मी मराठी - अलक
सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! "
सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे
कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही .
मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "