करोनात्रस्त त्रागा
संदीप खरे यांची क्षमा मागून,
चाल - मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
करोनामुळे काही लोक पूर्ण घरात बसून आहेत, सगळी काळजी घेत, आणि काही लोक सगळे नियम धाब्यावर बसवून फिरतायत, त्यावरून झालेला वैताग आता कवितेतून व्यक्त होत आहे
मी नाकावरती दहा मुखवटे आवळतो
तो उघड्या नाकपुड्यानी गावातून फिरतो
मी दाव्याच्या बैलापरी झालो बंदी
तो उनाड रेड्यापरि धावे स्वच्छंदी
मी दाव्यावरती पाय गंजवित बसतो
तो उघड्या नाकपुड्यानी गल्लीत फिरतो