मामाचं पत्र

लेखनविषय:
लेखनप्रकार
(विद्यार्थीदशेतील भाचे मंडळींसाठी) ---- विद्यार्थीदशेतील एक टप्पा मागे सरून चढणीचा प्रवास सुरू होईल आता. धुकं असेलही प्रवासात आणि मनातही, पण ते थोडंसं निवळावं म्हणून हे चार शब्द. ---- आरोग्य, सवयी: आरोग्य सर्वोपरी. या वयात हे ध्यानी-मनीही नसतं पण आरोग्याच्या चांगल्या सवयी आतापासूनच लावणं आवश्यक. नियमित सूर्यनमस्कार, ओंकार प्राणायाम अशा सोप्या, छोट्या गोष्टी खूप चांगला, सकारात्मक मानसिक परिणाम करतात, आत्मविश्वास द्विगुणित करतात. पण इथे महत्वाची असते ती नियमितता! चांगल्या सवयी आत्मसात करणं कठीण आणि त्या जपणं महाकठीण!

पुस्तक परिचय: मनात -- भाग १

लेखनविषय:
लेखनप्रकार
----
अभियांत्रिकीमधे करियर असूनही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात रुची जपणारे, किंवा इतर विषयात नाक खुपसणारे, खोऱ्याने सापडतील. अभियंत्यांचा तो अवगुण म्हणावा लागेल, किंवा तार्किक आणि तांत्रिक निश्चिततेचा कंटाळा.

पृथ्वी एक अंतराळयान

लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला मनातून अंतराळ वीरांचा हेवा वाटत असेल. लहानपणी अनेक स्वप्ने असतात. त्यापैकी एक म्हणजे अंतराळवीर होण्याचे! जुल व्हर्नचे ‘चंद्रावर स्वारी’ पुस्तक वाचले असणारच. पण पुढे मोठे झाल्यावर तुम्ही अंतराळवीरांच्या ट्रेनिंगची चित्रफित बघितली असेल किंवा हॉलीवूडचे चित्रपट बघितले असतील. मनातल्या मनात तुम्ही विचार केला असेल, “नको रे बाबा, त्यापेक्षा आपला ९ ते ५ जॉब चांगला आहे.” पण.... तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण आपण सगळेच अंतराळवीर आहोत! तुम्ही, तुमची प्रिया पत्नी, चिरंजीव गोट्या, शेजारचे काका-काकू, सोसायटीचा वॉचमन? येस, तो सुद्धा. आणि आपले अंतराळयान आहे पृथ्वी.

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

लेखनप्रकार
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते. मटामधील श्रध्दांजली https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-passed-away/articleshow/69346718.cms --------------------------- त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.

हे वाचा: शेष प्रश्न

कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

हे वाचा: चित्रलेखा

लेखनविषय:
कटाक्ष: भाषा- हिंदी लेखक- भगवतीचरण वर्मा प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३) प्रथमावृत्ती- १९३४ सध्याची आवृत्ती- २६ वी पृष्ठसंख्या- २०० किंमत- ₹२५० ISBN : 978-81-267-1585-5 ओळख: एका गुरूच्या दोन शिष्यांना 'पाप म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे गुरु एका शिष्याला योग्याकडे तर दुसऱ्याला ऐषोरामात आकंठ बुडालेल्या सरदाराच्या संगतीत राहण्याची आज्ञा देतात. या दोन शिष्यांसोबत जीवनाच्या दोन टोकांवर हिंदोळे खात वाचक जे अनुभव घेतो त्यांचा थरार 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा कमी वाटत नाही.

मुराकामी

लेखनप्रकार
हारुकी मुराकामी हा सांप्रतकाळातला एक जिनीयस लेखक. त्याचा वाचकवर्ग जगभर पसरलेला. म्हणजे उदाहरणार्थ मुराकामीच्या एखाद्या कादंबरीत टोक्योमधल्या कुठल्यातरी खरोखरच्या ब्रिजचं, लायब्ररीचं किंवा अशाच कुठल्याशा स्थळाचं वर्णन असतं. आणि ते एवढं प्रत्ययकारी असतं की त्याचे वाचक नेटवर त्या स्थळासंबंधी व्हिडिओ किंवा फोटोज् शोधत राहतात..! त्याच्या कादंबऱ्यातली माणसं काही हिरो-बिरो नसतात. पण अशा सिंपलशॉट माणसांनाही मुराकामी फारच ताकदीने आपल्यापुढे पेश करतो.. कल्पनेच्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर तो पात्रांना मनसोक्त खेळवतो. पात्रांसोबतच आपल्यालाही खेळवतो, जोखतो..!

प्रतिभावंतांच्या तऱ्हा !

लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात. या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या किश्शांची संख्याही भरपूर असते. अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल !

एक अपरिचित प्रकाशन - सैनिक समाचार

भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणाऱ्या सैनिक समाचार या पक्षिकाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवातीला 16 पानांचे ते साप्ताहिक केवळ उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमधून फौजी अखबार प्रकाशित होऊ लागला. आज इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमधून हे प्रकाशन प्रकाशित होत आहे. सुरुवातीला फौजी अखबारचे मुख्य कार्यालय सिमल्यात असले तरी त्याचे प्रकाशन अलाहाबादहून होत असे. भारतीय लष्करातील घडामोडींची माहिती जवानांना करून देता यावी या हेतूने फौजी अखबार सुरू करण्यात आले होते.

लिहिणं

लेखनप्रकार
लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं! एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं.
Subscribe to साहित्यिक