गोफ (ऐसी अक्षरे २९)


आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली. याच हस्तलिखितातले ,मन्ना डे यांनी गायलेले गाणे,"घन वन माला नभी ग्रासल्या,कोसळती धारा",हे अप्रतिम गाणे आपल्याला मिळाले.
गीतारहस्य-७
कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्धांताला अद्वैत सिद्धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे.
सांख्य शब्दाचा अर्थ-
१.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले.
२.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे)
असा व्यापक अर्थ बनला.
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा.
तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात.
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व

गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट!
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञविचार
मनोदेवता
प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्सद्विवेकबुद्धी आहे- -आधिदैवतपक्ष.
या सदविवेकबुद्धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय."
-वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे.
#गर्जामहाराष्ट्र
लेखक-सदानंद मोरे

इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते.
तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्वज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.