मिस करू नये असे टीवी कार्यक्रम

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
25 Jan 2016 - 6:35 pm

आपण रोज टीवी पाहतोच, त्यात बहुसंख्य भरणा हा निरर्थक सीरियल किंवा तद्दन हलक्या दर्जाचे रियलिटी शो वगैरे असतात.

पण ह्या सगळ्यांच्या मधे हिस्ट्री टीवी १८ किंवा नॅशनल जियोग्राफिक, डिस्कवरी वगैरे कधी कधी प्रसंगानुरूप प्रचंड उत्तम अन चांगले कार्यक्रम देतात, जागतिक उतरंडीमधे भारताची पोजीशन जशी थोड़ी थोड़ी बळकट होत जाते आहे तसे तसे २६ जानेवारी १५ ऑगस्ट वगैरे ला किंवा भारतीय सणवारांना किंवा मंगलयान प्रक्षेपण सारख्या इवेंट्स ना ह्या चॅनल वर डॉक्यूमेंट्री स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते हे मागच्या २ वर्षांपासुन दिसते आहे,

तेव्हा आजचा मुहूर्त साधुन हा एक धागा सुरु करतोय डिस्कवरी एपिक नॅशनल जियोग्राफिक किंवा तुम्हाला जे चॅनल आवडते ते, त्यावर कुठलीही चांगली डॉक्यूमेंट्री असेल जी इतर मिपाकरांनी पहावी असे आपल्याला वाटत असेल त्या संबंधी आपण इथे माहीती शेयर करुयात मित्रहो

१ डॉक्यूमेंट्री फ़क्त भारत अन इथल्या जीवनाशी निगडित असाव्यात असे काही नाही तर विज्ञान , समाज विज्ञानं (सोशल साइंसेज) कला काहीही असू शकते, जीवनविषयक आध्यात्मिक काय वाटेल ते फ़क्त क्वालिटी असावे असे कार्यक्रम आपण टाइमिंग सहित इथे शेयर करुयात

*जर कार्यक्रम होऊन गेला असेल तर थोडक्यात कार्यक्रमाचा गोषवारा देता येईल

चलो सुरु करूयात :)

हे ठिकाणप्रकटनविचारआस्वादमाध्यमवेधबातमीमाहिती

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jan 2016 - 6:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

नॅशनल जियोग्राफिक इंडिया वर

"बी एस ऍफ़ : फर्स्ट लाइन ऑफ़ इंडियन डिफेन्स"

ही डॉक्यूमेंट्री आहे, ट्रेलर्स वरुन आमची अकादमी आठवली अन डोळे भरून आले होते (फिजिकल ते फाइनल पीक्ड कॅप टॉस पर्यंत सगळे), त्यामुळे ज्या कोणा मिपाकर बंधू भगिनी ला ते लाइफ पहायचे असेल त्यांनी आवर्जून ही डॉक्यूमेंट्री पहावी , बाकी कॉमेंट्स कार्यक्रम झाल्यावर देतो :)

उद्या (२६/०१/२०१६) रात्री ९ वाजता

सियाचेन : वर्ल्डस हाईएस्ट बॅटलफील्ड

ही डॉक्यूमेंट्री आहे, भारतीय लष्कर (रेगुलर आर्मी) कसे सियाचेन मॅनेज करते ह्यावर ही डॉक्यूमेंट्री आहे

दोन्ही कार्यक्रम आवर्जून पहा मंडळी

आजच व्हाॅट्स अॅपवर एका मैत्रिणीने जरुर पहा हा कार्यक्रम म्हणून लिंक पाठवली होती.तेव्हाच सोन्याबापूंची आठवण निघाली होती.जरुर पाहणार हा कार्यक्रम.

पियुशा's picture

27 Jan 2016 - 2:57 pm | पियुशा

पाहिला हा प्रोग्राम कालच हँट्स ऑफ फॉर इंडियन आर्मी :)माझे फेव फूड factory on discovery

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Jan 2016 - 2:18 pm | अनिरुद्ध.वैद्य

आमच सेट टॉप बॉक्स जळल मेलं नेमकं तेव्हाच.

ऑफिसात असल्यामुळे (हो, २६ ला पण ) हे कारेक्रम बघता आले नाहेत, मी यूट्युब वर शोधत आहे, कोणाकडे लिंक असल्यस द्यावी. सद्ध्या फक्त प्रोमोच दिसतो आहे.

जव्हेरगंज's picture

25 Jan 2016 - 6:48 pm | जव्हेरगंज

+1

एखादी डॉक्युमेंटरी युट्युबवर हिंदीमध्ये ऊपलब्ध असेल तर त्याचीही लिंक द्यावी!!

धन्यवाद!!

होबासराव's picture

25 Jan 2016 - 6:49 pm | होबासराव

उद्या (२६/०१/२०१६) रात्री ९ वाजता
सियाचेन : वर्ल्डस हाईएस्ट बॅटलफील्ड

ह्याचि तर जाहिरात येतेय तेव्हापासुन वाट पाह्तोय

यशोधरा's picture

25 Jan 2016 - 6:49 pm | यशोधरा

हायवे ऑन माय प्लेट चे रिरन्स. चॅनेल - NDTV Good Times- तुम्ही वर लिहिलेय तशी काही भारदस्त सिरियल नाहीये पण भारताच्या विविध राज्यां, गावांमधली खाद्य संस्कृती या शो वर पहायला मिळेल.

वे बॅक होम एम टीव्ही ईंडीज - आता ही यु ट्यूबवर पहायला मिळेल. १३ भागात विभागलेली ही सिरीज हिमाचलाचे अतिशय सुरेख दर्शन घडवते.

कितीही वेळा बघायची आपली तयारी आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jan 2016 - 6:49 am | कैलासवासी सोन्याबापु

१०० हिश्याने चालतील!!

नया है वह's picture

25 Jan 2016 - 7:18 pm | नया है वह

टॉकिज लाईट हाउस रविवार ४:३० संध्या.

http://www.zeetalkies.com/celebs-speak/zee-talkies-talkies-lighthouse-br...

मुक्त विहारि's picture

25 Jan 2016 - 8:08 pm | मुक्त विहारि

मुळात टी.व्ही. नामक येड्पट खोक्याचे आणि आमचे भरपूर वाकडे....

पण सोन्याबापूंनी धागा काढलाय, म्हटल्यावर धागा पहाणे भागच पडले.

धाग्याने निराशा नाही केली.

नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरी हे माझे आवडते चॅनल्स.

त्यातही, हाऊ दे डू इट, सेकंड्स फ्रॉम डिझास्टर्स, एयर क्रॅश इंन्व्हेस्टिगेशन हे माझे आवडते कार्यक्रम.

(गेली १० वर्षे मी टी.व्ही. बघीतलेला नाही.आजकाल यु ट्युबवरच भार टाकला आहे.)

ह्यावर मसाएपिसोड ओफ जान्हविच बाल अस का हि दिसायला नको, तेव्हा सार्थक होइल ह्या धाग्याच!
कल्पना उत्तम!

भंकस बाबा's picture

25 Jan 2016 - 9:48 pm | भंकस बाबा

काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे हंटिंग हिटलर पाहिला, अप्रतिम.
काल नाव सापडत नव्हते, आज दिसले, धन्यवाद.
माझ्या कामाच्या व्यापामुळे फ़क्त रविवार मिळतो. तुम्ही सुचवत रहा,नंतर यूट्यूब वर पाहिन्.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Jan 2016 - 10:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ज्यांना गाड्यांमधे विशेष रस आहे त्यांच्यासाठी काही शोज सुचवतो.
(चॅनेलः डिस्कव्हरी टर्बो)

१. फिफ्थ गिअर
२. वेस्ट कोस्ट कस्टम्स
३. रिस्टोरिंग क्रोनिकल्स (ब्लॅक अँड व्हाईट, बराचं दुर्मिळपणे पहायला मिळतो)
४. व्हीलर डिलर्स (बर्‍याचं जुन्या आणि दुर्मिळ गाड्या पहायला मिळतात)

काही आवडते शोज जे तुनळीवर पाहिले जातात.
१. मेगा फॅक्टरीज (ह्यामधला फेरारी, पेप्सी आणि लँबोर्गिनीच्या फॅक्टरीजचे भाग विशेष उल्लेखनिय)
२. मॅन वर्सेस वाईल्ड

मुक्त विहारि's picture

26 Jan 2016 - 9:44 am | मुक्त विहारि

+ १ माझ्या मुलांकडून.....

टॅबु ही नॅशनल जिओग्राफीक वरील मालिका अत्यंत आवडती आहे.
विलक्षण विषय दडवलेले दडपलेले विषय
मानवी मनाचा तळ ढवळुन काढणारी मालिका
आवडते.

बोका-ए-आझम's picture

25 Jan 2016 - 11:00 pm | बोका-ए-आझम

अप्रतिम मालिका. सध्या झी कॅफेवर येतेय. सीझन्स १ ते ६. FBI च्या Behavioral Analysis Unit ची पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने Mindhunter हे पुस्तकही वाचतोय. माणसाचं मन हा किती ढवळून टाकणारा विषय असू शकतो ते मनोरंजक पद्धतीने सांगणारी मालिका.

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 11:06 pm | संदीप डांगे

क्रिमिनल माइण्ड्स खूप आवडीची मालिका... सगळे भाग आवर्जून पाहायचो.

गेले वर्षभर टीवी नाही त्यामुळे काही मालिका बघायच्या असून बघायला मिळत नाहीत. इथे भरपूर चांगल्या मालिकांचे संदर्भ मिळतायत...

मारवा's picture

25 Jan 2016 - 11:14 pm | मारवा

कीती वाजता असते हो वेळ मालिकेची ?
म्हणजे कथानक अशा स्वरुपाची आहे की नॉन फिक्शन आहे ?
आणि हे पुस्तक कोणत हो बोकोबा हे कोण लेखक ? काय विषय ?
विस्तार करावा तुम्हाला इतकी आवडली म्हणजे कुछ तो बात होगी

बोका-ए-आझम's picture

26 Jan 2016 - 12:37 am | बोका-ए-आझम

एरिक हाॅचनर उर्फ हाॅच हा या BAU चा प्रमुख आणि मग इतर लोक - जेसन गिडिआॅन, डेरेक माॅर्गन, जेनिफर जूरो, एमिली प्रेंटिस, डेव्हिड राॅसी, स्पेन्सर रीड हे एजंट्स आणि पेनेलोपी गार्सिया ही रिसर्चर अशा लोकांची कथा. प्रत्येक भागात एक नवीन गुन्हा - खून आणि त्याची उकल पण मानसशास्त्रीय पद्धतीने. मला आवडण्याचं कारण यातले एजंट्स हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं आहेत पण त्यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांची कुठल्याही गोष्टीकडे पाहायची पद्धत वेगळी आहे. मुळात मानसशास्त्र हा माझा आवडता विषय आहे आणि यात तो अँगल खूप छान दाखवला जातो.

९ वर्ष झाली मी टी व्ही पाहिला देखील नाही

अन्नू's picture

26 Jan 2016 - 12:10 am | अन्नू

पुर्वी, म्हणजे एक दोन वर्षापुर्वी डिस्कव्हरीवर अनेक कार्यक्रम येत होते. त्यात डिस्कवरीवरचे माझ्या आवडते कार्यक्रम म्हणजे-

मॅन वर्सेस वाईल्ड: अगदी बोल खावून सुद्धा हा कार्यक्रम मी न चुकता बघायचो. ;) यात बिल ग्रील आपल्याला एखाद्या अज्ञात- निर्जन स्थळी फसल्यावर कशा प्रकारे खटपट करुन- त्यातून जिवंत बाहेर पडायचे याचे प्रात्यक्षिक करुन दाखवायचा. त्याच्या भ्रमंतीच्या काळात तो अनेक गोष्टींची उपयुक्त माहीतीही पुरवायचा.

हाऊ डू दे डू दॅट: अवघड, टेक्निकल लेवलच्या वस्तू कशा तयार केल्या जातात हे यात दाखविले जाते. काही वेळा इतर छोट्या व खाण्यासंबंधीत वस्तूंची माहीतीही यात समाविष्ट केली जाते.

हाऊ इट्स मेड: इथे छोट्या दैनंदिन वापराच्या किंवा खेळण्यापासून वस्तूपासून ते खाण्याच्या पदार्थांबद्दल त्या कशा तयार केल्या जातात याचे
याशिवाय सायन्स ऑफ स्टुपिड, डायनामो- मॅजिशिअन इम्पॉसिबल, मेगा फॅक्टरीज, अ‍ॅण्ड माय फेवरेट-
फूड फॅक्टरी

(पण आत्ता मात्र या प्रोग्रामचे तेच-तेच भाग रिपिट केले जातायत! :(... )

मयुरMK's picture

26 Jan 2016 - 12:16 pm | मयुरMK

मॅन वर्सेस वाईल्ड = बेअर ग्रील,
न चुकता पाहतो

बबलु's picture

26 Jan 2016 - 2:27 am | बबलु

Homeland,

Prison Break,

Person Of Interest,

How The Universe Works,

House of Cards,

The Sopranos,

How to get away with murder,

Cosmos,

Blacklist

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jan 2016 - 2:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतातही आता नेटफ्लिक्स आलंय असं कानावर आलंय. त्यामुळे माझ्याकडून ही शिफारस -

१. रिव्हर - एकांडा आणि स्किझोफ्रेनिक पोलिस, जॉन रिव्हर आपल्या पोलिस मैत्रिणीच्या खुनाचा शोध घेताघेता आपल्या माणूसघाणेपणावर मात करण्याचा प्रवास करतो.
२. ब्लॅक मिरर - याबद्दल मस्त कलंदरने स्वतंत्र लेखन केलेलं आहे. आणखी लिहीत नाही.
३. नार्कोस - कोलंबियन ड्रग बादशहाला अमेरिकन पोलिसांनी पकडण्याचा प्रवास; हाच ड्रग बादशहा स्थानिक रॉबिन हूड म्हणून परिचित असतो; त्याचा रॉबिन हूड ते गुंड असाही प्रवास यात आहे.

या तिन्ही मालिकांना वेग, गती आहे. प्रेक्षकांना विचार करायला लावणारं बंदीस्त लेखन आणि प्रभावी दिग्दर्शन आहे.

अनुप ढेरे's picture

26 Jan 2016 - 5:46 pm | अनुप ढेरे

तुमच्या सल्ल्याने नेट्फ्लिक्षचं उद्घाटन 'नार्कोज'ने केलं. २ एपिसोड बघितले. चांगले आहेत.
(बीएसेनेलवर नेटफ्लिक्स एक्दम मक्खन चाललं.)

कविता१९७८'s picture

26 Jan 2016 - 2:59 am | कविता१९७८

I shouldn't be alive दुसरी बर्‍याचजणाना आक्षेपार्ह वाटेल तरीही नाव लिहीतेच The Haunting

एवढ्या रात्रीचं बरोबर हेच नाव सांगायचं होतं का? Smiley

तुषार काळभोर's picture

26 Jan 2016 - 9:18 am | तुषार काळभोर

स्टोरीज बाय रबिन्द्रनाथ टागोर परत सुरू झालंय. (पहिल्या कथेत राआ आहे :) )
जावेद जाफरीचा वन्स मोर
राजा, रसोई और अन्य कहानियां
(आता सुरू नसलेला) एकांत
कधी कधी देवलोक (देवदत्त पटनाई़क)
(अवांतरः देवदत्त पटनाईक उत्तम मराठी बोलतात.)

हिस्ट्री: पॉन स्टार्स
(डिस्कवरी/हिस्ट्री/नॅटजिओ वरचे अत्यंत उत्तम कार्यक्रम आता तिसर्‍यांदा-चौथ्यांदा रिपीट होऊन रटाळ होऊ लागले आहेत.)

ट्रॅवलरः स्ट्रीट फूड, फूड सफारी

आदूबाळ's picture

26 Jan 2016 - 12:28 pm | आदूबाळ

देवदत्त पटनाईक मराठी बोलू शकतात हे ठाऊक नव्हतं. कार्यक्रम बघायला पाहिजे.

(हे एपिक काय आहे? चायनल आहे का? जालावर कुठे मिळेल?)

चांदणे संदीप's picture

27 Jan 2016 - 1:33 pm | चांदणे संदीप

+1

एपिकचे एपिसोड मायबोलीवरील स्वप्ना राज यांचा धागा पहा.
dw tv आणि nhkworld माझे आवडते चानेल.फक्त समयोचित नवीन डॅाक्यु व इतर कार्यक्रम असतात.रिपीट केलेच तर आठ दहा महिन्यांनी.

अन्नू's picture

26 Jan 2016 - 10:11 am | अन्नू

फॉक्स लाईफवरचं स्टाईल अ‍ॅण्ड सिटी राहीलंच कि!
त्याचबरोबर फूड सफारी आणि येस् अफकोर्स.. शुगर स्टार्स Smiley

(अवांतर- खुप वर्ष अगोदर V चॅनेलवर एक कार्यक्रम लागायचा.. एक्स युअर एक्स! एकदम रिअ‍ॅलिलिस्टीक प्रोग्राम होता तो. तरास देनार्‍या पार्टनरची कशी जिरवतात- याचे प्रात्यक्षिक दाखवले जायचे. आंम्ही तर आवर्जुन ते बघायचो ;) )Smiley

मयुरMK's picture

26 Jan 2016 - 12:14 pm | मयुरMK

ट्रवेल xp खास भटकंती करणार्यासाठी . जास्त जाहिरात सुद्धा नसते
एपिक वरील शो पण मस्त आहेत खास करून एकांत ..

विवेकपटाईत's picture

26 Jan 2016 - 12:46 pm | विवेकपटाईत

माझ्या सौ. ला आणि मातोश्रीना आवडणारी मालिका जी मिस करणे मला हि शक्य नाही. वेळ संध्याकाळी ७ वाजता. एक चांगले पुरुष मंडळी (दिल्लीत अधिकांश कामकाजी महिला हि संध्याकाळी सात नंतरच घरी पोहचतात).

उपयोजक's picture

26 Jan 2016 - 3:44 pm | उपयोजक

ट्रावल एक्स पी +१

पद्मावति's picture

26 Jan 2016 - 11:18 pm | पद्मावति

भारतात नेटफ्लिक्स वर House of Cards मिळालं तर जरूर पहा.
एका भयंकर पाताळ-यन्त्री आणि महत्वाकांक्षी कॉंग्रेसमन चा राजकाराणातला प्रवास. या प्रवासात त्याच्या तेव्हड्याच महत्वाकांक्षी बायकोचीही त्याला साथ असते. केविन स्पेसी ने जबरदस्त अभिनय केलाय. वॉशिंग्टन डीसी मधलं राजकारण, डावपेच, कुरघोडी, कारस्थाने ....डोकं चक्रावून जाईल इतक्या वेगाने कथा पुढे सरकते.

अभिजितमोहोळकर's picture

27 Jan 2016 - 6:35 am | अभिजितमोहोळकर

१९८९, १९९२ आणि १९९४ साली मायकल डॉब्जच्या हऊस ऑफ कार्ड्स, टू प्ले द किंग आणि द फायनल कट ह्या एकाच कादंबरी मालेतील तीन कादंबर्या प्रसिद्ध झाल्या. त्यावरून बीबीसी ने त्याच नावाच्या मालिका बनवल्या.मूळ कादंबर्या आणि मालिका दोन्ही लोकांना व समीक्शकांना आवडल्या. त्याचंच अमेरिकन रूपांतर करून नवीन हाऊस ऑफ कार्ड्स बनवली.

कपिलमुनी's picture

26 Jan 2016 - 11:49 pm | कपिलमुनी

माझी अतिशय आवडती सिरीज !
टोरेंटवरुन पाहिली

tushargugale's picture

27 Jan 2016 - 1:07 am | tushargugale

History varil pawn star
Jarur paha

रानडेंचा ओंकार's picture

27 Jan 2016 - 10:00 am | रानडेंचा ओंकार

Orphan Black... Based on Human Cloning
आत्ता तीसरा सीजन सुरु आहे...

मितभाषी's picture

27 Jan 2016 - 10:08 am | मितभाषी

हिस्ट्री 18
पाॅन स्टार
व्हाईस
फायनल ऑफर
हंटींग हिटलर
गांधी

होबासराव's picture

27 Jan 2016 - 1:24 pm | होबासराव

"बी एस ऍफ़ : फर्स्ट लाइन ऑफ़ इंडियन डिफेन्स"
सियाचेन : वर्ल्डस हाईएस्ट बॅटलफील्ड

दोन्हि जबराट होते, बी एस ऍफ़ वरचा एपिसोड पाहताना बापुंचे अकदमि वरचे सगळे भाग एकामागोमाग डोळ्यापुढे येत होते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jan 2016 - 1:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

कॅप टॉसिंग पाहताना डोळे पाझरायला लागले तशी बिचारी बायको आली आहे भेटायला ती पण कावरीबावरी झाली होती! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!! एक एक ऑब्स्टकल दिसले की जत्रेत जाणाऱ्या बारक्या पोरा सारखा हरवून जात होतो.

सियाचेन डॉक्युमेंट्री सुद्धा अफाट होती, सियाचेनची हाईएस्ट पोस्ट आहे त्यापेक्षा २ हजार फुट खाली ड्यूटी केली आहे एक रोटेशन त्यामुळे तिथे ही लगेच कनेक्ट झालो. :)

गुंड्या's picture

28 Jan 2016 - 12:07 pm | गुंड्या

द बिग बँग थियरी!

टवाळ कार्टा's picture

28 Jan 2016 - 2:24 pm | टवाळ कार्टा

नको रे....काहीजणांचे नाकाचे केस जळतील =))

वेल्लाभट's picture

28 Jan 2016 - 5:15 pm | वेल्लाभट

डिस्कव्हरी टर्बो वर काहीही बघा बेस्ट असतं. अर्थात वाहनांची आवड असेल तर.
अमेरिकन चॉपर
ओवरहॉलिंग (आता लागत नाही बहुदा)
पिंप माय राईड

टीएलसी वर काहीही.
आगोदर लोनली प्लॅनेट न चुकता बघायचो.

हिस्टरी वर
मेगा फॅक्टरीज

इत्यादी अनेक.

पण होणार सून मी या घरची ला तोड नाही!

अन्नू's picture

29 Jan 2016 - 10:40 am | अन्नू

प्रसाद१९७१'s picture

28 Jan 2016 - 5:20 pm | प्रसाद१९७१

हाऊस ऑफ सद्दाम - सद्दाम हुसेन आणि त्याच्या मुला-मुलींवरती बनवलेली ४ तासांचा सिनेमा आहे ( ५५ मिनिटांचे ४ भाग आहेत ) यु ट्युब वर आहेत का ते माहीती नाहीत, पण टोरंट वर मिळतील.

तसाच एक सिनेमा इजिप्त्च्या अन्वर सादात वर पण आहे. तो पण बघण्यासारखा आहे.

स्वराजित's picture

28 Jan 2016 - 5:39 pm | स्वराजित

सोन्याबापु धन्यवाद.

वपाडाव's picture

29 Jan 2016 - 5:21 pm | वपाडाव

साराभाई वर्सेस साराभाई

पद्मावति's picture

29 Jan 2016 - 10:27 pm | पद्मावति

नेटफ्लिक्स वर रीवेंज. मालीका पूर्ण झालीय पण उपलब्ध असेल तर जरूर पाहण्यासारखी आहे.
अमॅंडा क्लार्क ही मुलगी आपल्या वडिलांवर झालेल्या अन्यायाचा सूड घेते. अतिशय खिळवून ठेवणारी कथा. मला आवडणारी गोष्ट म्हणजे या कथेचा वेग आणि सस्पेन्स. थ्रिलर असूनही संपूर्ण मालीकेचा मूड डार्क किंवा डिप्रेसिंग नाहीये. खूप छान मालीका.

जुन्या पैकी एवरीबडी लव्स रेमंड. ऑल टाइम क्लॅसिक. आई- बायकोच्या भांडणात फसलेला मधे फसलेला रेमंड. कधीही कुठलाही एपिसोड पहा..अगदी फील गुड कॉमेडी.

पद्मावति's picture

31 Jan 2016 - 10:57 pm | पद्मावति

Downton Abbey कोणी बघितलंय /बघतंय आहे का?

मी आताच पाहयला सुरूवात केलीय. दोनच एपिसोड्स बघितले आतापर्यंत पण मला तरी खूप आवडतेय. मला स्वत:ला पीरियड ड्रामा, कॉस्ट्यूम ड्रामा आवडत असल्यामुळे असेल कदाचित पण अतिशय इण्टरेस्टिंग वाटतेय.
Downtton Abbey या एस्टेट वर राहणार्या एका खानदानी, प्रतिष्ठीत कुटुंब आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाच्या जीवनावर ही कथा आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 11:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

कित्येक सीरीज येतात मनांवर राज्य करतात अन जातात कोणाला कुठली ऑल टाइम हिट वाटते कोणाला कुठली माझी आवडती म्हणजे

हाउस, एम्.डी

ही सीरीज होय, एक माणुसघाणा डॉक्टर अन त्याने डिटेक्टिव सारखे रोग निदानात लावलेले डोके ही सीरियल पाहणे एक अनुभव आहे विशेषतः ह्यूज लॉरी ह्या गुणी अभिनेत्याने साकारलेला हाउस पाहताना अन तितकेच जास्त त्याला सपोर्टिंग कास्ट लिसा एडेलस्टिन, रॉबर्ट शॉन लियोनार्ड अन ओमर एप्प्स

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Aug 2016 - 9:03 am | कैलासवासी सोन्याबापु

हल्लीच एक उत्तम सिरीयल पाहण्यात आली, हिचे नाव म्हणजे 'द युनिट' , एरिक हॅने ह्याच्या "इन्साईड डेल्टा फोर्स" नामक पुस्तकावर आधारित असा हा शो असून, ह्यात वेगळेपण म्हणजे डेल्टा फोर्सची माणसे आपली टॉप सीक्रेट मिशन्स ते फॅमिली प्रॉब्लेम कसे मॅनेज करतात ह्याचे अतिशय सुंदर चित्रण आहे.

.

.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2016 - 9:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

ही लिंक

पूर्वाश्रमी आंध्रप्रदेश पोलीस स्पेशल टीम ग्रेहाऊंड्स अन सद्ध्या जिच्या काही बटालियन सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोज मध्ये सम्मिलित केल्या गेल्यात अश्या ईलाईट जंगल वॉरफेर गृप संबंधी एक अत्युत्तम डॉक्युमेंटरी आहे ही युट्यूबची , हा गृप जगातला सर्वोत्तम जंगल वॉरफेर गृप मानला जातो. यूएस नेव्ही सील्स सारख्या अत्युच्च ट्रेनिंग प्राप्त संस्था सुद्धा कधीच ०६ दिवसांच्यावर स्टँड अलोन ऑप करू शकत नाहीत जंगलात, ह्या टीमची तीच क्षमता किमान ०७ अन कमाल १६ दिवसांची आहे, हे एक प्रचंड मोठे अचिव्हमेंट आहे.

धर्मराजमुटके's picture

10 Sep 2016 - 11:01 pm | धर्मराजमुटके

चित्रफित बघीतली ! एवढे तंत्रज्ञान, जिद्द असूनही अजून नक्षली रोग आटोक्यात का येत नाहिये हे एक कोडेच आहे. कधीही बातम्या वाचल्या तर पोलीसच अधिक संख्येने मेलेले / जखमी झालेले दिसतात. अर्थात या फोर्स ने त्यांची आंध्रातून बर्‍यापैकी हकालपट्टी केली आहे. मात्र आता हा रोग महाराष्ट्र, छत्तीसगड येथे जास्त वाढत आहे. याच विषयावर अतिशय तपशीलवार मांडणी करणारे पुस्तक वाचले होते. आत्ता नाव आठवत नाहिये. संग्रह परत एकदा उघडून बघावा लागेल.

बापू.. हा व्हिडीओ बघितला आहे का..?

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2016 - 10:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

सुंदर विडिओ आहे! अडजुडन्टने दिलेल्या पेप टॉकची आठवण आली एकदम!

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Sep 2016 - 11:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

मिपावर असा विडिओ कसा चिकटवायचा हो??

रघुनाथ.केरकर's picture

9 Sep 2016 - 11:32 am | रघुनाथ.केरकर

सह्याद्री वाहीनीवरची "आमची माती आमची माणसं" साम टीवी वरचं अग्रोवन, सकाळच्या सातबाराच्या बातम्या, डिस्कोवरी वरच मेगास्ट्रक्चर ह्या अमच्या फेवरीट. पण युद्धावरच्या डॉकुमेंटर्‍या जास्त आवडतात, त्यातच जयंत कुल़कर्णी आणी बोका जींनी त्यांच्या लेखांनी उत्सुकतेत अजुन भर घातलीय.

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2016 - 12:16 pm | बोका-ए-आझम

- ५ सप्टेंबर पासून Breaking Bad season one सुरु झालेला आहे. कल्पनाच जबरदस्त आहे. ब्रायन क्रॅन्स्टनचा अभिनय लाजवाब. त्याने लिंकन लाॅयर मध्येही सुंदर काम केलं होतं.

अनिरुद्ध प्रभू's picture

9 Sep 2016 - 12:21 pm | अनिरुद्ध प्रभू

रविवारी संध्यकाळी ७ वाजता गंगा द सोल ओफ इंडिआ लागतं...उत्तम आहे.

Shridhar Laxman Patil's picture

9 Sep 2016 - 6:48 pm | Shridhar Laxman...

Epic channel वर devlok with devdutt नावाचा कार्यक्रम आहे. देवदत्त सरांच्या फॅन्स साठी चांगला कार्यक्रम आहे.

सही रे सई's picture

10 Sep 2016 - 1:43 am | सही रे सई

नेटफ्लिक्स वर काही दिवसांपूर्वी या मालिका पाहिल्या, जबरदस्त खिळवून ठेवतातः
१. द १०० - एका संपूर्ण विनाशक आण्विक युध्दानंतर अंदाजे १०० वर्षांनी १०० कुमारवयीन मुले मुली उपग्रहावरून परत पृथ्वीवर पाठवली जातात हे पाहाण्यासाठी की अणूयुध्दानंतरची पृथ्वी रहाण्यायोग्य आहे की नाही. त्या मुलांना कशाकशाला तोंड द्यावे लागते याचे थरारक चित्रण दोन सिझनस् मधे केले आहे.
२. झू - (मराठीत प्राणिसंग्रहालय) जेम्स पॅटर्सन आणि माईकल लेड्विज यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत ही मालिका आहे. यात असे दाखवले आहे की जर उद्या प्राण्यांनीही जमावाने ठरवून माणसांवर हल्ला करायला सुरवात केली तर काय आणि कसे भयानक होईल.
३. लिमिटलेस - ही मालिका पाहायला नुकतीच सुरवात केली आहे. ही पण एक थरारक मालिका आहे.

सोन्याबापू, बरं झालं तुम्ही हा धागा काढला. चांगल्या मालिकांची त्यामुळे ओळख होत आहे.