मी मराठी - अलक

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
4 Feb 2021 - 9:23 pm

सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! "
सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे
कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही .
मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "

हे ठिकाण

प्रतिक्रिया

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Feb 2021 - 10:33 am | बिपीन सुरेश सांगळे

आज कवी कुसुमाग्रज जयंती .
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !

मुक्त विहारि's picture

27 Feb 2021 - 10:50 am | मुक्त विहारि

शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम, चांगले व्यक्त केले आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2024 - 2:44 pm | अमरेंद्र बाहुबली

सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय संबंधं होता??

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2024 - 2:44 pm | अमरेंद्र बाहुबली

सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय संबंधं होता??

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Feb 2021 - 2:05 pm | बिपीन सुरेश सांगळे

मुक्त विहारी आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Feb 2021 - 2:06 pm | बिपीन सुरेश सांगळे

सामान्य मराठी भाषिकांची स्वभाषेविषयीची अनास्था या कथेतून मला अभिप्रेत आहे .

टर्मीनेटर's picture

4 Mar 2021 - 6:23 pm | टर्मीनेटर

अलक आवडली 👍

सर्व मराठी लोकांची जबाबदारी आहे मराठी भाषा वाढवणे,तिचा रोजच्या व्यवहारात उपयोग करणे.
फक्त सेनेवर आरोप केल्या मुले आपली जबाबदारी संपत नाही ती पळवाट झाली.
मी मुंबई मध्ये सर्व ठिकाणी मराठी च वापरतो आणि आज पर्यंत तरी कोणतीच अडचण आली नाही.

मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 11:37 pm | मुक्त विहारि

जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा

मराठी_माणूस's picture

5 Mar 2021 - 9:48 am | मराठी_माणूस

अलक म्हणजे काय ?

टर्मीनेटर's picture

5 Mar 2021 - 10:57 am | टर्मीनेटर

अलक = अति लघु कथा!

चौथा कोनाडा's picture

5 Mar 2021 - 6:05 pm | चौथा कोनाडा

अलक आवडली.

जय मराठी, जय महाराष्ट्र !

बिपीन सुरेश सांगळे's picture

29 Mar 2021 - 10:18 am | बिपीन सुरेश सांगळे

वाचकांचे व प्रतिसादकांचे खूप आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Feb 2024 - 2:15 pm | बिपीन सुरेश सांगळे

मराठी भाषा गौरव दिन
यानिमित्त खास

श्वेता व्यास's picture

27 Feb 2024 - 3:54 pm | श्वेता व्यास

अलक आवडली, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.