्या

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
1 May 2017 - 2:14 pm

नमस्कार मंडळी,

महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत.
इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार.
सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या. स्पर्धेतल्या तीन विजेते खालील प्रमाणे

~~~~~

प्रथम स्थान : उल्का

महाराष्ट्राचा परिचय
संस्कृतीने घडावा
मराठीचा पडघम
कर्तृत्वाने वाजावा

सद्भावनाशुभेच्छाअभिनंदनचारोळ्या

महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
25 Apr 2017 - 7:58 pm

नमस्कार मिपाकरांनो.
नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्‍या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्‍या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी.

विषय : महाराष्ट्र

प्रकटनआस्वादचारोळ्याभाषा

" ळ " च्या करामती

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in जे न देखे रवी...
3 Apr 2017 - 9:40 pm

"ळ" हे अक्षर जास्तीत जास्त वापरुन मी काही रचना केल्या आहेत. छंदबद्ध किंवा चारोळी प्रकारचे हे लेखन आहे. म्हणून 'जे न देखे रवी ..' हे व्यासपीठ मी निवडले आहे. या रचना तुम्हाला कशा वाटतात बघा. सूचनांचे स्वागत आहे.

"ळ" चे यमक जुळावे असा प्रयत्न केलेला नाही.

१) आजोबांची कवळी
अळिमिळी गुपचळी,
नातू येता जवळी
आजोबांची खुलली कळी

२) कसलं खूळ , कोवळं मूल
डावा डोळा , लोण्याचा गोळा
बावळा बोका, मटकावी सगळा
मुलाच्या डोळा , पाणी गोळा

३) पिवळे पातळ, निळे काठ
गळा माळ पोवळ्याची |

पाठी रुळे नागीण काळी
माळी वळेसर बकुळीची |

चारोळ्या

वायाच एमबी चालली

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
29 Mar 2017 - 11:54 pm

दिसती अनेक हिरवे ठिपके तरी
कुणी देईना रिप्लाय हायला
वेदना नेमकी तीच जाणे फेसबुक
राहिलो व्यर्थ मी लॉगिन
चालली वायाच एमबी चालली

चारोळ्या

तुझ्या अंतरीची (चारोळी)

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
6 Feb 2017 - 3:44 pm

तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद

कविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकव्युत्पत्तीशब्दक्रीडाअभय-काव्यकविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविता

कधीतरी.....

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
29 Jan 2017 - 3:41 pm

उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....

भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....

चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....

मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!

(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद

कविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकगझलgazalprayogअदभूतकविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामराठी गझलमुक्त कवितारतीबाच्या कविताअद्भुतरस

शिव शिव

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जे न देखे रवी...
14 Jan 2017 - 5:41 pm

कुणी छापिती शिवमुख ध्वजी
कुणी घालिती राजमुद्रा करी
शिवरायांची तत्वे न कळे काही
दाढी वाढवून जो तो आरशात पाही

© कर्रोफर नमुरा

चारोळ्याvidambanअनर्थशास्त्रशिववंदनाअद्भुतरस

माझ्या प्रेमाचे मनोगत

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
12 Nov 2016 - 10:43 pm

कधी वाटे मजला जणु पोट भरून हसावे..
प्रेमाच्या या नात्यामध्ये अलगद हळूच फसावे..

कधी वाटे मजला जणु डोळे पाणवून रडावे..
काय जाहले विचार करूनी जीव आवळून चिडावे..

कधी वाटे मजला जणु तुझ्या प्रेमात रंगावे..
मिठीत घेऊन तुला कानी प्रेमळ गूज सांगावे..

कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे..
नयनी माझ्या तुझे निर्मळ निरागस हसू ठसावे..

कधी वाटे मजला जणु तुझी साथ असावी..
चांदण्या रातीत चंद्राच्या प्रकाशी तुझीच प्रित दिसावी..

कधी वाटे मजला जणु तुला समजून घ्यावे..
तुलाच माझ्या हृदयी ध्यानी मनी स्थान द्यावे..

कविताचारोळ्याप्रेमकाव्य