काय घेतलं, काय राहिलं?

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
22 Mar 2016 - 12:33 am

हे लिखाण पर-प्रकाशितच. कुणी अनामिकाने* लिहिल्यानंतर WhatsApp वर आलेल्या एका स्फुटाला मुक्तकाचं रुप द्यावंसं वाटलं, दिलं.

काय घेतलं, काय राहिलं?

पर्स, फोन, किल्ल्या हाती
आई निघे पोटासाठी
पगार मिळेल हातात
कसे यावे शब्द ओठी
'सगळं घेतलंय दिवसासाठी',
तान्हं बाळ घरात!

मंडप जेंव्हा होतो रिता
आईचे डोळे आभाळ ओले
रिक्त खुर्च्या, आणि अक्षता
इतस्ततः पसरलेले
'काय राहिले' शोधी पिता
गौरीहाराशी मलूल फूले
'सारंच तर मागे राहीलंय आता!'

आईची धडाडणारी चिता
स्मशान हळू रिकामे झाले
आवेगाने तो मागे फिरता
"काय राहीले?" भटजींंनी विचारले
चिमूटभर राख लागे हाता
"राहीलेले येणे नाही, किती दूर निघून गेले!"

------------------

*मूळ लेखक बहुतेक श्री. योगेश जोशी हे असावेत.

मुक्तकमाध्यमवेध

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2016 - 12:43 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर तरी कसे म्हणायचे याला ?!

चांदणे संदीप's picture

22 Mar 2016 - 12:50 am | चांदणे संदीप

वाऱ्याने उधळवून लावलेल्या फुलांना वेचून माळ गुंफावी यातच त्यांच्या सुगंधाचे खरे सार्थक असते. अगदी, त्याचप्रमाणे तुम्ही छान सर्व शब्दांना एका धाग्यात आणून सुंदर शब्दमाळच गुंफली आहे!

बाकी, शिर्षक वाचून वाटलं की, गुलजार यांच्या "क्या बीता, क्या रख्खा!" या कवितेवरच काही लिहिलं आहे!

Sandy

मनाला चटका लावणारे मुक्तक.

रातराणी's picture

22 Mar 2016 - 1:45 am | रातराणी

अप्रतिम!

वा छानच सूरेख प्रयत्न केलात
माझ्या लेखाचे हे रूपही मनापासून आवडले
धन्यवाद
योगेश जोशी

पैसा's picture

23 Mar 2016 - 9:29 am | पैसा

एवढे सुंदर मुक्तक लिहिणारे मिपाकर आहेत हे वाचून बरं वाटलं. मलाही व्हॉट्स अ‍ॅपवर हे फॉर्वर्ड आलं होतं, तुमच्या नावासकट. मात्र कसं काँटॅक्ट करावं कळले नाही. ब्लॉगवर लिहिता तसे मिपावरही लिहा प्लीज.

बहुगुणी, मूळ आशय कवितेच्या माध्यमातून जसाच्या तसा पोचवलात!

बोका-ए-आझम's picture

23 Mar 2016 - 12:35 am | बोका-ए-आझम

.

यशोधरा's picture

23 Mar 2016 - 12:37 am | यशोधरा

अत्यंत त्रासदायक..

पद्मावति's picture

23 Mar 2016 - 4:53 am | पद्मावति

शेवटचा परिच्छेद....कोणावरही, कधीही ही वेळ न येवो....

फारएन्ड's picture

23 Mar 2016 - 5:40 am | फारएन्ड

जबरी लिहीले आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2016 - 7:03 am | अत्रुप्त आत्मा

नको रे बाबा अस काही! :(

अजया's picture

23 Mar 2016 - 8:12 am | अजया

:(

नाखु's picture

23 Mar 2016 - 8:35 am | नाखु

गोष्टींचे मोल नसल्यावरच जाणवते (हा नियतीचा खेळ की माणसाचा करंटेपणा) अजून उत्तरे शोधतोय..

रचना आत हाडापर्यंत जाणार्या थंडीसारखी.

प्राची अश्विनी's picture

23 Mar 2016 - 8:46 am | प्राची अश्विनी

......

सस्नेह's picture

23 Mar 2016 - 10:50 am | सस्नेह

मूळ लेख आणि काव्यरूप दोन्ही चटका लावणारे !

काळजात कालवा कलव झाली वाचताना ........:(

चिनार's picture

23 Mar 2016 - 1:38 pm | चिनार

सूरेख !!!