साहित्यिक

लोकल (लघु भयकथा)

पण माझीच चूक आहे असं का वाटतंय मला?
साला हा एक विचार मनातून जातच नाहीये, आजचा दहावा दिवस. घरी बसून आहे मी, उद्यापासून ऑफिस ला जावच लागणार, नाहीतर नोकरी जायची.
कितीही मन रमवायचा प्रयत्न केला तरी ती रात्र डोक्यातून जातच नाही. ट्रेन चा भयंकर गोंधळ झाला होता त्या रात्री.नाहीतर ११ :३५ ची कसारा किती रिकामी असते. पण त्या दिवशी तब्बल ३ तास ट्रेन बंद होत्या, आणि त्यानंतर सुटणारी हि पहिली ट्रेन होती.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

मराठी

महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले

ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं. आता गेले काही वर्ष, मराठी आणि मुंबई बाबत जे घडलंय, घडतंय, त्यावर सुचलेलं हे मुक्तक.

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो.

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं.
दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता.

राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले.
पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए…
वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके…

एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ"
त्याचा फोन वाजतो.
"हं बोला सर"

गाजरं

रोम्यांटिक लोक याला मधाचं बोट म्हणतात.
बिचारी छोटी मुले अन बालबुद्धीचे याला चोकलेट म्हणतात.
आमच्यासारखी ओबडधोबड माणसं याला गाजरं म्हणतात.

अशी गाजरं आपल्या अगलबगलेत, समोर, दूर, डोक्यावर लटकवत ठेवणारे चिक्कारजण असतात.
हि गाजरं सर्व प्रकारची, सर्व आकाराची, सर्व प्रतीची असतात.
हि गाजरं कधीही दिसत नाहीत. हाती लागणं तर दूरच!
या गाजरांच्या मागे धावायला लावणारे तर कोपऱ्याकोपऱ्यात दबा धरून बसलेले असतात!
या गाजरांची किमत आपण ठरवत नाही, पण मोजत राहतो.
...... काय काय देऊन? ..... आपापल्या मनाचे खिसे तपासून पहावेत!

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

ट्रॅप आणि विषकन्या बद्दल आरोप

ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्‍यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

दिगंबर - फसलेला संन्याशी अन थकलेला संसारी

'स्वामी दया करा.
आता या वयात हे करायला सांगू नकात.
कळत नव्हतं, तेव्हापासून तुमच्या पंखाखाली घेतलंत मला!
चार चांगल्या गोष्टी शिकवल्या!
ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत.
येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत.
चार घरी अनवाणी पायांनी भिक्षा मागायला शिकवलीत.
प्रसंगी, स्वतः रांधून एकटच जेवायला शिकवलंत.
स्वामी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत,
पण आता हे करायला सांगू नकात!

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

Don't lose out; Work out - पुस्तकाची ओळख

नमस्कार,

नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. रुजुता दिवेकर यांचं - डोन्ट लूज आउट; वर्क आउट

प्रत्येक पानागणिक एखादी ऐकलेली, बोललेली, वाटलेली, गोष्ट समोर येत गेली. 'अरे हेच.... अगदी हेच वाटलेलं...' किंवा 'ऐला मीही असंच म्हणतो...' असं मनाशी वाटल्याशिवाय पुस्तकातला एकही धडा संपला नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना विशेष मजा आली.

शीर्षकावरूनच पुस्तकाचा विषय कळतो. वर्काउट, किंवा व्यायामावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. व्यायाम महत्वाचा आहे कारण असंख्य जण तो महत्वाचा समजत नाहीत. लेखिकेची या विषयावरील पकड निर्विवाद असून त्याचा प्रत्यय पुस्तकातील मांडणीतून येत रहातो.

मातृभाषेची सेवा

आपल्या मातृभाषेचा आदर आणि अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांचा अपमान आणि द्वेष करावा हे सर्वस्वी चूक आहे. इतर भाषांचा अपमान करून मातृभाषेची सेवा होत नसून मातृभाषेत बोलून, लेखन वाचन करून, लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांना दाद प्रोत्साहन देऊन, इतर भाषेतील उत्कृष्ट साहित्य मातृभाषेत आणून तसेच शब्दकोश सतत वृद्धिंगत करून ती सेवा घडत असते आणि मातृभाषा टिकून राहते. खरा मातृभाषेचा पुरस्कर्ता इतर भाषाही तेवढयाच तन्मयतेने शिकतो, वाचतो, बोलतो, लिहितो.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

Pages