जाणीव - अलक

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
3 Feb 2021 - 11:15 pm

जाणीव - अलक

----------------------------
खच्यॅक - टपोरीने त्वेषाने भाल्याच्या पोटात चाकू खुपसला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या . भाल्याच्या शरीरात
वेदनेचा एकच आगडोंब उसळला .
त्याला प्रकर्षाने जाणवलं , ' शरीरात चाकू खुपसल्यावर फारच नकोशी , जीवघेणी कळ येते . टपोरीच्या भावाच्या पोटात
आपण चाकू खुपसला होता तेव्हा त्यालाही असंच झालं असेल ! ... '
याची जाणीव त्याला झाली तेव्हा फार उशीर झाला होता .

हे ठिकाण