मठ
ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी ।
गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥
अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो.