कारपोरेटातली विंग्रजी
मी मूलतः गाढव आहे, चुकुन मनुष्य योनीत आलो असे वाटते. गाढवपणा फक्त रक्तात नाही तर मांसल पेशींच्या रंध्रारंध्रापर्यंत पोहचलेला आहे. असे हे गाढव आयटीत चिकटले म्हणून त्याचा तेनालीराम होत नाही. माझ्या सोबतीची मंडळी सुद्धा गाढव असावीत असा माझा समज होता. आम्हा गाढवांमधे एक सुंदर, हुषार मुलगी होती. बऱ्याच मंडळींना त्या कारणाने आमचा हेवा वाटायचा. आम्ही लिनक्सवर काम करीत होतो. ती डिस्ट्रो, रेडहॅट, डेबियन अशा माझ्यासारख्या गाढवांना न समजनाऱ्या भाषेत बोलत होती. मला ती मुलगी जादुगार वाटत होती. काहीतरी टाईप करायची दोन सेकंदात सार गायब, परत काहीतरी टाईप करायची तर धडधड सारी अक्षरे वर जात होती.