साहित्यिक

दिवाळी अंक २०१६

फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत.

आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे.

लेखनविषय:: 

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

आत्ता इथे इतके वाजलेत,
म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील.....
तिथे आता
हे हे असे असे घडत असेल
आणि इथे हे हे असे असे ..............!
स्मरणाचा एक तास काटा तिथे
तर एक इथे!
बाकी मन,
सेकंद काटा होऊन
सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे
टिकटिकत राहते
दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर..............
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

-शिवकन्या

माझ्या बालपणीचा सुगंधित ठेवा... गुलाब

तिथे वर कुठे तरी स्वर्ग असतो म्हणे.... त्या स्वर्गात देव रहात असतात म्हणे... तेच आपलं भविष्य एका पुस्तकात लिहीत असतात म्हणे... त्यांचं ते लिखाण आपल्याच कृतीवर अवलंबून असतं म्हणे... त्यालाच प्राक्तन असं संबोधन असतं... म्हणजे आधीच्या जन्मातल्या आपल्या वर्तणुकीवर ते लिखाण ठरतं म्हणे... आणि त्याच लिखाणाच्या अनुषंगाने आपला दुसरा जन्म आणि त्या दुसर्या जगण्याचा मार्गही ठरतो म्हणे... म्हणजे आधीच्या जन्मात जर आपण काही दुष्कृत्ये केली असतील, तर दुसर्या जन्मात आपल्याला खूप त्रास होतो. त्याचबरोबर आधीच्या जन्मात जर आपण काही सत्कार्ये केली असतील तर दुसरा जन्म सुखाचा जातो...

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

मनाचा एकांत - काळे पाणी

अंदमानातले काळे पाणी,
कोलूबेड्याहंटरकदान्न
सोबत तीव्र अपमानाचा overtime !
साम्राज्याचा उग्र दर्प अन
देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा.......
असे सगळे, अन वरती थोडी
जयहिंदची जाळी !

या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही,
काही काही रक्तांचे
malnourishment कि काय ते झालेच नाही!
उलट,
तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही
त्यांच्या जहालहळव्या लेखणीने
cultured झाल्या!
मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी,
.
.
.
दुसरं काय होता
एकांत म्हणजे तरी!

- शिवकन्या

पाश्चिमात्य साहित्य

महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते. काही गाजलेली इंग्रजी पुस्तके -
:
१) लस्ट फाॅर लाईफ, आयर्विग स्टोन

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे.
मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली. या मालिकेत मला आवडलेली गझलकार/शायरांचा परिचय देण्याचा प्रयत्न करेन
_____________________________________________________________________

लेखनप्रकार: 

मनाचा एकांत - चिमण्या

डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या
हा हा करतात
या जीवघेण्या ओसाडीत....
कुठे दाणे टिपत असतील?
कुठे पाणी शोधत असतील?
घरटे कुठल्या आडोशाला असेल?
यांच्यात यांचे दफन कसे करत असतील?
कोण करत असेल?
चिमण्या निमित्त असतात............
आपल्याच छाटलेल्या मनाचे
हे तासनतास भिरभिरणे असते.....
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

---- शिवकन्या

Please, Look After Mom!

Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो.

खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे. पण ही कादंबरी मनात रेंगाळत राहते, ती तिच्यातले सखोल तपशील,निवेदनशैली आणि कथनातील कमालीच्या प्रांजळपणामुळे !

कादंबरी सुरु होते तीच मुळी वाचकाचे चित्त जखडून ठेवणाऱ्या, 'स्टेशनवर आई हरवली' या वाक्याने!
[इथे Albert Camus च्या 'The Outsider' मधील Mother died today या प्रसिद्ध ओळीची आठवण आल्याशिवाय रहात नाही!]

... असंही होतं ना कधी कधी....

... असंही होतं ना कधी कधी....
अंगणातलं सुखाचं बी
बहरातली पाखरांची गाणी
हरवून जातात कुठंकुठं....
पण मनाचा सर्च कायम असतो
दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार
मनातलं मांजर हसतंच कि मजेदार!

... असंही होतं ना कधी कधी....
बियांना कोंब येईपर्यंत
आपलाच नसतो पेशन्स !
दु:खाच्या माजणार्या ताणावर
आपलाच नसतो कंट्रोल!
वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो,
पण तशा वैराण रानातही
एखादे रानफुल हसून बोलतंच कि
एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि!
... असंही होतं ना कधी कधी....

भक्तिमॉन गो!

bg

सदर लेख लोकमत हॅलो ठाणे पुरवणीर १४-०९-१६ रोजी प्रकाशित झाला

लेखनप्रकार: 

Pages