नारायण

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 5:15 pm

वॉट्सपवर सकाळी सकाळी निलेशचा गुडमॉर्निंगचा मेसेज. च्यायला लावतय आता कामाला.
सकाळपासून आहेस का? आहेस का? असे चारदा विचारुन साहेबांची स्वारी संध्याकाळी ऑफिसात अवतरते. फॉर्मलपणाचा कळस असे कपडे, एका हातात डायरी कव्हर चढवलेले आयपॅड, दुसर्‍या हातात रेबॅनचे डबडे अन अजून एक आयफोन घेऊन शूज कसे काढावे हा विचार करीत नुसताच उभा.
"अरे ये की तसाच" म्हणेपर्यंत साहेब खुर्चीवर बसलेले असतात.
हा निलेश. इव्हेंट मॅनेजर. हा फक्त कंपन्याच्या साहेबांना मॅनेज करतो असे आम्हा सर्व अ‍ॅडव्हर्टायझर लोकांचे मत.
"येर्टेलचे प्रिमीयम लाँच आहे. करतोस का?"
"काय काय घेतलास?" मी मुद्द्यावर
"सगळाच आहे इव्हेंट, अ‍ॅक्चुअली आरेम नव्हता तयार पण वरुनच बसवलाय दट्ट्या. तुला तर म्हैतेच आपली पहुंच" ह्याच्यावरच तडकतो आम्ही जास्त. कायम सेल्फरेड हे बेणं.
"माझ्याकडे काय?" अगेन मुद्दा
"फ्लेक्स आहे. बॅकड्रॉप आहे, नाष्टा, गिफ्ट न वेल्कम असं अजून बरच आहे. मी केलेय सगळं प्लान. " कधीच क्रमाने सांगणार नाही.
"कुठे अन कधीय?" मुद्दा
"परवा सकाळी. म्हणून तर आलो तुझ्याकडे. क्रियेटिव्ह आलेत. फॉर्वर्ड करतो लगेच. म्हणजे लाग लगेच कामाला. वाटल्यास मी आहेच इथे." ह्यो शाणा आता नुसते कंपनीचे मेल फॉर्वर्ड करणार. स्वतः डाऊनलोडसुध्दा करायचं जीवावर येते याला.
"अबे आधी प्लान दाखव. माझी कामे सांग. अन मला लोड आहे उद्या. जमणार नाही बहुतेक"
"सिंपल आहे रे. मी केलेय मॅनेज."
तिथल्या तिथे मेल फोर्वर्ड केले जातात. माझ्या पीसीवर माझेच ब्रॉडबॅन्ड वापरुन पाहिले जातात. मध्येच ऑफिसच्या वायफायचा पासवर्ड विचारुन स्वतःचे अ‍ॅप अपडेट केले जातात. त्या एक्सेलशीटच्या प्लानवरुन मला काहीही कळलेले नसते. त्याचा माझ्या परीने अंदाज घेत अस्तानाच निलेशने कंपनीच्या साहेबाला फोनवर घोळात घेतलेले असते.
"हो जायेगा सरजी, बस बिंदास रहो आप. सब संभाल लेंगे मेरे बंदे. अभी तो फिलहाल बॅकड्रोप रेडी है. बाकी बचे भी है लाइनमे."
अबे अजून कामाचा पत्ता नाहीये.
"अभ्या जरा बोलून घे की साहेबाशी. नोर्मल सांग होतेय सगळे म्हणून"
"तो साहेब त्याच्या ऑफिसात बे. माझा काय संबध?" माझा मराठी बाणा.
"अबे बोल नुसते. काय नसते एवढे"
:हां जी सर. बोलिये"
"देखो भई, नाम क्या तुम्हारा"
"अभिजीत"
" हा अभिशेक सुनो, कोई प्रोब्लम नही आना चाहिये. कोई जरुरत लगेगी मेरी? कोई हेल्प?"
"अभि ठिक है सर, निलेशसे बात करके बोलुंगा"
"ओके गो ऑन."
............................................................................
काम पाहिले जाते. वेळेत होण्यासारखे वाटत नसतेच. काय करणार पैसा बहुत कुत्ती चीज है. घेतो गळ्यात.
कंपनीचे क्रियेटीव्ह हा संशोधनाचा विषय. त्यांनी पाठवलेले फॉर्मॅट कळत नसतात. साईज हमखास चुकीच्या येतात. कसेबसे आर्टवर्क तयार होऊन प्रिंटिंगला जाईपर्यंत संध्याकाळ झालेली असते. ज्या हॉटेलमध्ये इव्हेंट असतो त्याची मापे येतात. ब्रेकफस्ट अन लंचची मेनु लिस्ट येते. तुतारी वाल्यासह बँडवाला येऊन अ‍ॅडव्हान्स घेऊन जातो. काय करणार येर्टेलच्या झेडेमला तुतारी वाजल्याशिवाय कारमधुन उतरता येत नसावे. लाईटवाला अन साऊंडवाला मध्येच तासभर डोके खाणारच असतो. रात्री उशीरा प्रिंटिंग सुरु झालेले असते. दोन तीन वाजेपर्यंत फ्रेम्स आणि स्ट्रक्चर तयार होते. चार वाजता झोपलेला मी साडेपाचच्या अलार्मने उठतो. कसेबसे ग्राऊंडवर जायचे कपडे चढवून फ्लेक्स युनिटला. तोपर्यंत तीस पस्तीस फोन करुन काम करणार्‍या पोरांना ऊठवलेले असते. एकेक स्टार जमा होतो. रिक्षा, टेम्पो येतो. सगळे सामान अर्ध्या तासात इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचते.
..............................................................................
हॉटेलच्या हॉलमध्ये अनेक जण नटून ठटून नुसतेच मोबाईलात डोसके घालून उभे असतात. लढाई के दिन खाडे ह्या तत्त्वाला जागून निलेशराव गायब असतात. शेजारी एक येर्टेल बया आपण सुपरमॉम की कॉलेजगर्ल हे कन्फ्युजन निस्तरत आणि वाढवत असते.
"हां तो अभिलाष पहुंच गये स्पॉटपर. सुनो मेरी बात. वो जो है येर्टेलवाली निशा. उसको सुन ले जरा. पूना का इव्हेंट भी उसी ने मॅनेज किया था.
च्यायला हायेत कीती इवेंट मॅनेजर? आणि मग मी काय करतोय कालपासून.
.
(क्रमशः)

मांडणीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

एस's picture

7 Mar 2016 - 5:23 pm | एस

=))

बोका-ए-आझम's picture

7 Mar 2016 - 5:28 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2016 - 5:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

अजया's picture

7 Mar 2016 - 5:37 pm | अजया

:)
पुभाप्र
रायटर्स ब्लाॅक निघालेला दिसतोय!

यशोधरा's picture

7 Mar 2016 - 5:45 pm | यशोधरा

=)) पटापटा लिही पुढचं.

प्रचेतस's picture

7 Mar 2016 - 5:59 pm | प्रचेतस

मस्त सुरुवात.
येर्टेलचं कव्हरेज कसं हाय बे सोलापूरात? इकडं लै कॉल ड्राप होतात म्हन्तेत.

त्येंचा इव्हेंट घेतला म्हणजे सिम थोडीच घेतो. ;)
बहुधा त्यांचे म्यानेजर सुध्दा एक वडाफोनचे सिम वापरत असले पायजेत.
आम्हीबी वडाफोन सीयुजी. दणकून भारी सर्व्हिस, दणकून भारी बिल.

प्रचेतस's picture

7 Mar 2016 - 6:15 pm | प्रचेतस

हीहीही.
आम्ही आयडियेची कल्पनावाले.

अद्द्या's picture

7 Mar 2016 - 6:08 pm | अद्द्या

हाहाहाहा

भारी .. लवकर टाक पुढला भाग

जबरदस्त, नारायणराव! एकच नंबर. पुभाप्र!

आतिवास's picture

7 Mar 2016 - 6:13 pm | आतिवास

पुढच्या भागाची वाट पाहते.

बॅटमॅन's picture

7 Mar 2016 - 6:15 pm | बॅटमॅन

जब्बरदस्त बे अभ्या. लयच जब्राट. फुडचा भाग येउंद्यात अता लौकरात लौकर!!!!!

पीके's picture

7 Mar 2016 - 6:31 pm | पीके

छान...
पुभाप्र

सूड's picture

7 Mar 2016 - 6:53 pm | सूड

वाह वाह!! पुभाप्र

हेमंत लाटकर's picture

7 Mar 2016 - 7:19 pm | हेमंत लाटकर

अभिजित, चान चान!

चांदणे संदीप's picture

7 Mar 2016 - 7:21 pm | चांदणे संदीप

वॉट्सपवर सकाळी सकाळी निलेशचा गुडमॉर्निंगचा मेसेज. च्यायला लावतय आता कामाला.

पहिल्याच बॉलवर सिक्स!!

लेखाचे नावही अगदी समर्पक! लगे रहो अभ्यादादा!
\o/ \o/ \o/

Sandy

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Mar 2016 - 7:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जोरदार अभ्याप्पा...आपलं नारायणाप्पा...

रच्याकने पहिल्या बॉलवर सिक्सर रे.

नाव आडनाव's picture

7 Mar 2016 - 7:30 pm | नाव आडनाव

:)

"अभिजीत"
" हा अभिशेक सुनो, ...
"हां तो अभिलाष पहुंच ...
एकदा खरडफळ्यावर "अभय" नाव दिलं होतं एका सदस्याने ... त्यानंतरंच कार्यकर्त्यांचं कंफ्यूजन होऊ नये म्हणून प्रोफाइल मधे नाव टाकलेलं दिसतंय :):):)

विवेक ठाकूर's picture

7 Mar 2016 - 7:40 pm | विवेक ठाकूर

लवकर लिही पुढचा भाग.

जव्हेरगंज's picture

7 Mar 2016 - 8:47 pm | जव्हेरगंज

अरे धमाल !!!

वाचतोय !!

पुभाप्र!!

प्रमोद देर्देकर's picture

7 Mar 2016 - 9:00 pm | प्रमोद देर्देकर

नाद खुळा रे फ्लेक्साभ्या. पुभाप्र.

वाचायला मजा येतेय. पण तुझी वाट लागली असेल.

श्रीरंग_जोशी's picture

7 Mar 2016 - 9:35 pm | श्रीरंग_जोशी

जोरदार सुरुवात झाली आहे.

पुभाप्र.

वैभव जाधव's picture

7 Mar 2016 - 10:20 pm | वैभव जाधव

अभ्या..
मस्त लिहिलंयस.

भरत्_पलुसकर's picture

8 Mar 2016 - 6:56 am | भरत्_पलुसकर

शानदार! जबरदस्त! जिंदाबाद !

अर्धवटराव's picture

8 Mar 2016 - 7:02 am | अर्धवटराव

इथे मिपाकर्स मस्त वेन्जोय करताहेत ष्टोरी... आणि मला काहिच टोटल लागेना झालिये :(

भाऊंचे भाऊ's picture

8 Mar 2016 - 8:34 am | भाऊंचे भाऊ

अगदी अगदी. मलातर टायटल वाचुन अडला नारायण गाढवाचे पाय धरी प्रकरण भासत आहे

संजय पाटिल's picture

8 Mar 2016 - 8:02 am | संजय पाटिल

वाचतोय..

नाखु's picture

8 Mar 2016 - 8:27 am | नाखु

परत नीट सांग पहिल्यापासून काय झालं ते !!! (प्रकट)

स्वगतः काय लिहितोय हा भावड्या एक लंबर आणि लाईनीत घेतोय एकेकाची,अता पुढच्या भागाची वाट बघण्याखेरीज दुसरं काय करणार !! घंटा !!!

अभुड्याचा मैतर नाखु

प्राची अश्विनी's picture

8 Mar 2016 - 9:15 am | प्राची अश्विनी

आवडले. पुभाप्र.

स्मिता चौगुले's picture

8 Mar 2016 - 10:36 am | स्मिता चौगुले

मस्तच..

वाचतेय ..

हायला त्या दाभोळकर,अवचटला मागे टाकलेस की.
आता तुळतुळीत करून एक कळा चष्मा लाव.

चार ड्रोन घेऊन टाक.

जेनी...'s picture

8 Mar 2016 - 11:39 am | जेनी...

हिहिहि..... मज्जा आली !!!

किसन शिंदे's picture

8 Mar 2016 - 3:51 pm | किसन शिंदे

हम्म! इव्हेंट मॅनेजमेंट हा खूप किचकट प्रकार. झाला सक्सेस तर अॅप्रिसियेशन, नाही झाला तर फायर.

मृत्युन्जय's picture

8 Mar 2016 - 3:56 pm | मृत्युन्जय

वाचतोय. पुभाप्र

अनुप ढेरे's picture

8 Mar 2016 - 4:07 pm | अनुप ढेरे

छान सुरुवात!

भीडस्त's picture

8 Mar 2016 - 5:28 pm | भीडस्त

आन्देव

भीडस्त's picture

8 Mar 2016 - 5:28 pm | भीडस्त

आन्देव

निशांत_खाडे's picture

8 Mar 2016 - 5:35 pm | निशांत_खाडे

नंबर एक.. येउद्या पुढचा भाग.

पैसा's picture

8 Mar 2016 - 6:05 pm | पैसा

:)

तर्राट जोकर's picture

18 Mar 2016 - 2:05 pm | तर्राट जोकर

किती प्रतिसाद मिळाले तर तुम्ही पुढचा भाग लिहणार?

बाळ सप्रे's picture

18 Mar 2016 - 2:27 pm | बाळ सप्रे

छान !!अभिजीत की अभिषेक की अभिलाष??

अभिमान.. हे पुढच्या भागात वापरता येइल :-)

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2016 - 2:32 pm | पिलीयन रायडर

अच्छा.. येर्टेल म्हणजे एअरटेल होय!!!!

आणि अभिजीत... अभिषेक.. अभिलाष...अभ्या... भारीच!

शित्रेउमेश's picture

18 Mar 2016 - 2:40 pm | शित्रेउमेश

अरे काय ?? एवढी जबरा सुरवात असते का कुठे??
येवुदे पुढचे भाग लवकर लवकर...

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2016 - 3:53 pm | टवाळ कार्टा

खिक्क

रघुनाथ.केरकर's picture

10 Jul 2017 - 4:09 pm | रघुनाथ.केरकर

भारी रे अभीलाश