साहित्यिक

लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
30 Dec 2019 - 3:16 pm

साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात.

साहित्यिकविचार

दसरा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
8 Oct 2019 - 7:24 pm

जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो
रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो

ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो
नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो

आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो
सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो

सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी
बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी

दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

शिवकन्या

कविता माझीभावकविताकरुणवीररसरौद्ररसमांडणीसंस्कृतीधर्मइतिहासकवितासाहित्यिकसमाज

दो डोळ्यांचे....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
4 Oct 2019 - 12:46 pm

दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे
त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे

डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी

गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका
पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला

सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा
इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा

-शिवकन्या

कविता माझीकालगंगाप्रेम कविताविराणीसांत्वनामांडणीवावरकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 12:05 am
साहित्यिकजीवनमानविचारअनुभव

वयास माझ्या पैंजण घालित....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
5 Sep 2019 - 5:40 pm

शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती
नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी

शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी
टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा

डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे
त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा

नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे
साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा

पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली
एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी

अविश्वसनीयकविता माझीकाणकोणकालगंगादुसरी बाजूभावकवितामाझी कवितावावरसंस्कृतीवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवास

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
1 Sep 2019 - 12:14 pm

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....

कविता माझीकालगंगातहानप्रेम कविताभावकवितामनमेघमाझी कविताविराणीकरुणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमान

शोक कुणाला? खंत कुणाला?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
25 Aug 2019 - 9:11 pm

हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?

चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?

पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?

पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे
चरचर चरचर डोळे झरती......
शोक कुणाला? खंत कुणाला?

कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते
करकर करकर शाप जीवांचे,
थरथर.... इथवर ऐकू येते.....

-शिवकन्या

आता मला वाटते भितीइशाराकविता माझीकालगंगामाझी कविताभयानकमांडणीवावरकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागा

देवघर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
19 Aug 2019 - 9:33 pm

देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला
पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला

दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला
बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला

देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते
त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते

समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती
मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती

हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो
मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो....

-शिवकन्या

कविता माझीकालगंगामाझी कवितावृत्तबद्ध कवितासांत्वनाकरुणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकसमाजजीवनमान

सावज (भाग १)

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
12 Aug 2019 - 4:59 pm

काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत .
तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.
==================================================

कथासाहित्यिकलेखविरंगुळा