कोविड_एक_अनुभव
ज्याने २-३ महिने धुमाकूळ घातलाय त्या कोरोनाची भेट झालीच . तसही ह्या मित्राला, नातेवाईक यांना झालाय आणि अशी लांबून भेट होतीच कोरोनाची.कंपनी मधल्या मित्राला कोरोना झाला आणि माझं quarantine चालू असताना १० व्या दिवशी ताप आल्यावर कुठे तरी मनात धाकधूक चालू झाली.पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर थोड हायसं वाटल, कोरोनाचा ताप एवढ्या दिवसांनी शक्यतो येत नाही.पण जर लक्षणं आली तर मात्र टेस्ट करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगून prescription दिलं.
दुसऱ्या दिवशी मात्र अचानक घश्यात कफ येणं आणि खोकला चालू झाला.म्हणून टेस्ट करण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. मग टेस्ट करून परत २४ तास संपले ते positive रिपोर्ट येऊनच(पहिला धक्का)..सो थोडं हबकलो. आता पुढे काय करायचं आणि कसं? परत एकदा डॉक्टरांशी बोलून हॉस्पिटल मध्ये admit व्हायचं ठरवलं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जाण्यापेक्षा , प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये मित्र असल्या मुळे तिथेच ऍडमिट व्हायचं ठरवलं.मग ऍम्ब्युलन्स कंपनीने दिल्यामुळे ती चिंता मिटली. आयुष्यात ambulance मध्ये बसायची पहिली वेळ.
हॉस्पिटलला गेल्यावर मात्र डॉक्टरांनी ऍडमिट करतानाच सांगितलं,"५ दिवसांत बरा होऊन बाहेर पडणारेस!" हे ऐकुन बरं वाटलं. सगळ्या फॉर्मलीतीज पूर्ण झाल्यावर लगेच ट्रिटमेंट चालू झाली. ट्रिटमेंट म्हणजे फक्त व्हिटॅमिन गोळ्या , गरम पाणी , लक्षणं जशी असतील तशी औषधे, सलाईन्स , इंजेक्शन चालू होती. ५ व्या दिवशी डॉक्टर येऊन सांगून गेले उद्यापासून २४ तास under observation मग डिस्चार्ज. पण दुसऱ्या दिवशी सकाळ पासून खोकला आणि धाप लागणं सुरू झालं.खोकला आला की छातीत दुखणं सुरू झालं. धाप लागत असल्यामुळे ५ मिनिट चालणं पण मुश्किल झालेलं.मग छातीच CT scan केल्यावर लक्षात आलं की न्युमोनिया ची सुरुवात झालेली होती(दुसरा धक्का). मग डॉक्टरांनी परत ती औषधे चालू केली.हे होऊन दोन दिवस जातायात तर त्याच दिवशी संध्याकाळी ताप येऊन ऑक्सिजन लेव्हल ८५ पर्यंत खाली गेली.(तिसरा धक्का) मग लगेच डॉक्टरांनी आयसीयू मध्ये शिफ्ट करून ऑक्सिजन चालू केला.२ दिवस ऑक्सिजनमास्क ऑक्सिजनची लेव्हल होई पर्यंत होताच. मग २ दिवस under observation ठेवून काही त्रास नाही बघून १३व्या दिवशी डिस्चार्ज होऊन घरी आलो.पुढचे १४ दिवस सर्दी खोकला कमी कमी होत गेला. आणि १४ दिवस पूर्ण झाल्यावर टेस्ट केल्यावर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर जीव भांड्यात पडला. सेल्फ quarantine चा आठवडा पूर्ण झाल्यावर मात्र हलका व्यायाम सुरू केला. आणि एवढे दिवस मात्र अनुलोम,विलोम, कपालभाती चालूच होत जेवढं जमेल तेवढं.
या १४ दिवसात लोकांच्या नजरा बदलल्या. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मात्र पूर्ण १४ दिवस नाश्ता आणि जेवणाची जबाबदारी घेतलेली.आणि मी फक्त कधी तरी शाळा कॉलेजात असताना संघाचं काम केलेलं हीच काय ती ओळख.
हा सगळा त्रास तरुणांना पण होऊ शकतो , सो कोणी सांगत असेल तर तरुणांना काही होत नाही तर फार मोठा गैरसमज आहे हा.आणि असेच माझ्याच वयाचे ५-६ पेशंट होते हॉस्पिटलला.
सो काळजी घेणं खूप महत्त्वाचे.आता हळू हळू सगळं नॉर्मल होतंय. थोडा थकवा जाणवतोय अजुन पण तो ही निघून जाईल.
एवढं सगळं होत असताना positive राहणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जवळ जवळ महिनभर बातम्या बघायचं बंदच केलं. खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस ,कॉल्स चालू होते कधीच त्यांनी एकटं वाटू दिलं नाही. हे करत असतानाच स्वामींचा तारक मंत्र होताच. ज्यामुळे फार काही त्रास जाणवला नाही.
थोडं मागे वळून बघितल्यावर काही गोष्टी करायला हव्या होत्या अस वाटतयं:
१. social distancing must
२. Use of sanitizer ,soap water frequently.
३. दुसऱ्याची वस्तू शक्यतो वापरणं टाळा, जर नसेल शक्य तर वस्तू वापरल्यावर हात sanitize करणं
४. जी माणसं घरच्या बाहेर पडतायत त्यांनी steam घेणं must..
५. आणि काही लक्षणं दिसत असतील तर मात्र लगेच डॉक्टरांना भेटा. अंगावर काही काढू नका.
आणि लास्ट बट नॉट द लिस्ट हा मंत्र लक्षात ठेवा "मी बरा होणारच!"
धन्यवाद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अभिनंदन..
धन्यवाद..नक्की लिहीन काही
दुरगामी परीणाम
बाप रे ! अगदी सहीसलामत बाहेर
धन्यवाद...होय म्हणूनच लिहिलंय
प्रांजळ अनुभव कथनाबद्दल धन्यवाद..
होय त्याचाच side-effect..
अभिनंदन ..
धन्यवाद..
@ अक्षय देपोलकर : बरे झालात, अभिनंदन !
धन्यवाद...
करोनावर मात केल्याबद्दल
धन्यवाद..
अभिनंदन व शुभेच्छा
छान
धन्यवाद!
आपण यातून व्यवस्थित बरे झालात
काल माझी आणि बायकोची टेस्ट
डॉ. कुमार / डॉ. खरे