Skip to main content

साहित्यिक

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 19/01/2023 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही.

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग २ -- लग्न

लेखक श्रीगणेशा यांनी गुरुवार, 29/12/2022 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे. ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल: The Art of Living या लेखमालेतील आधीचा लेख: पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम ---- लग्न लग्नबंधन मग ते लवचिक असो वा जाचक, लग्न समारंभ किंवा कायदेशीर संमतीपत्र हे सर्वत्र स्वीकारले गेले आहे.

दे दवांचे प्याले

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 14/12/2022 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे? तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले माळून दे म्हणालीस, माला तारकांची केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले भेटता तुला उराशी, श्वासात आग येते क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले - संदीप चांदणे
काव्यरस

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 05/11/2022 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे. ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल: The Art of Living The Art of Living ---- पूर्वचित्र (flashback) कॉलेजचे दिवस. रविवार संध्याकाळ. मेसला सुट्टी.

काही विस्कळीत जुन्या नोंदी

लेखक जिन्क्स यांनी बुधवार, 02/11/2022 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
Mandir माझ्या लहानपणीच्या घरा/अंगणाबद्दलच्या काही आठवणी. १. अंगणाच्या नैऋत्येला सूर्यास्तेकडे झुकलेला मोठा गुलमोहर होता. एवढे देखणे झाड पुढे आयुष्यात कधी पाहिले नाही. पूर्ण वाढीचा हा गुलमोहर एका सतेज कांतीच्या रुबाबदार पुरुषासारखा वाटायचा. ऐन रखरखलेल्या उन्हाळ्यात जेंव्हा इतर झाडे कोमेजून जायची तेंव्हा हा गुलमोहर तांबडी फुलें अंगावर फुलवून रुबाबात उभा असायचा. हा म्हशींच्या गोठ्याच्या मागे होता म्हणून रोजच्या वावरात तो दिसत नसे.

माझ्या कथा

लेखक भागो यांनी शुक्रवार, 28/10/2022 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचा दिवाळी अंक येण्यास वेळ लागत आहे . ठीक आहे, तोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवा. माझ्या पाच कथांचा रंगीबेरंगी कथा संग्रह https://drive.google.com/file/d/1AZIkBa-18Q4w-rQIvh8fhnG7Emkwn9mQ/view? usp=sharing इथे आहे. विनामूल्य डाउनलोड करू शकता.

माझिया मनाला ( कथा )

लेखक चष्मेबद्दूर यांनी मंगळवार, 18/10/2022 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.

माझिया मनाला ( कथा )

लेखक चष्मेबद्दूर यांनी मंगळवार, 18/10/2022 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

लेखक अनुनाद यांनी रविवार, 04/09/2022 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.