मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·

मदनबाण 03/11/2013 - 00:55
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद 03/11/2013 - 21:29
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.

In reply to by अभ्या..

पैसा 04/11/2013 - 09:17
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

In reply to by पैसा

अभ्या.. 04/11/2013 - 15:05
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

In reply to by अभ्या..

पैसा 04/11/2013 - 15:22
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

In reply to by पैसा

पाषाणभेद 05/11/2013 - 05:46
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय 03/11/2013 - 21:26
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी laxmi1 Laxmi 2 Laxmi 3 अर्धांगाने काढलेली रांगोळी diwali

माशा 03/11/2013 - 23:39
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

In reply to by माशा

पैसा 03/11/2013 - 23:52
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

माशा 04/11/2013 - 00:44
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Madhavi's

In reply to by पैसा

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ

In reply to by सानिकास्वप्निल

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

In reply to by केदार-मिसळपाव

हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

किलमाऊस्की 05/11/2013 - 02:41
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

In reply to by ह भ प

किलमाऊस्की 07/11/2013 - 03:02
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

In reply to by केदार-मिसळपाव

जेनी... 08/11/2013 - 23:46
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

Mrunalini 06/11/2013 - 16:20
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)

मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

पुस्तक खरेदी - काल आणि आज

rahul ghate ·

दुकानात जाऊन फक्त इयत्ता सांगितली कि तो सगळे पुस्तक काढून समोर ठेवी १९६०च्या काळात घेऊन गेलात. आमच्याच वर्गातील मित्र गावातील एकमेव पुस्तक दुकानदाराचा मुलगा. हेवा वाटायचा. बहुतेक खरेदी उधारीवरच असायची. पहिल्यांदाच जरी लिहीले असेल तरी प्रवाही आहे. थोडा आणखीन फुलवता आला असता.

चित्रगुप्त 31/07/2023 - 22:55
लेखनाचा पहिलाच प्रयत्न चांगला आहे. मराठीत लिहीताना हिंदीप्रमाणे 'फिरस्ती वर' ---'असल्या मुळे' ... 'मार्गदर्शना नंतर' -- 'कुठल्या हि' -- 'मुला साठी' असे दोन शब्द वेगवेगळे न लिहीता ते एकत्र लिहीण्याची पद्धत आहे. जसे: 'फिरस्तीवर' ---'असल्यामुळे' ... 'मार्गदर्शनानंतर' -- 'कुठल्याही' -- 'मुलासाठी' वगैरे. तसेच "सहसा हे खाते आमच्या कडे आमचे गृह खात च सांभाळते" .... या वाक्यात 'खाते' आणि 'खात' (खात खात जाणे... सारखा अर्थ) चा जरा घोळ झालेला आहे. लेख प्रकाशित करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा सूक्ष्मपणे 'पूर्वपरिक्षण' करून आवश्यक त्या सुधारणा करणे बरे.
घरी येताना माझं मन भूतकाळात गेले व माझी शालेय पुस्तक खरेदी आठवली
सदर लेख आयुष्यातील प्रत्यक्ष घटनांवर आधारित असल्याने त्यातले जास्त बारकावे दिले तर वाचकास त्यांचे आकलन जास्त चांगल्या प्रकारे होणास मदत होते. उदाहरणार्थ वरील वाक्यातला 'भूतकाळ' म्हणजे नेमके किती साल वा कोणते दशक ? 'चिव चिव बाजार' हा कोणत्या गावात वा शहरात असायचा? आता 'लेकाची शाळा' त्याच शहरात आहे किंवा कसे, वगैरे. वाटल्यास प्रतिसादात ही माहिती द्यावी. शहराचे नाव, बालपणाचा काळ वगैरे दिल्यास अन्य मिपाकरांशी प्रत्यक्ष मैत्री होण्याची शक्यता पण वाढते, जे हल्लीच्या 'सबकुछ ऑनलाईन'च्या काळात जास्तच महत्वाचे झालेले आहे. असो. पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

rahul ghate 01/08/2023 - 18:53
धन्यवाद ...एकत्र शब्द असायला पाहिजे होते. गाव/ साल मात्र मुद्दाम टाकले नव्हते जेणे करून प्रत्येक जण आपल्या परीने relate करू शकेल अस मला वाटलं.

सिरुसेरि 01/08/2023 - 21:22
सुरेख आठवणी . या लेखामुळे सांगलीतील ताम्हनकर , तानवडे यांचबरोबर संकपाळ बूक डेपो आठवले . संकपाळ बूक डेपो मधे जुन्या पुस्तकांचीही खरेदी विक्री होत असल्यामुळे अनेकदा शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तिकडेच कल असे .

In reply to by सिरुसेरि

रामचंद्र 01/08/2023 - 23:48
आज ऑनलाईन खरेदीच अंगवळणी पडलेल्या युवा पिढीला एका वेगळ्याच आनंदाची ओळख होईल. अशा प्रतिसादांमुळे स्थानिक इतिहासालाही (लोकल हिस्टरी) अल्पशी मदत होते. आताच्या काळात दोन पिढ्यांमधला संदर्भ-दुवे झपाट्याने निखळू लागले असताना याचं महत्त्व विशेष आहे.

विवेकपटाईत 02/08/2023 - 12:41
दिल्लीत ११ बोर्डाची पुस्तके १९७७ पर्यंत पुस्तके बदलल्या गेली नाही. ८ वी पर्यंत मला नेहमी च माझ्या पूर्वी सहा-सात मुलांनी वापरलेली पुस्तके मिळायची. त्यावेळी नववी दहावी अकरावी तिन्ही वर्षांचा कोर्स बोर्ड मध्ये यायचा आणि पुस्तके जाडजूड असायची. एकच पुस्तक तिन्ही वर्षांच्या कामी यायचे. मी माझी मोठी बहीण आणि एक शेजारीण एकच पुस्तक वापरात असू.

छान लिहिले आहे, पुस्तकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. साधारण पाचवी सहावीनंतर नवीन पुस्तक आणले की आधी मराठीचे पुस्तक उघडून काही धडे कथास्वरूपात वाचून काढले जायचे. सगळी पुस्तकं चाळून व्हायची पण भूगोलाचं पुस्तक शाळेतच तासाला पहिल्यांदा उघडलं जायचं :) एक मात्र कायम वाईट वाटलं की माझ्या अभ्यासक्रमाची आमची दर वर्षी शेवटची बॅच असायची, नंतरच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलत असल्याने पुस्तके खूप चांगल्या अवस्थेत असूनही कोणा गरजूला देता आली नाही.

टर्मीनेटर 03/08/2023 - 12:24
मस्त! शालेय जीवनातील वह्या-पुस्तके, युनिफॉर्म, दप्तर आणि गमबूट-रेनकोटची खरेदी फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यांसमोर तरळून गेली. नविन पुस्तकांचा तो हवाहवासा वाटणारा सुवास तर अविस्मरणीय! लिहिते रहा 👍

हा लेख अर्धवट लिहून मे मधेच ठेवला होता परंतु आत्ता पूर्ण केला त्यामुळे कदाचित असंबद्ध वाटू शकतो हा माझा पहिलाच लेख असल्या मुळे लिखाणात व व्याकरणाच्या चुका होऊ शकतात त्यामुळे क्षमस्व पुस्तक खरेदी - काल आणि आज काल लेकाच्या शाळेत ( इयत्ता २ री ) पालक सभे साठी बोलावले होते, मी फिरस्ती वर असल्या मुळे सहसा हे खाते आमच्या कडे आमचे गृह खात च सांभाळते , वेळ असल्या मुळे ह्या वेळी मी गेलो . शाळेत गेलो तर इतर काही सूचना व मार्गदर्शना नंतर मूळ मुद्दा आला कि पुस्तक विक्रेता शाळेत हजर असून पुस्तके २ दिवसात घेऊन टाका, त्या नंतर पुस्तक विक्रेत्या कडे जाऊन आणावी लागतील.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.

आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

||राधायन.. एक सांगीतिक कथादर्शन|| (निमंत्रण)

प्राची अश्विनी ·

सौंदाळा 01/04/2022 - 15:00
सुंदर फोटो कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा

गामा पैलवान 01/04/2022 - 20:55
प्राची अश्विनी, कार्यक्रमास शुभेच्छा. कलाकारी बघायला आवडेल. व्यासांच्या बहाभारतात राधा हे पात्र नाही ( ऐकीव माहिती ). तर मग राधायनाचा स्रोत काय आहे? कुतूहल म्हणून विचारतोय. कथाकार तुम्हीच आहात असं गृहीत धरतोय. आ.न., -गा.पै.

आत्ताच तीन हात नाक्याला जाहिरातीचा फलक पाहिला. कार्यक्रमाला येणे शक्य नाही मात्र कार्यक्रमास शुभेच्छा ! जमल्यास कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाची ओळख म्हणुन एखादा ५-१० मिनिटाची चित्रफीत येथे प्रदर्शित करावी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्यक्रम होऊन गेल्यावर शुभेच्छा द्याव्यात काय असा एक प्रश्न पडला :) अर्थात त्यांची गरज माणसाला केव्हा ही पडू शकते ब्वॉ !

प्राची अश्विनी अभिनंदन. आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये तुमच्या प्रयोगाबद्दल चांगलं लिहून आलं आहे. ठाण्यात नाहीय त्यामुळे प्रयोगाला येऊ शकले नाही.पण पत्र वाचून खूप आनंद झाला.

नमस्कार मिपाकर्स या गुढीपाडव्याला, 2एप्रिल, रात्री 8.30 वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात " राधायन .. एक सांगीतिक कथादर्शन" हा कार्यक्रम घेऊन येतोय. त्याचं हे आग्रहाचं आमंत्रण. नवीन कथा, गीते, संगीत व नृत्ये, आणि या सा-यांच्या जोडीला चित्र साकारण्याचे प्रात्यक्षिक, असा अनोखा मेळ साधणारा कार्यक्रम, "राधायन- एक सांगीतिक कथादर्शन, गुढीपाडव्याच्या शुभदिनी, 'राधा-कृष्ण' हा म्हटलं तर परिचित विषय; पण कल्पनेला, प्रतिभेला सतत आवाहन करणारा! राधेच्या वृंदावनातील वास्तव्याच्या आणि कृष्णसहवासाच्या अनेक आख्यायिका आहेत. परंतु कृष्ण वृंदावनातून बाहेर पडल्यानंतरच्या राधेबद्दल आपणास फार माहीत नाही.

सरकार

पाटिल ·

"भंगू दे काठिण्य माझे" आणि "आम्ल जाऊ दे मनीचे" हे वाचताना तर फुटलोच, कवितेचा फारच चपखल वापर .. बाकिचे पंचही जोरदार आहेत. पैजारबुवा,

"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू." सरकारांचा मेसेज. आता तुम्ही म्हणाल की बरं मग? तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित करण्याची त्यांची पद्धत आहे. आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही. अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील. किंवा करू करू म्हणता येईल. शिवाय थोडा बदलही पायजेच ना माणसाला..! रोज रोज एकटेच कसे बसणार..! बसणार म्हणजे काही अगदी शब्दश: बसणं असं नाही.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!

Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

शशिकांत ओक ·

मनो 01/02/2021 - 08:15
एक दुरुस्ती - अस्साये च्या जागी असई हवे ही बेगम महादजी शिंदे यांच्या सैन्यात होती. मेरठ, पानिपत इत्यादी दुआबाच्या आसपासचे भाग, जिथे कालवे काढून बागायत अशी अत्यंत सुपीक शेती त्या काळातही होत होती, तिथे निवडक plum जहागीर या कवायती फ्रेंच सैन्याला दिली होती. त्यांचं भरघोस उत्पन्न हे तिथून आलेले आहे. दुर्दैवाने हे लोक खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. त्यांच्या कुचराईमुळे जनरल लॉर्ड लेक याने अलीगड आणि नंतर दिल्ली ताब्यात घेतली, ती दौलतराव शिंदे यांचा पराभव करून. बेगम समरू हिची आलिशान हवेली आजही आहे दिल्लीत पण त्यात इतकी अतिक्रमणे झाली आहेत (पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित असूनही) मूळ हवेली झाकली गेलेली आहे. अधिक तपशील https://ranasafvi.com/begum-samru-s-palace-in-delhi-then-and-now/

In reply to by मनो

शशिकांत ओक 01/02/2021 - 14:47
गूगलमधील नकाशात जरी अस्साये लिहिले असले तरी असई हेच गावाचे नाव बरोबर आहे. खालील नकाशातील असई हे कोल्हापुरच्या जवळचे आहे हे ते महालक्षी मंदिर वाले कोल्हापुर नाही. पण गूगल नकाशाची झलक दाखवली. असो. बाकीची माहिती रंजक आहे... असेच मार्गदर्शन मनोज करत राहतील अशी अपेक्षा करतो. सामरू

शशिकांत ओक 01/02/2021 - 22:24
ते ठीक आहे. मला वरील चित्रातील काही विशेष जे मला सांगता आले नाहीत किंवा अन्य रितीने त्यांच्या अर्थ लावला जाऊ शकतो. यावर प्रकाश टाकला जावा अशी अपेक्षा आहे. पहा प्रयत्न करून.

aa श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर. बेगम सामरू (Joanna Nobilis Sombre (ca 1753– 27 January 1836) किंवा सुमरु या साडे चार फुटी टिल्लू बाईंचे बडे प्रस्थ असले पाहिजे.