खड्डा आणि मी
आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही
तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे
त्या दिवशी मी महत्वाच्या कामानिमित्त [कोणते ? राष्ट्रउभारणीचे अत्यंत गुपित कार्य होते ते] त्या रस्यावरुन निघालो होतो.एक ब्रह्नानंदी टाळी लावलेला टॅम्पो रस्त्यात हळुवारपणे चालला होता.इतर कोणत्याही सांसारिक गोष्टिप्रमाणे त्याला मागच्या कोणत्याही ओरडणारया वाहनाची तमा नव्हती.
मिसळपाव
