मी काय चुकीचे केले??

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
11 Apr 2024 - 5:23 pm

मी काय चुकीचे केले??
“कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या.
मी काय चुकीचे केले??

भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले.
मी काय चुकीचे केले??

एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही.
मी काय चुकीचे केले??

activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली.
मी काय चुकीचे केले??

संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला.
मी काय चुकीचे केले??

सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले.
“या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला.
मी काय चुकीचे केले??

“मी पुण्यात राहतो.”
“पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.”
“जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले.
मी काय चुकीचे केले??

“मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक”
“पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.”
ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली.
मी काय चुकीचे केले??

पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली.
“तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले.
ती काहीतरी पुटपुटत निघून गेली.
मी काय चुकीचे केले?? :(
सांगा सांगा मी काय चुकीचे केले??<:(

पाकक्रियाचारोळ्याआईस्क्रीमओली चटणीथंड पेयपंजाबीमेक्सिकनऔषधोपचारवन डिश मीलसरबतफलज्योतिष

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2024 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व चुकीचे केले. :)

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

11 Apr 2024 - 6:43 pm | कर्नलतपस्वी

एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला,
खाली काय लोंबत म्हणून विचारलं?
त्यानं धू धू धुतला,
मला सांगा अबांच काय चुकलं.....

अबांची निरागस तक्रार आवडली.

अबा,हल्के घ्या.

पुलंचा भक्त.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2024 - 7:19 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा. खतरनाक. हसून हसून वाट लागली. :)

अहिरावण's picture

11 Apr 2024 - 6:54 pm | अहिरावण

हा हा हा

भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं?

शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2024 - 7:19 pm | अमरेंद्र बाहुबली

खरंय.

अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2024 - 7:52 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद.

विवेकपटाईत's picture

12 Apr 2024 - 9:36 am | विवेकपटाईत

मीपाव भरपूर ट्रोलरस् आहेत.तुमच्या चुका दाखविण्यासाठी.

सुबोध खरे's picture

12 Apr 2024 - 7:47 pm | सुबोध खरे

मी काय चुकीचे केले

चोंबडे पणा, आगाऊपणा, जास्त शहाणपणा आणि बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली

हा हा हा. हा खरा प्रतिसाद. :)

सुबोध खरे's picture

12 Apr 2024 - 8:04 pm | सुबोध खरे

मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा

सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा

ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 8:20 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

अहिरावण's picture

13 Apr 2024 - 10:40 am | अहिरावण

आणि दुस-यांच्या दारात ओका-या काढत फिरा !!

पक्के डावे पुरोगामी आहात...

आणि दुस-यांच्या दारात ओका-या काढत फिरा !!

अगदी अगदी.
जिकडे तिकडे हौदोस मांडला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Apr 2024 - 8:54 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपवर टीका म्हणजे हैदोस असतो??

अहिरावण's picture

15 Apr 2024 - 6:58 am | अहिरावण

नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो.

हास्यास्पद बनला आहात तुम्ही !!
अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !!
नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला.

राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता.
सकारात्मक रहा !! आनंदी रहा..

जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

चित्रगुप्त's picture

15 Apr 2024 - 8:14 am | चित्रगुप्त

@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते.
हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल.
एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

चौकस२१२'s picture

16 Apr 2024 - 5:28 am | चौकस२१२

जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !
कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते.

जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी "
ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात

+१
श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते.
एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते.
सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

अहिरावण's picture

16 Apr 2024 - 11:36 am | अहिरावण

नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!

एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी.
कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!

किंवा
ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की
बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2024 - 12:10 pm | अमरेंद्र बाहुबली

या तुम्ही. इथे घाण नका करू.

या तुम्ही. इथे घाण नका करू.

म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

अहिरावण's picture

16 Apr 2024 - 1:25 pm | अहिरावण

अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात

संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

कर्नलतपस्वी's picture

16 Apr 2024 - 1:14 pm | कर्नलतपस्वी

बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे.
अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी
मगच लिहा.

मत स्वतंत्र असणे आणि हेकटपणा करुन मीच तेवढा शहाणा असं मत असणे यात फरक आहे

चौकस२१२'s picture

16 Apr 2024 - 4:15 pm | चौकस२१२

बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत.
असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

शक्य आहे. कॉग्रेसची ट्रोलसेना आहेच पैसे वाटणारी

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2024 - 12:09 pm | अमरेंद्र बाहुबली

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

अहिरावण's picture

16 Apr 2024 - 1:24 pm | अहिरावण

अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे.

सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला

जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

कांदा लिंबू's picture

24 Apr 2024 - 12:56 pm | कांदा लिंबू

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो.

सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो.

तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता.

डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या.

अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

स्वरुपसुमित's picture

24 Apr 2024 - 9:08 am | स्वरुपसुमित

त्याना की घरच्याना
?

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2024 - 12:06 pm | अमरेंद्र बाहुबली

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.”
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ?
आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

कांदा लिंबू's picture

24 Apr 2024 - 12:42 pm | कांदा लिंबू

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...

... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

सुबोध खरे's picture

24 Apr 2024 - 7:00 pm | सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
..............!!!!!!

तुम्ही पाकिस्तान लेखमालेचे भाग पटपट नाही टाकले

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 10:55 pm | अमरेंद्र बाहुबली

दर शुक्रवारी टाकतो. आज उशीर झालाय.

अहिरावण's picture

13 Apr 2024 - 10:40 am | अहिरावण

बासी ईद मुळे का?

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2024 - 1:11 pm | चौथा कोनाडा

हा... हा... हा...

चूक ती चूकच!

चुकीला माफी ना..... ही!

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Apr 2024 - 8:03 pm | अमरेंद्र बाहुबली

दोन किस्से राहिले टाकायचे.
त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.”
मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?”
त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही.
मी काय चुकीच केले?

एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं.
त्यानी मला ब्लॉक केले.
मी काय चुकीच केलं?

अहिरावण's picture

14 Apr 2024 - 8:06 pm | अहिरावण

>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?”

प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची?
साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

चौकस२१२'s picture

15 Apr 2024 - 4:35 am | चौकस२१२

एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं.
त्यानी मला ब्लॉक केले.
मी काय चुकीच केलं?

त्याचा संधर्भ नाही दिलात?
"नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार)
तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय
हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

पण यातले प्रसंग खरे असतील तर कठीण आहे. 'सावधपण सर्व विषयी' फार महत्वाचे असते. दासबोध वाचावा अशी शिफारस करेन.

अपेक्षित क्रांती ४ जूनला होणार आहेच. वाद कशाला?

अहिरावण's picture

16 Apr 2024 - 1:27 pm | अहिरावण

क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर...

आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू's picture

16 Apr 2024 - 4:40 pm | कांदा लिंबू

अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो.

ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा.

#HelpAmbA

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2024 - 5:10 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजप विरोधि प्रतिसाद म्हणजे नकारात्मक प्रतिसाद?? किती तो भक्ती?

चौकस२१२'s picture

17 Apr 2024 - 4:17 am | चौकस२१२

अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा )
आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही
सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन "
( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

उग्रसेन's picture

17 Apr 2024 - 3:53 pm | उग्रसेन

भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,

काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

कर्नलतपस्वी's picture

16 Apr 2024 - 6:29 pm | कर्नलतपस्वी

नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल.

मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात.

बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये.

जरी तुकोबाराय म्हणत असतील की,
घासावा शब्द तासावा शब्द ....

पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

कपिलमुनी's picture

16 Apr 2024 - 5:40 pm | कपिलमुनी

जरा विरोधि सूर दिसला की भाजपच्या लोकांची जी जळते ते बघून मजा येते

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2024 - 5:46 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू.

भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे.

बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू.

शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही.

बाकी तुमचे चालू द्या !!

चौकस२१२'s picture

17 Apr 2024 - 4:18 am | चौकस२१२

१००%

उग्रसेन's picture

17 Apr 2024 - 3:44 pm | उग्रसेन

आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू.

फक्त प्रचारक असू. =))

उग्रसेन's picture

17 Apr 2024 - 3:43 pm | उग्रसेन

सहमत.

वेडा बेडूक's picture

19 Apr 2024 - 12:26 pm | वेडा बेडूक

पैसे मिळतात म्हणून स्वतः ला शेतकरी म्हणवणारे भिकारडे दलाल लोक भाजप च्या विरोधात लिहितात ते बघून मजा येते!

उग्रसेन's picture

19 Apr 2024 - 1:32 pm | उग्रसेन

भाजपने युवकांचा दहा वर्षात रोजगार घालवला
पगारी कार्यकर्ते भाजपा पक्षात दिसत आहे, वाचा.

अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

अहिरावण's picture

16 Apr 2024 - 6:55 pm | अहिरावण

त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली.

हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले.

फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ.

जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2024 - 6:57 pm | अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड ना?

अहिरावण's picture

16 Apr 2024 - 6:59 pm | अहिरावण

अजिबात नाही. तुमचा तर्क पूर्णपणे चुकला आहे.

मी पूर्णपणे मीच आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2024 - 7:07 pm | अमरेंद्र बाहुबली

:)

Bhakti's picture

17 Apr 2024 - 6:27 pm | Bhakti

वाटत नाही रे..वांडोबा 'मी कट्टर आहे ,असू..'असं कधी नाही म्हणायचा आणि म्हणेल असं वाटतं नाही.

@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा.
सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती.
-- आपला एक हितचिंतक.

अहिरावण's picture

17 Apr 2024 - 9:42 am | अहिरावण

सहमत आहे. प्रयत्न करा. नक्की जमेल

उग्रसेन's picture

17 Apr 2024 - 4:20 pm | उग्रसेन

तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल,

चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चंद्रसूर्यकुमार's picture

17 Apr 2024 - 7:10 pm | चंद्रसूर्यकुमार

असं आहे का संक्षी?

अहिरावण's picture

17 Apr 2024 - 7:16 pm | अहिरावण

अरेच्या ! हे आहेत होय ते !!

चावटमेला's picture

17 Apr 2024 - 3:31 pm | चावटमेला

मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

कांदा लिंबू's picture

17 Apr 2024 - 4:10 pm | कांदा लिंबू

हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.

सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

उग्रसेन's picture

17 Apr 2024 - 4:17 pm | उग्रसेन

लोक व्यक्तिगत आयुष्यात जसे आहेत तसे जालावर हे चांगलेच आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2024 - 5:58 pm | अमरेंद्र बाहुबली

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

चावटमेला's picture

17 Apr 2024 - 8:46 pm | चावटमेला

तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2024 - 9:04 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

चावटमेला's picture

18 Apr 2024 - 1:12 pm | चावटमेला

अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

उग्रसेन's picture

17 Apr 2024 - 3:50 pm | उग्रसेन

काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

सुबोध खरे's picture

17 Apr 2024 - 6:39 pm | सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2024 - 7:40 pm | अमरेंद्र बाहुबली

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित.
कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत)
त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट.
- भाजप प्रेमी डॉ. खरे.

सुबोध खरे's picture

17 Apr 2024 - 8:22 pm | सुबोध खरे

मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा

सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा

ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2024 - 8:26 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :)

अहिरावण's picture

17 Apr 2024 - 8:30 pm | अहिरावण

मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan
https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-bene...

नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले)

मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत

मिळाले उत्तर ?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2024 - 8:43 pm | अमरेंद्र बाहुबली

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि तुमच्या मुस्काटीत खाडकन बसली याबद्दल खेद आहे

सुबोध खरे's picture

18 Apr 2024 - 9:56 am | सुबोध खरे

@अहिरावण

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Apr 2024 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :)
हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)

माझ्या मते हा धागा वाचनमात्र व्हायला हवा. बराच खल झाला आहे बहुबलींचे "काय चुकले" यावर !!

सुबोध खरे's picture

17 Apr 2024 - 7:29 pm | सुबोध खरे

हॅ
त्यांचं कधी काही चुकतं का?